नमस्कार, मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. आपल्याला माहितीच आहे की गच्चीवरची बाग हा पर्यावरण संवर्धन करणारा उपक्रम आहे. मी आपल्याला खास अशा एका विनंतीसाठी हा लेख लिहीत आहे. कृपया थोडा वेळ काढून हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही विनंती.
गच्चीवरची बाग नाशिक Grow, Guide, Build, Products, Sales N services या पाच विभागात काम करत आहे. (सध्या कोव्हीड १९ मुळे फक्त क्रं दोनचं काम Guide जोरात सुरू आहेत) तर लोकांना विविध माध्यमांव्दारे मार्गदर्शन करणे, त्यांचे शंका निरसन करणे, त्यांना घरी भाजीपाला उगवण्यासाठी व कचरा व्यवस्थापनासाठी प्रेरीत करणे हे काम सुरवातीपासूनच करत आहोत. पुढेही करत राहणार आहे.
विविध सोशल मिडीयावर लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. या माध्यमात You Tube हे व्यासपिठ सुध्दा येते. गच्चीवरची बाग विषयी काम सुरू झाले तेव्हां या माध्यमांकडे दुर्लक्ष झाले. अर्थात त्यातले काही कळत नाही, ते अवघड आहे, तांत्रिक साधनांची गरज असते. या मुळे त्यावर गच्चीवरची बाग विषयी व्हिडीओ टाकणे टाळत होतो. पण कोव्हीड १९ मुळे हाताशी वेळ मिळाला. तसेच जे टाळायचे होते ते करावेच लागले. म्हणजे यू ट्यूब चॅनलवर फिल्म विषयी शिकत, सवरत ते माध्मय लोकांपुढे न्यावे लागले. कारण लेख लिहणे हे सोपे व यात हातखंडा असला तरी लिखाण हे माध्यम सर्वांनाच आवडते असे नाही. पण यूट्यूब हे माध्यम सर्वांनाच आवडते.
या माध्यमाचे वैशिष्ट्य म्हणजे जितके लोक व्हिडीओ पाहतील त्यातून थेंब थेंब पैसे साचून पैशाच्या रूपात परतावा मिळतो. ( खरं तर पैशा पेक्षा ही प्रक्रिया एकदाची पूर्ण करणे गरजेचे आहे)आम्ही या माध्यमांवर काम करायला सुरवात केली. कारण यातून गच्चीवरची बाग या पर्यावरणीय उपक्रमाला आर्थिक हातभार लागेल म्हणून जानेवारी २०२१ पासून पूर्ण क्षमतेने सुरवात केली. आता या कामाला नऊ महिने पूर्ण होताहेत.
या माध्यमातून पैसे मिळवायचे असतील तर काही अटी असतात. एक हजार सब्जक्राईबर पूर्ण होणे. तो आम्ही नुकताच पूर्ण केलाय. दुसरी अट असते. चार हजार तास पूर्ण करणे. त्यातील फक्त नऊ महिण्यात दीड हजार तास पूर्ण झाले आहे. येत्या शंभर दिवसात म्हणजे ३१ डिंसेंबर २०२१ पर्यंत अडीच हजार तास पूर्ण करायचे आहेत.
आणि त्यासाठी तुमची रोजच मदत लागणार आहे. कारण हे तीन महिण्यात पूर्ण झाले नाही तर पुन्हा नव्याने सुरवात करावी लागणार. आणि हे फार टफ वर्क आहे. त्यासाठी पुन्हा वेळ मिळणे कधीच शक्य होणार नाही.
हे अडीच हजार तास पूर्ण करण्यासाठी आपली पुढील प्रमाणे मदत हवी.
या यूट्यूब चॅनेलचे सब्सक्राईब्रर वाढीसाठी याचे सदसत्व घेणे.
Home Grow vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक व्दारे प्रकाशीत झालेले अथवा तुमच्या पर्यंत आलेले व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करणे,
व्हिडीओ खाली आपल्या प्रतिक्रिया देणे. (चांगली वाईट काही चालेल पण मनापासून द्या)
बरीच मडळी व्हाट्स अपवर प्रतिक्रिया नोदंवतात.
या माध्यमांतून मिळणारी मदत ही पुढील कामासाठी वापरण्यात येणार आहे.
- ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
- http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे.
- फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
- एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.
- ई पुस्तके प्रिंन्ट स्वरूपात प्रकाशीत करणे
- http://www.organic-vegetable –terrace-garden.com हे संकेतस्थळाचा खर्च (डोमेन नेम, होस्ट प्लेस, वाय फाय इ. खर्च भागवणे.) वर्षभऱाचा खर्च २५ हजार ईतका आहे. तो आताच्या परिस्थिती पुढे नेणे अवघड खूपच अवघड झाले आहे. पण हे संकेतस्थळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. तसेच खर्या अर्थाने मार्गदर्शक ठरत आहे.
- फिल्म बनवण्यासाठी सध्या मित्राचा मोबाईल व कॅमेरा वापरतोय. तो स्वतःचा घेणे
- एडिटिंग साठी लागमारे फिल्ममोरा सॉफ्टवेअर विकत घेणे.
गच्चीवरची बाग हा व्यावसायिकरित्या जरी चालवत असलो तरी त्यामागील खरे काम लोकांना शिक्षित करणे हाच आहे. व ते निशुल्क करत आहोत. खर ती आमची खाज (पॅशन) आहे. तिला जिवंत ठेवण्यासाठी प्लीज लेखात सांगितल्या प्रमाणे आमचा चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. हे फक्त ३१ डिंसेबंर २०२१ पर्यतंच करायचे आहे.
हे आता नाही तर कधीच होणार नाही. आणि आम्ही पण या माध्यमांवर पुन्हा काम करणार नाही असे ठरवले आहे. कारण यात तन,मन, धन सारेच गुंतवले आहे. याहून जास्त गुंतवणूक आता होणार नाही. कारण वाढत्या वयात दृष्टी अधू होत चाललीय. तासन तास संगणकावर बसणे त्रासदायक होत आहे.
तेव्हां हे सारे तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे.
कारण हे पर्यावऱण संवर्धनाचे काम आहे. कृपया लेखात सांगीतल्या प्रमाणे मदत करावी. किमान हा लेख तरी इतरांपर्यत पोहचवा. ही कळकळीची विनंती.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.