उकीडवे बसण्याचे फायदे…

मला जसे कळायला लागले.. तेव्हापासून वडील नेहमी बाहेरून आल्यानंतर सांगायचे बसून पाणी प्यावे.. हा विषय मी त्यांच्याशी बरेचदा बोललो पण त्याचे काही त्यांना तर्कशुध्द उत्त्तर देता आले नाही. पण कालांतराने हा विषय माझ्या डोक्यात बसला तो बसलाच… नि अभ्यास सुरू झाला.
पाणी पितांना का बसावे … याची उत्तरे शोधतांना काही बसण्याच्या स्मृती लक्षात आल्या..
जेवतांना, चहा पितांना, शौचास, लघवीला बसतांना, अंगोळीला, पुरूष व स्त्रिया सुध्धा बसतांना उकीडवे बसतात. उदाः अगदी भारतीय आदीवासी गावात फिरतांना, आफ्रीकेतील झिंम्बॉबें येथे वास्तव्यास होतो तेथेही लक्षात आले.
काही दिवसापूर्वी माझे घुडगे दुखू लागले. माझ्या लक्षात आले की आपण जे दिवसभर पाणी, चहा, सरबत पितो हे विषेशता उभे राहून पितो.. त्यात बदल करणे गरजेचे आहे.
मी महिनाभर उकीडवे बसून पाणी पिऊ लागलो. माझी घुडगे दुखी गायब झाली. मला वडीलांचे शब्द आठवले. मी पुन्हा उभे राहून पाणी पिऊ लागलो. तर पुन्हा घुडगे दुखी सुरू झाली. आता मी उकीडवे बसूनच चहा, पाणी पितो. (फक्त घरी कारण समाज शिष्टाचार म्हणून उकीडवे बसावे हे शोभणार नाही)
मी नाशिक परिसरात काही आदीवासी गावात विषमुक्त शेतीसाठी जाणीव जागृतीचे काम करत होतो. तेथे एकदा सहभोजनाचा कार्यक्रम होता. त्यांनी आपापले जेवण ताटात घेवून बांध्यावर जावून उकीडवे बसून खाल्ले. मला तेव्हा खूप राग आला होता.. की काय हा असंस्कृतपणा… हा बसण्याचा विषय तेव्हाही डोक्यात राहिला.
आजही गावात, आठवडी बाजारात गेला तर वृध्द मंडळी चहा, पाणी, नाष्टा एव्हांना हातावर चटणी भाकर घेवून उकीडवेच बसतात. आफ्रीकेतील झिंम्बॉबें येथे गेलो तेव्हां सुध्दा तेथील स्थानिक लोक उकीडवे बसूनच जेवतात.
एवढच काय कामाख्या मंदीराला भेट दिली तेव्हा सुध्दा कामाख्या देवीची मूर्ती सुध्दा उकीडवे बसूनच प्रसवतांना दिसते. काय कारण आहे… या उकीडव्या बसण्यामागे…
काही गोष्टी लक्षात आल्या.. उकीडवे बसून चहा पाणी, नाष्टा केल्याने ओटी पोटाचा भागावर दाब येतो. भोजनाचे सेवन कमी होते. शौच्याला व लघवीला बसतांना ओटी पोटीवर दाब येऊन त्याज्य गोष्टी त्यागण्यास मदत होते. बाळ जन्माला घातलांना प्रसव वेदना कमी होत असाव्यात, ओटी पोटी वर दाब येऊन बाळ लवकर बाहेर येण्यास मदत होत असावी.
उकीडवे बसून पाणी, चहा पिल्याने घुडगे दुखी तर जातेच काम करण्यास उत्साह व हुशारी येते. हुरूप वाढतो. मुतखड्याच्या त्रास असणार्या पुरूषांनी तर लघूशंकेस जातांनाही उकीडवे बसून केल्यास हा त्रास जन्मात कधीच होणार नाही असे वैद्यानी सांगीतले होते. (सार्वजनिक ठिकाणी हे शक्य नाही. पण घरी नक्कीच हा प्रयोग करता येईल) आजही ग्रामीण भागात धोतर घातलेली मंडळी बसूनच लघवी करतात.
आपली भारतीय संस्कृती ही अनुभवाने शिकत आली आहे. त्यांना नाडी परिक्षणावरून आरोग्याच्या तक्ररी काय आहेत हे कळत असे… तेव्हा आजच्या साऱखी तंत्रज्ञान विकसीत नव्हते तरी लोक आपआपले आरोग्य सांभाळत होते. भले त्यांच्या कडे त्याचं रास्त कारण नसेल पण आपण शिकलेल्या मंडळींनी ते शोधणे, त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.
या गोष्टी टाळा…
सहभोजनासाठी डायनिंग टेबल टाळावा. उकीडवे बसण्याच्या खालोखाल मांडी घालून बसणे हे उत्तर बैठक व्यवस्था आपल्या कडे प्रचलीत आहे. शौचासाठी भारतीय बैठकच, शौचाचे भांडे वापरावीत. परदेशी पध्दतीचे भांडे टाळावे. अंगोळीला शॉवर खाली उभे राहून, छोट्या बैठ्या टेबलावर बसून अंगोळ करण्यापेक्षा उकीडवे बसूनच अंगोळ करावी.
बघा आपणही हा प्रयोग केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. आपल्याला काय परिणाम येतात. हे कळवा..
सावधानः ज्यांना घुडगे दुखीचा खूपच त्रास असल्यास त्यांनी हा प्रयोग आपल्या जबाबदारीवर करावा. ज्यांना या त्रासाची सुरवात आहे.. त्यांनी नक्कीच करून पहावा.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.