Site icon Grow Organic

इंजीनिअर, प्रोडक्ट डिझाईन शिकणार्या विद्यार्थांसाठी शिकण्याची संधी

Advertisements

Instrumental Projects

गच्चीवरची बाग ही पर्यावरण संवर्धन करणारी पर्यावरणीय उदयमशील उपक्रम आहे. कचरा व्यवस्थापन हा मुख्य मुद्दा त्यात अधोरेखीत आहे. तसेच शेती पुरक काम असल्यामुळे त्यात श्रमांची गुंतवणूक व पर्यायाने मजूरी फार खर्च होते.

आम्ही पर्यावरणाचे हे काम पुढे नेतांना त्यात काही स्वयंचलित यंत्राचा उपयोग झाला तर आमच्या कामाचा उरक वाढेल तसेच कामाची व्याप्ती आणखी वाढवता येईल.

यासाठी आपल्या किंवा आपल्या ओळखीच्या इंजीनिअर, प्रोडक्ट डिझाईन शिकणार्या विद्यार्थाना शिकण्यासोबत थोडक्यात प्रोजेक्ट असाईनमेंटसाठी गच्चीवरची बाग सोबत काही सांगड घातली तर खूप सारी मदत होऊ शकते.

आम्हाला खालील सहा कामांसाठी फूल्ली किंवा सेमी अटो स्वरूपात संयंत्राची गरज आहे.

माती, पालापाचोळ्याचा (बिशकॉम) चुरा हा पाटीने किंवा फावड्याने भरणे हे वेळखाऊ व मजूरी न परवडणारे काम आहे. या साठी स्वयंचलित असे छोटे यंत्र बनवता येईल का?

बिया रूजवण्यासाठी माती, बिशकॉम व खत एकत्र करून त्यापासून बिया रूजवण्यासाठी कप तयार केले जातात. त्याचे मिश्त्रण हे लंबगोलाकार म्हणजे जूने रेडिओ किंवा टॉर्चचे सेलच्या आकाराचे बनवायचे आहेत.

वाळलेला पालापाचोळयाचा चुरा (बिशकॉम) हे भूरभूरीत व वजनाला हलका असा जैविक कचरा आहे. त्याचे हायड्रोलिक प्रेस करून विटा तयार करता येतील का ? ज्यांची जागा कमी झाल्यास त्यांस संग्रहीत करणे सोपे जाईल तसेच वाहून नेणे, कुरिअर करणे कामी सोपे होईल. थोडक्यात त्याचा व्हॅल्यूम (आकार) कमी करणे गरजेचे आहे.

फाईन बिशकॉम साठी स्वयंचलित चाळणी यंत्र बनवणे. बिशकॉम ह जाडे भरडे असते. ते फाईन स्वरूपात मिळाल्यास त्याचा खत म्हणून वापर करता येवू शकेन असे सेमी अटो यंत्र तयार करता येईल का.  या उपयोग माती चाळणे, खत चाळण्यासाठीही होऊ शकतो.

लांब फांद्या, नारळाच्या पानांच्या झावळ्या, शहाळ इं फाईन स्वरूपात बारिक करण्यासाठी श्रेंडीग मशीन उपलब्ध आहे. त्याला पेट्रोलवर आधारित इंजिन उपलब्ध आहे. पण त्यास इलेक्ट्रीकवर आधारित बनवावयाचे आहे.

गच्चीवर बागेसंदर्भातले साहित्य विटा, माती पोहचवण्यासाठी मजूरांची, श्रमांची फार गरज असते. त्यांचे श्रम कमी करण्यासाठी, पुली टाईप आपल्याला काही सेमी अटो सयंत्र तयार करता येईल का…

Exit mobile version