आपला सहभाग – स्वच्छ महाराष्ट

0 (55).jpg

संदीप क चव्हाण, नाशिक. गच्चीवरची बाग

मी संदीप चव्हाण नाशिक येथे राहतो.  गेल्या बारा वर्षापूर्वी  मी नाशिक शहरात गारबेज टू गार्डन या संकल्पनेतंर्गत गच्चीवरची बाग या संशोधनाला सुरवात केली. आज रोजी नाशिक मधील बहुस्त्रुत असे गच्चीवरची बाग हे काम गारेबज टू गार्डन या संकल्पनेवर चालते. आपल्या शहराला स्वच्छ सुंदर बनवायचे असेल तर त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील, परिसरातील कचर्याचे व्यवस्थापन स्वतःच करणे गरजेचे आहे. कचरा व्यवस्थापन हे जितक्या विक्रेद्रीकरण पध्दतीने होईल तेवढा कचराविषयक समस्या सुटतील या तत्वावर आधारीत मी या कामाला सुरवात केली.

काय आहे संकल्पनाः

गच्चीवरची बाग म्हणजे शहरातील उपलब्ध जागा (टेरेस, बाल्कनी, विंडो ग्रील)  उपलब्ध टाकावू वस्तूंचा ( विशेषतः फेकून दिल्या जातात. भंगारात विकल्या जातात.) वापर करत उपलब्ध नैसर्गिक स्त्रोतांचा ( वाळलेले किचन वेस्ट, पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या) ८० टक्के उपयोग करत घरच्याघरी भाजीपाला निर्माण करता येतो व त्यासाठी २० टक्के माती अथवा शुन्य मातीत नैसर्गिक पध्दतीने भाजीपाला पिकवता येतो. या तंत्रामुळे घरचा हिरवा कचरा वाळवून घेणे गरजेचे आहे. त्याचे खत बनवण्यात वेळ व कंपोस्टींगची महागडी साधने विकत घेवून खर्च करण्यापेक्षा त्यांचा कुंड्या किंवा वाफा भरण्यासाठी उपयोग करण्यात येतो. या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून गच्चीवरची बाग संकल्पनेचे काम उभे राहिले व त्यास नाशिककरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

काय साध्य होणार…

या योजनेंतंर्गत केवळ नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रातील गारबेज टू गार्डन करू इच्छिणार्यांसाठी मार्गदर्शन, कार्यशाळा, माहितीपट सादऱीकरण केल्यास त्यातून  घर, बंगल्याच्या परिसरात असलेला पालापाचोळा, नारळाच्या फांद्या यांचा बागेसाठी कसा उपयोगात आणावा यासाठी जनजागृती होईल.. यातून कमीत कमी मातीत जास्तीत जास्त पालापाचोळा लवकरात लवकर कुजवून त्याचा उपयोग भाजीपाला लागवडीसाठी करण्यात येणार आहे. फक्त पालापाचोळ्याचे खत तयार करा असे सांगण्यापेक्षा त्यातून घरच्याघरी भाजीपाला पिकवता येतो यातून लोक प्रेरीत होतात. व त्यांच्या सृजनशील सहभागामुळे साहजिकच परिसर स्वच्छ, सुंदर होण्यात मोलाचा हातभार लावणार आहे.

तसेच रसायनमुक्त भाजीपाला पिकवणे, सेवन केल्याने आरोग्य सांभाळता येईल. शुध्द हवेची निर्मीती होईल. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची लागवड व त्याचा वापर करता येईल. पशु पक्षांना आसरा व अन्न मिळेल. लोकांना कचरा व्यवस्थापनाचे धडे गिरवता येतील. विशेषतः इच्छुकांना निसर्गाच्या जवळ जाता येईल.

गच्चीवरची बागेचे य़श…

सज्जा पर सब्जी या माहितीपटाला प्रचंड प्रतिसाद.

गच्चीवरची बाग पुस्तकाचे प्रकाशन व विक्री

मल्टी पर्पज सर्व्हिस व्हेईकल तयार केली.

लोकसत्ता वर्तमान पत्रात वर्षभर लेखन

विविध शहरात गच्चीवरची बागेचे सादरीकरण व मार्गदर्शन.

नाशिक व महाराष्ट्रातील वर्तमानपत्र व चित्रवाहिण्याव्दारे बातमीव्दारे प्रसिध्दी..

 

नागरिकंनी कसे सहभगी होत येईल….

बाग फुलवण्यास इच्छुक असणार्या नाशिक -करांसाठी गच्चीवरची बाग व्दारे सोशल मीडियाव्दारे निशुल्क मार्गदर्शन केले जाते. तसेच नाशकात आयोजीत होणार्या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आपण नाव नोंदवल्यास त्याची पूर्वसुचना केली जाते.

  • महाराष्ट्रातील शहरामध्ये साखळी कार्यशाळांचे आयोजन करावे.
  • नाशिक व इतर शहरांमधील शाळामध्ये गच्चीवरची बाग फुलवण्यासाठी छायाचित्र माहितीपट प्रदर्शनातून प्रेरीत करणे,
  • जाणकार व्यक्तिंना निशुल्क मार्गदर्शनासाठी संपर्क क्रं. उपलब्ध करून दयावा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, 9850-56-9644

ईमेलः sandeepkchavan79@gmail.com

अधिक माहीती www.gacchivarchibaug.in