आमची शेती नसली तरी गच्चीवरची बाग हे आमचे छोटेसे शेतच आहे | Small Farm | Terrace Farming

शेती म्हणजे निसर्गाची सोबत असते. जी आपल्याला सर्वार्थाने समृध्द करत असते. शेती नसली म्हणून काय झालं? शहरात राहूनही आपल्याला उपलब्ध जागेत शेती करता येते. त्यात विषमुक्त भाज्या उगवता येतात. योग्य मार्गदर्शन लाभले तर शेतीचा आनंद घेता येतो. मानवासाठीच अन्न सुरक्षा म्हणून न पहाता त्यात पर्यावरण जपणे, जैवविवधतेला वाव देणं हा फार गरजेचे आहे. जागतिक चिमणी संवर्धनाच्या दिवसानिमित्त देशपांडे कुटुंबाने पर्यावरण जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न आपल्यालाही आवडेल.