ऑक्टोबर महिण्यात बागेत करावयाची कामे…
ऑक्टोबर महिना हा बागेसाठी फार महत्वाचा आहे. कारण ऑक्टोबर महिना हा पावसाळा ऋतू संपून हिवाळा ऋतूची सुरवात होणार असते. हिवाळा हा पुढे फेब्रुवारी पर्यंत असतो. या काळात वातावरणातील तापमान बर्यापैकी खाली आलेले असते. या काळात नव्याने बिया रूजणे जरा अवघड असते. त्यासाठी निसर्गाने पावसाळी हवामानानंतर बिज अकुंरण्यासाठी ऑक्टोबर हिटची तरतूद केली आहे. असो..
तर या ऑक्टोबर महिण्यात पुढील प्रमाणे कामे करणे फार गरजेचे आहे.
माती वाळवून घ्या… पावसाळ्यात सतंतधार पावसामुळे म्हणा किंवा रिपरिपीमुळे माती घट्ट झालेली असते. काही भाजीपाला आता पूर्ण तयार होऊन निघालेला असतो. अर्थात काही कुंड्या, वाफ्यातील जागा रिकामी झालेली असते. अशा वेळेस नव्याने बिया लावण्यासाठी किंवा रोपे लावण्यासाठी माती ही वाळलेली असणे फार गरजेचे आहे. माती सतत ओली असल्यामुळे त्यात विषाणूची, मातीतील किडीची वाढ झालेली असते. ही वेळीच नियंत्रण होण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे. माती वाळवण्यामुळे मातीत किड, विषाणू हे मरून जातात. त्यांचे जैवखत हे मातीत मिसळते व त्यांचे खत हे पुढील झाडांसाठी उपयुक्त ठरते. तसेच माती वाळवल्यामुळे बियाणं रूजवण्यासाठी पोषक जागा तयार होते. ओल्यामातीमुळे बियाणं हे रूजत नाही. कारण त्यात काही हानीकारक तत्वांची, रसायनांची गंधाची वाढ झालेली असते. त्यामुळे बियाणें शभंर टक्के रूजण्यासाठी माती वाळवणे गरजेचे आहे.
कोणत्या बियाणे लागवड कराल.. या महिण्यात सर्वच प्रकारच्या बियाण रूजण्यासाठी पोषक असते. तसेच पालक, धने, भेंडी, गवार, कारले या सारख्या नाजूक बियांसाठी ऑक्टोबर हिट पोषक असते. तसेच काकडी, ढेमसे, एक्सोटिक्स भाज्यांची बियाणे व रोपे रूजण्यासाठी पोषक आहेत.
रिपॉंटींग साठी योग्य काळः ऑक्टोबर नंतर तुम्ही जानेवारी पर्यंत कुठल्याही काळात जून्या झाडांची माती बदलावयाची असल्यास थोडक्यात रिपॉटींग साठी योग्य काळ असतो. कारण वातावरणातील गारव्यामुळे रिपॉटींग केलेल्या झाडांच्या मुळांना शॉक बसत नाही. थोडक्यात झाडे मरत नाही.
ही काळजी घ्या.. परतीचा पाऊस लांबला असेल अर्थात तो येत असेन तर थोडा धिऱ धरा. कारण वातावरणात उष्मा वाढलेला असला तरी येणार्या पावसामुळे बियाणे हे सडू शकते. तर कधी कधी ऊन पावसामुळे बियाणे जोमानेही रूजून येते. हे प्रयोग करत राहिले पाहिजे. एकाद्या वेळेस अपयश आले तर माघार घेवू नका. पुन्हा पुन्हा बियाणे लागवड करत रहावी.
झाडांची कंटीग करावीः उन्हाळ्यात येणार्या फुलांच्या झाडांची आता कंटीग करण्याचा काळ योग्य आहे. वाढल्या तापमानामुळे त्यास जोमाने फुटवा येतो. उदाः मोगरा, गुलाब, कंदवर्गीय फुलेझाडे. इ. तसेच मोठ्या झाडांची हलकी छाटणी करणे गरजेचे असते.
आगावू खताची तरतूद आधीच करून ठेवाः पुढील काही महिण्यात झाडांची अन्न बनवण्याची प्रक्रिया ही मंदावलेली असते. अशा वेळेस त्यांना वरखतातून पोषक द्रव्ये, खतं देणे गरजेचे असते. अशा वेळेस हाताशी उत्तम प्रकारे शेणखत असणे गरजेचे असते.
संदीप चव्हाण, गच्चीवची बाग, नाशिक. 9850569644