गच्चीवरची (ऑरगॅनिक भाजीपाल्याची) बाग ही सेंद्रीय पध्दतीने शहरी भागात उपलब्ध जागेत भाजीपाला उगवण्यासाठी काम करते. या व्दारे विविध स्तरांवर काम करत आहे. खरं तर हे पर्यावरण संवर्धनासोबत पर्यावरणीय सामाजिक उद्मशिलता म्हणून आम्ही विकसीत करत आहोत. म्हणजे पर्यावरणाचा विचार , संवर्धन करत त्यातून लोक आरोग्याचा, सुरक्षित अन्नाचा विचार करत लोकांना शिकवत आहोत. त्यांना रोजच्या कामातून वेळ काढत आपले अन्न हे आपण तयार करू शकतो यासाठी प्रेरीत करतो.
यासाठी विविध उत्पादने तयार करत असतो. यातीलच युनिक गार्डेन प्रोडक्ट म्हणजे अन्नपूर्णा बॅग्जस होय. छोट्या जागेत स्मार्ट पध्दतीने भाज्या उगवण्यासाठी या रेडी टू सो बॅग्जस फारच उपयुक्त ठरत आहेत.
या बॅग्जस मधे भाज्या उगवण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे आहे. अर्थात द्राव्य व विद्राव्य खतांची गार्डेन केअर बास्केट वापरणे बंधनकारक ठरते. किंवा त्यातील गोष्टी तुम्हाला तयार करून त्या वापरणे गरजेचे ठरते. याही व्यतिरित्क इतरही काळजी घेणे गरजेचे आहे. ती काळजी काय घ्यावी या बद्दलची माहिती पुढील प्रमाणे..
- अन्नपूर्णा बॅग्जस मधे हवा खेळती रहावी यासाठी बिशकॉम पॉटींग मिक्स ने भरलेल्या असल्या तरी त्यात काही चुकांमुळे झाडांची मुळे खराब होतात.
यासाठी बॅग्जसखाली विटा ठेवाव्यात कारण टेरेस लगत असलेया बॅग्जस खाली ओलावा रहातो. तो ओलावा वाफेत रूपांतर होतो. तो बॅग्जस मधील मुळांना घातक असते. विटा खाली ठेवल्यामुळे हवा खेळती रहाते.
- या बॅग्जला विळ्याने उकरी करण्याची गरज नाही. केवळ हाताच्या बोटांनी माती वर खाली करू शकता. तसेच बॅग्जला हाताच्या कडेने अथवा त्यास बुक्के मारले, थोपडले तरी बॅग्जस मधील माती सैल होते. मुळांशी हवा खेळती रहाते. हा सराव साधारण पाऊस संपल्यानंतर अथवा आठवड्यातून एकदा करावी.
- यात तिनस्तरीय पिक लागवड करता येते. मध्यभागी फळभाजी लागवड करावी, आजूबाजूला पालेभाजी व कंदमुळेही लागवड करता येतात. मात्र वेळोवेळी वरील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे असते.
- एक पिक संपल्यानंर त्यातील संपूर्ण माती वाळवून माती वाळवून घेणे गरजेचे आहे. पुन्हा त्यात बिशकॉम व खत मिसळून पुन्हा भाज्या लागवड कराव्यात.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644 / 8087475242