Site icon Gacchivarchi Baug : Grow Organic

आपण बाजारातल्या विषारी भाज्या अशाच खात राहिलो तर

काम केवळ आरोग्याचे नसून पर्यावरण जतन करण्याचे सुध्दा आहे. वर दिलेल्या आमच्या डिजीटल व्यासपिठावर तुम्हाला बरीच माहीती मिळेल, त्यासाठी ज्यांना सुत्रबध्द रितीने माहीती घ्यायची असेल त्यांनी  ई पुस्तके विकत घ्यावीत. वाचावीत. या उपरोक्तही काही अडचणी असल्यास संपर्क साधावा. ही विनंती.

Advertisements

आपण बाजारातल्या विषारी भाज्या अशाच खात राहिलो तर – Disadvanteges of Chemicaly Produced Vegetables

तुमच्या आमच्या आवडीची बाग गच्चीवरची

नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक येथून

आम्ही गेल्या दोन दशकांपासून विषमुक्त भाज्या कशा पिकवायच्या या बद्दल काम करत आहोत. आणि मागील एक दशकांपासून या विषयात पूर्णवेळ ( Home Grow Vegetable Services) काम करत आहोत. कारण हे आमच्यासाठी केवळ प्रोफेशन नसून Gardening हे  Passion आहे. आम्ही Grow, Guide, Build, Products, Sales n Services या पंचसुत्राव्दारे आम्ही भाज्या उगवण्याचे, उगवून देण्याचे. सशुल्क व  निशुल्क मार्गदर्शनाचे, विविध Gardening Setup तयार करून देण्याचे तसेच या संबधी विक्री व सेवा सुविधा पुरवत आहोत.

आज जगात सर्वात मोठी गुंतवणूक (Investment) कोणती असेल तर ती म्हणजे आरोग्य, आरोग्य ही गुंतवणूक असू शकते याचा आपण विचारच करत नाही. हेल्थ इन्शुरंन्स, प्रॉपर्टी, बडेजावपणा, हायफाय राहणीमान, नातेवाईक काय म्हणतील यावरच खर्च व गुंतवणूक होत असते. पण हे सर्व करण्यासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. लंबी रेस का घोडा बनणायचे असेल तर आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. कारण

आरोग्यच ही सर्वात मोठी पायाभूत, मूलभूत अशी गुंतवणूक आहे. ज्यात वेळेची, पैशाची, ज्ञानाची, श्रमाची ही गुंतवणूक तुम्हाला स्वतःलाच करावी लागते. पण जेव्हां केव्हां रेस्ट ईन पिसची वेळ येते तेव्हां आपल्याला आरोग्याची आठवण येते. अरे आरोग्य चांगले राखले असते तर शारिरिक त्रास भोगण्याची गरज पडली नसती. पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असते. असो, आरोग्यदायी जगण्यासाठी अनेक प्रकारच्या गुंतवणूक असतात. त्यातील एक महत्वाची आणि हे सर्व ज्या शरिर नावाच्या इंजिनावर चालते

त्याला विषमुक्त अन्न खावू घालणं गरजेचे आहे. हेच आम्ही गेल्या २४ वर्षापासून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

आमच्या प्रयत्नांना आता यश येवू लागले आहे. त्यासाठी आम्ही मासेस टू क्लासेस यांच्यासाठी आमच्याकडील अनूभवांची सुर्यथाळी तयार केली आहे. तुम्हाला जेवढे शिकायचे तेवढे तुम्ही शिकू शकतात. यासाठी तुम्हाला आमचा युट्यूब चॅनेल, इंस्टाग्राम, ५०० लेखाची वेबसाईट, तुम्हाला माहिती देणारे संकेतस्थळं तयार केली आहे. व्हॉट्सअपवर रोज अपडेट पाठवत असतो. आमचा मोबाईल न. व्हाट्सअप मधे चेक करून व्हा.

व्हॉट्सअप स्टेटसला आम्ही अपडेट करत असतो. त्यांना सब्जक्राईब करा, लाईक करा. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेटस मिळत राहतील. स्वतः अनुभवलेले, वर्तमान पत्रात लिहिलेल्या सदरांचे दहा ई पुस्तके आहेत. या पुस्तकांची माहती देणारे सारांश ई पुस्तके सुध्दा तयार केली आहेत. ति वाचा. अनुभवा, कामाला सुरूवात करा.

अगदीच सुरूवात करायची असेल तर गुगल किंवा गुगल इमेजवर जावून गच्चीवरची बाग नाशिक असे टाईप करा. तुम्हाला सगळ्या ए टू झेड प्रकारची माहिती आम्ही आमच्या बॅनर खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. बरीच मंडळी आमची माहिती न घेताच भेटायला येतात. फोनवरही बराच वेळ घेतात. आम्ही निशुल्क मार्गदर्शन करत असलो तरी वैक्तिगत वर्ग घेत नाही याची दखल घ्या. कारण गच्चीवरची बाग कामाचा व्याप प्रचंड वाढत आहे. आम्ही मागील १० वर्षात १ कोटी लोकांपर्यंत पोहचलो आहोत.

येत्या काळात ही संख्या १०० कोटी लोकांपर्यत नेण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे कुणा एका वैक्तिसाठी वेळ देता येणार नाही. ते योग्यपण नाही. कारण हे काम केवळ आरोग्याचे नसून पर्यावरण जतन करण्याचे सुध्दा आहे. वर दिलेल्या आमच्या डिजीटल व्यासपिठावर तुम्हाला बरीच माहीती मिळेल, त्यासाठी ज्यांना सुत्रबध्द रितीने माहीती घ्यायची असेल त्यांनी  ई पुस्तके विकत घ्यावीत. वाचावीत. या उपरोक्तही काही अडचणी असल्यास संपर्क साधावा. ही विनंती.

तसेच आम्हाला मोबाईल मधे पहाता येत नाही, वाचता येत नाही. असे म्हणून चालणार नाही. आज सर्वात जास्त वेगाने व विविधतेने शिकण्याचे साधन हे मोबाईल आहे. त्यामुळे ते हाताळण्याचं कौशल्य हे अवगत करावेच लागेल. तेव्हा संपर्कात रहा, शिकत रहा, पिकवत रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, इंडीया.

Exit mobile version