आंबुशी ही रानभाजी आहे. बारमाही येणारी ही जमीनीलगत (ground Cover) पसरणारी नाजूक वनस्पती आहे. तीन पाकळ्यासाऱखी आकर्षक पोपटी रंगाची दिसणारी पाने कालांतराने तपकीरी रंगाची होतात. ही जेथे ओलावा असतो त्याठिकाणी नेहमीच उगवून येते. खरं तर कुंड्या, जमीनीत येणारे हे तण म्हणून त्यास काढून टाकले जाते. चविला आंबट असणारी ही भाजी कच्ची खाल्ली तर उपयोगी असते. आंबुशी या भाजीला इंग्रजीत इंडीयन सॉरेल असेही म्हणतात. याची स्थानिक नावे ही वेगवेगळी आहेत. पण त्यास आबंटी, आंबुटी, आंबोती (गुजराती भाषेत)  चांगेरी, भुईपर्पटी, हिंदीत तिनपतीयाअसेही म्हणतात.

या हेतू ठेवून उगवता येत नाही. कारण निसर्गचे त्यांना वरदान आहे. अशा अनेक रानभाज्या आहेत ज्या आपण तण म्हणून काढून टाकतो. पण खरं तर त्या आपल्या आरोग्यासाठीच आपल्या परिसरात उगवलेल्या असतात. त्याचा अभ्यास करा.

आंबुशीच्या सेवनाने भूक वाढते. पचनास हलकी असते. क जिवनसत्व असेलेली ही भाजी आरोग्याला फार उपयुक्त आहे. याचे गुळपाण्यात सरबत फार चविष्ट लागते.

आपल्या बागेत येत असल्यास त्याचा उपयोग करा. भाजीत वापरता येते. तसेच त्याचा ठेचा सुध्दा चविष्ट लागतो.  इंटेरनेटवर आंबुशी नावाने शोधल्यास त्याच्या अनेक रेसीपी येतात.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.