जमीनीवर परसबाग असली किंवा कंपोस्टीग खड्डा असल्यास आपल्याला उंदीर घुशीचा त्रास हा असतोच. विशेषतः खरकट्या अन्नााचा परसबागेत आपण डिरेक्ट वापर करत असाल तर हा त्रास जाणवणारच. त्यासाठी खरकटे अन्न हे फंरमेंट करून घ्यायला हवे. आंबवलेले पाण्याला किंवा खरकट्या अन्नाला उंदीर घुशी लागत नाही.

 आता उंदीर घुशी मारणे हे हत्या होऊ शकते. पण ते मानवी जिवितास धोका निर्माण करू शकतात. शिवाय महामारी आणू शकतात. कारण ते उपद्रवी असतात. कोवळी रोपे कुरतडणे, अळूंची कंद खाणे, परसबागेतील फळे खाणे, बिया खाणे, बिळ करून ठेवणे हा त्याचा उद्योग. बरेचदा यावर उपाय म्हणून आपण दुकानातून, मेडीकल मधून विविध औषधे आणतो व ति टाकून पहातो पण उपाय काही होत नाही. खर्च मात्र वाया जातो. तसे पाहिले तर औषधे ही जालीम असतात. ति जालीम नसती तर ति विकली गेली नसतीच. खरे तर आपले प्रमाण बदलते किंवा त्याचे पध्दत तरी.

आपण या लेखातून हे नेमकं काय तंत्र आहे समजून घेणार आहोत.

उंदीर घुशीना औषध टाकतांना ते सरसकट सर्व टाकू नये. त्यातील किंचीतसा भाग रोज टाकावा.  म्हणजे १०० ग्रॅमची वडी असल्यास त्यातील केवळ एक ग्रॅम रोज भाग टाकावा. यामुळे होते असे की रोज इतकेच चविष्ट ( विष) मिळाले म्हणून ते रोज खाण्याची सवय लागते. तसेच त्यांचा त्यांना एकदम त्रास होत नाही. त्यामुळे ते रोज खाण्यास सरसावतात. पण हे विष रोज थोडे थोडे खाल्ल्यामुळे त्याचा सावकास पण खात्रीने त्यांच्या मेदुंच्या गतीवर परिणाम व्हायला सुरवात होते. (उंदीर घुशीचे औषधे हे मेंदुवर परिणाम करतात) व हळू हळू त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते व त्यात ते सात दिवसात गतप्राण होतात.

तसेच हे औषध टाकतांना यात आपल्या बोटांचा स्पर्श होणार नाही याची सावधगिरी बाळगा. कारण या अन्नाला मानवी स्पर्श आहे याचा त्यांना गंध आल्यास उंदीर घुशी ते औषध वा अन्न खात नाही.

तसेच हे औषध काही दिवस एकाच ठिकाणी ठेवा. तेथील खाणे बंद झाले किंवा खाल्ले नाही तर त्याची जागा बदलवा. त्यात पावसाचे पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

तसेच या औषधामधे विविधता असणे गरजेचे आहे. औषधाचे तयार केक येतात. गव्हाच्या दाण्यांना किंवा अन्न पदार्थात मिसळता येणारी पावडर स्वरूपातील काही औषधे येतात. तसेच यांना पकडण्यासाठी चिकट सापळे असतात. चिवट द्रव्य लावलेल्या प्लास्टिक पॅड्सला ते चिकटतात. पण हा उपाय खर्चिक असतो. तरी पण तोही कधी कधी अवंलबांवा लागतो.

सफेद रंगाच्या डांबर गोळ्या पसरून ठेवल्यास उंदीर घुशी येत नाही. बिळांमधे केसांचा गुंता किंवा पुजका टाकावा. म्हणजे ते उकरत नाही.

बर हे सारे एकदाच औषधे टाकली म्हणजे काम संपते असे नाही. मेलेल्या उंदीर, घुशींची जागा हे नवीन उंदीर घुशी घेत असतात. त्यामुळे वरचे वर या औषधांचा उपयोग करणे फार गरजेचे असते.

पावडर स्वरूपातील औषध वापरण्याची रेसीपीः पावडर स्वरूपात जे औषध मिळते. त्यासाठी वाळलेले झिंगे – छोटे मोठे कोणतेही चालतील ,यास सुकट असेही म्हणतात ते मुठभर घ्यावेत. ते एका ताटलीत टाकून त्यावर गोडतेल टाकावे. त्यावर ही विषारी पावडर पसरून द्यावी. एका कोपर्यात हे औषध ठेवून द्यावे. हे सारे करतांना हॅंड ग्लोव्हजचा वापर करावा.

सुकटच्या जागेवर पिठाचे गोळेही या पध्दतीने तयार करता येतात. पण उंदीर घुशींना पिठापेक्षा सुकट जास्त आवडतं. हे औषध टाकल्यावर पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत झाकून ठेवावेत. कारण हे औषध खाल्ले की कोरड पडते. व उंदीर घुशींचा गुदमरून गतप्राण होतात.

गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग, नाशिक

 www.gacchivarchibaug.in