प्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद, तुम्ही आमच्या कामाचे, प्रयत्नांचे कौतुक करत आहात. पर्यावरण कामासाठी काहीतरी ठोस करावे ज्यात लोकांचा फायदा तर होईलच शिवाय पर्यावरण संरक्षणात  सक्रिय सहभाग घेता येईल. असा जे आम्ही गच्चीवरची बागेच्या रूपात स्वप्न पाहिले होते त्यास आता आपली मोलाची साथ मिळू लागली आहे.

आपला विचार, प्रयत्न,ज्ञान, अनुभव लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माध्यमांची फार मोठी भूमिका आहे. अशा माध्यमांच्यअभ्यासाची आवड असल्यामुळे गच्चीवची बाग विविध माध्यमांव्दारे आपल्यापर्यंत पोहचवत आहोत.

प्रत्यक्ष रूपातील कामात सहभाग व ते काम लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी माध्यमांतील कौशल्य आत्मसात करत करत आम्ही ईथपर्यंत पोहचलो आहोत.

संकेतस्थल, यू ट्यूब चॅनेल, विविध समाज माध्यमांवरील आमच्या व्यासपिठाला आपण जोरदार पांठिबा देत आहोत. कारण पर्यावरण व आपले आरोग्य जपणे हे फार गरजेचे झाले आहे. त्यासाठी विविध माध्यमांवरील लोकांपर्यंत पोहचणे हे तितकेच महत्वाचे मानले आहे. किंबहूना गच्चीवरची बागेचे ते अभिन्न अंग आहे.

या माध्यमांतीलच महत्वाचा भाग आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहोत.

गच्चीवरची बाग रेडीओ. साहित्यांची निर्मिती आम्ही करतच आहोत. ते पाहणारी वाचणारी मंडळी आहेतच. पण आता ऐकणारी मंडळी तयार करायची आहे. त्यासाठी गच्चीवरची बाग रेडिओ ही संकल्पना घेवून आलो आहोत. तसं नवं काही नाही. जी माध्यमे आपल्याकडे आहेत. त्याचाच वापर करत आपण पुढे जात आहोत. त्यातील एक भाग म्हणून आम्ही पहिला वहिला भाग आपल्या कानांसाठी सादर करत आहोत.

आता तुम्ही आम्हाला दोन व्यासपिठावर ऐकू शकाल,

१) www. spotify.com/ gacchivarchi-baug

2) http://www.anchor.fm/gacchivarchi-baug

तेव्हां ऐकत रहा.