गच्चीवरची बागेला ३१ मार्च 23 रोजी 23 वर्ष पूर्ण होताहेत … या 23 वर्षात आम्ही काय काय साध्य केलेय त्याचा हा प्रवास… आपल्या समोर मांडत आहेत. आपल्याला आवडल्यास नक्कीच लेखाखाली प्रतिक्रिया नोंदवा…
फुलू लागलीय गच्चीवरची बाग ….गेल्या पंधरा वर्षापूवी शेतकर्यासोबत काम करता करता सेंद्रीय शेतीची गरज लक्षात आली. त्यामुळे शेती घ्यायची असं ठरवले. आधी घर की शेती अश्या व्दिधा अवस्थेत असलेले मनाने प्राथमिक गरज म्हणून घराची निवड केली. तसेच गगणाला भिडलेले शेतीचे भाव पाहता शेती विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे अपार्टमेंट मधील फ्लॅट घेण्यापेक्षा रो हाऊस घेण्याचे ठरवले आणि सुरवात झाली बागेला
ती पण एका कुंडीपासून अर्थात गच्चीवरच्या बागेला.
रोजचीच कचर्याची समस्या त्याचं करायचं काय व वाढत्या शहरीकरणासोबत ही समस्या वाढतच जाणार असा प्रश्न बारावीत असल्यापासून मनात होताच. त्यावर उपाय शोधले पाहिजेत तेव्हा या कचर्याचं आणि बागेची सांगड घातला येईल का हाही मुद्दा पिच्छा पुरवत होताच. मग सुरू झाले कचर्याचे प्रयोग. प्रयोग कसले वेगवेगळे खेळच म्हणा हवं तर .. छंदातून सुरू झालेले हे प्रयोगातून वेस्ट कंपोस्टिंगचे एक एक सुत्र, विज्ञान लक्षात येवू लागले आणि त्यातून तयार झाली गारबेज टू गार्डन ही संकल्पना अर्थात गच्चीवरची बाग…
उपलब्धतेचा मंत्र… बाग फुलवण्यासाठी हवी फक्त इच्छा शक्ती, 250 मिली ग्रॅमच्या दूधाच्या पिशवी पासून, शितपेयांच्या बाटली पासून तर वाफ्यांपर्यंत अश्या कोणत्याही उपलब्ध वस्तूत बाग फूलवता येते. तसेच विंडो ग्रिल, टेरेस, बाल्कनी जमीन अश्या कोणत्याही व कमीत कमी जागेत बाग फूलवता येतेच पण शिवाय उपलब्ध नैसर्गिक संसाधने उदाः नारळाच्या शेंड्या, ऊसाचे चिपाट, पालापाचोळा, वाळलेलं किचन वेस्ट अश्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करता येतो.
विस टक्के मातीत फूलवली बाग… बाग फूलवण्यासाठी शंभर टक्के मातीची गरज नाही. कुंडी किंवा वाफा भरताना नारळाच्या शेंड्या, ऊसाचे चिपाट, पालापाचोळा, वाळलेलं किचन वेस्ट व सर्वात वरती माती असे पाच घटक २० -२० टक्के वापरले तरी बाग उत्तम प्रकारे फूलवता येते.
अनुभवावर आधारीत पुस्तकाचे लिखाण…गच्चीवरची बाग नावाचे स्व:अनुभवावर आधारीत पुस्तिका प्रकाशीत केली आहे. साध्या, सोप्या व सहज साध्य अशा पध्दतीमुंळे नव्याने बाग तयार करणार्यांसाठी ही पुस्तिका आजही मार्गदर्शक ठरत आहे. नुकतीच पुस्तकाची व्दितीय आवृत्ती प्रकाशीत केलीय.
तसेच लोकांनी बाग, कचरा व्यवस्थापन या विषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही छोट्या वाक्यात देण्याचा प्रयत्न मागील दोन वर्ष चालला होता. त्या स्वःलिखित उत्तरांचे तुम्हाला माहित आहे का नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशीत झाले आहे. खरं तर यातील वाक्य ही कार्यशाळेत वापरली जातात. यात नमूद केलेली वाक्य ही डोळे उघडणारी व नव्याने माहिती व ज्ञान प्रदान करणारी आहे.
लोकसत्ता- चतुंरग पुरवणीत गच्चीवरची बाग या नावाने वर्षभर सदर लिखाण केले. त्यास उभ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळालाय. त्याचप्रमाणे वृत्तपत्र व मासिकांसाठी लिखाण, व स्तंभ लेखन सुरू असते.
हिंदी भाषीक दाणापाणी या मासिकात प्रकाशन.. गच्चीवरची बाग या पुस्तकाचे महत्व ओळखून इंदोर स्थित संस्थेतर्फे दाणापाणी या मासिकात हिदी भाषेत लेखमाला प्रकाशीत होत आहे.
गच्चीवरची बागेसाठी नोकरी सोडली…पंधरा वर्ष नोकरी केल्यानंतर गच्चीवरील निसर्ग हाक देवू लागला. नोकरी की निसर्ग या निवडीत नोकरी सोडली व निसर्गाला जवळ करत कामाला सुरूवात केली गच्चीवरची बाग. तेच उपजिवकेचे साधन बनले.
ऑल इन वन वेस्ट कंपोस्टर…घरात तयार होणारा हिरवा कचरा, खरकटे अन्न, पालापाचोळा व साबण विरहीत खरकटे पाणी यांचा एकाच कंपोस्टर मध्ये कंपोस्टिंग करता येते. असे घरच्या घरी प्रत्येकाला तयार करता येईल असे कंपोस्टर वापरले जाते. त्याबद्दल मार्गर्शनही केले जाते. त्यात गांडुळे सोडली जातात. यातून द्रव, घन स्वरूपात खत तयार होते. सहा ते बारा महिने थांबण्याची तयारी असल्यास माती आणण्याची गरज नाही. ही खत रूपी मातीचा बाग फूलवण्यासाठी वापर केला जातो.
पाचशे घरात फुलतेय बाग…गेल्या सहा वर्षापासून नाशिक शहरात गारबेज टू गार्डन ही संकल्पना राबवत आहेत. आतापर्यंत पाचशे घऱात कचर्याचं व्यवस्थापनातून बाग फूलवून दिली आहे.
मार्गदर्शनासाठी तयार केले संकेतस्थळ…गच्चीवरची बागची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी www.gacchivarchibaug.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. त्याला रोज नवनवीन लोक भेट देत आहे. या संकेतस्थळामुळे बाग कशी फूलवता येते याचे काही माहितीपट, फोटो, लेख, बातम्या उपलब्ध आहेत त्यामुळे बर्याच मंडळीची विचारपुस वाढली आहे. https://organic-vegetable-terrace-garden.com/ या दुसर्या संकेत स्थळावर अदयावत माहिती प्रकाशीत केली जाते.
सोशल मिडीया वर मार्गदर्शन…9850569644 हा व्हॉटस अप व टेलेग्राम क्रं. सर्वासांठी उपलब्ध केला असून त्यावर व्यक्तिगत मार्गदर्शन करतो. तसेच फेसबुक वर गच्चीवरची बाग, छज्जा पर सब्जी, Organic Vegetable Terrace Garden, गच्चीवरची बाग नाशिक page असे फेसबूक पेजेस असून त्यावर रोज भाज्या, टेरेस गार्डन बद्दल नवनवीन अपडेट्स पाठवले जातात. त्यातून लोकांना घरच्या घरी बाग फूलवण्याची प्रेरणा मिळते तसेच Sandeep k C नावाचे फेसबूक वॉल आहे. याशी जोडून घेता येईल. या पेजेस व जगभरातील मराठी माणूस जोडला असून बागकामाविषयी आवड नोंदवत आहे.
ऑनलाईन गार्डेनिंग कोर्सः सदर गार्डेनिंग कोर्स हा मराठी व हिंदी भाषेत उपलब्ध आहे. त्या संबधीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देत आहोत.
👉 गार्डेनिंग के हॉबी को हिरे जैसे चमकांए.
🍀Gardening हमारे शरीर और मनस्वास्थ्य के लिए हितकारक है.
🌷 सुंदर बागवानी मन को प्रसन्न रखती है उससे मनस्वास्थ्य मिलता है.
तो घर की जहर मुक्त सब्जींया शरीर को स्वास्थ प्रदान करती है.
👉क्या आप अपने घर की सुरंगत से भरी एक सुंदर और उपयुक्त बागवानी बनाना चाहते हैं?
👉और आप बागवानी करते समय कुछ दिक्कते का सामना भी करते होंगे?
👉और इसके लिए आप परेशान होते होंगे?
👉अनुभवी मार्गदर्शक की जरूरत महसूस करते होंगे ?
पर अभी परेशान होने की जरूरत नहीं.
क्यूं की 23 साल का अभ्यास और 13 साल का फील्ड का अनूभव कोर्स के रूप में आप के लिए लेके आए है .
👉हमारा ऑनलाइन बागवानी कोर्स आपके लिए सटीक विकल्प है! हमारे विस्तृत कोर्स की पाठ्यक्रम व्यवसायिक एवंम अनुभवों द्वारा तैयार किया हैं और आपको बागवानी के सभी पहलुओं को समझाने में मदद करेंगे।
👉हमारा कोर्स सब्जी उत्पादन से लेकर बागवानी की योजना तक, मिट्टी विज्ञान, रोपण तकनीक, संचार, फसल संरक्षण, और बागवानी में उपयोग किए जाने वाले तंत्र और मंत्र तक शामिल होता है। आपको इंटरैक्टिव ऑनलाइन पाठ्यक्रम, वीडियो, प्रश्नोत्तरों के विकेंड सेशनका एक्सेस मिलेगा, जो आपको आपकी बागवानी की रफ़्तार से सीखने और हमारे विशेषज्ञों से व्यक्तिगत प्रतिक्रिया प्राप्त करने में मदद करेंगे।
👉चाहे आप एक नया बागवान हों या अनुभवी बागवान हों, हमारा कोर्स आपकी जानकारी और कौशलों को बढ़ाने में मदद करेगा। आप सीखेंगे कि कैसे अपनी खुद की सब्जियां, जड़ी-बुंटीया, फुल पौधे, धान उत्पादन के साथ साथ टेरेस गार्डेन, किचन गार्डन, विंडो गार्डेन, फार्महाऊस, खेती बाडी में भी ईस्तेमाल कर सकते है..
👉अगर आप गार्डेनिंग को लेकर कुछ बिझीनेस बनाना चाहते है या विस्तार करना चाहते है तो हमारे डिजिटल मीडिया के कौशल को आप प्राप्त कर सकते है.
👉50000/- का Online Gardening Course : one year membership: Full access in just 3565/- ( per day 10/- ) offer will close soon… More details
आएं हमारे मराठी और हिंदी भाषा में विस्तृत कोर्स की जानकारी निचे दि गयी लिंक व्दारा पांए
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Online gardening course *price growing plan*
Jan 23 : 1999/-
March 23: 2999/-
April 23 : 3650/-
June 23: 4999/-
End of year Target : 50000/-
*(आजही कोर्स खरीदे और पांए 50% Discount on next year on course registration )*
*ट्रायल सेशन अंटेड करे*: हर शनिवार और रविवार के दिन हिंदी और मराठी भाषा में gardening के बारे मे QnA session रात 9 बजे शुरू होगा … Wts app group या टेलेग्राम चॅनेल परही लिंक भेजी जाएगी.
*Grow organic wts app group join करे..*
https://chat.whatsapp.com/JCB3bIFYzAYGAyFI4Rmcn5
Join telegram channel join करे.
https://t.me/gbnashik
YouTubechannel https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
instagrame https://www.instagram.com/gacchivarchi_baug/
facebook page
http://bit.ly/2NutaGb
Join our facebook page
www.facbook.com/dr.bagicha
*Course Details*
https://www.groworganic.club/n2vhxa6o
Course details 👆
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. महाराष्ट्र. इंडिया से.. 9850569644
दोनशे लोक रोज बघतात चित्रफीत…इंदोर स्थित भारतीय सजीव कृषी समाज (OFAI) व्दारे गच्चीवरची बाग या कामाची दखल घेत पाच मिनीटांचा सज्जी पर सब्जी… (Hindi Organic Terrace Faring) माहितीपट बनवला आहे. तो यूट्यूब वर उपलब्ध असून त्यास रोज सरासरी २०० लोक बघतात. डिसेंबर २०१४ तयार झालेल्या माहितीपटाला आजपर्यंत 2 लाख ९० हजार लोकांनी पाहिला आहे. त्यावर संपर्क क्र दिला असल्यामुळे गोवा, नेपाळ, आसाम वरून बाग फूलवण्यासंबधीचे प्रश्न, शंका विचारले जातात. या माहितीपटामुळेच खर्या अर्थाने गच्चीवरची बाग ग्लोबल होत आहे. video
गच्चीवरील शेतीः एग्रोवन साम तर्फे माहितीपट….एग्रोवन साम तर्फे गच्चीवरील शेती माहितीपट तयार करण्यात आला. त्यामुळ राज्यातील इच्छुक शेतकर्यांतर्फे चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण १० मिनिटांचा माहितीपट हा सेंद्रिय शेतीचे महत्व विषद करतो. तसेच पालापाचोळा व घरच्या किचन वेस्टचे कसे व्यवस्थापन करावे याची माहिती यात दिली आहे. यूट्यूबर माहितीपट उपलब्ध आहे.
पूर्ण वेळ काम व रोजगार निर्मीती…घरोघरी बाग गारबेज टू गार्डन या संकल्पनेवर आधारीत बाग फूलवून देणे या विषयी, कंन्सलटंसी, सेटअप बिल्डींग, कार्यशाळा, आयोजीत केल्या जातात. या सार्या कामासाठी सध्या आमच्या कुटुंबातील पाच सदस्य व दोन व्यक्तिनां रोजगार उपलब्ध झाला आहे.
वसुंधरा मित्र पुरस्कार मिळाला…झिरो वेस्ट ही संकल्पना घरी साकारल्यामुळे किर्लोस्कर समुहाव्दारे आयोजीत होणारा वसुंधरा फिल्म फेस्टीव्हल व्दारे २०१५ या वर्षी वसुधंरा मित्र हा पुस्कार मिळाला आहे.
भाजीपालानिर्मीती विषयीप्रेम,आवड व कौशल्य…भाजीपाला निर्मीती हीच आवड आहे. फुलांपेक्षा भाज्या ही रोजची गरज आहे. घरच्या भाज्या ताज्या, स्वादिष्ट व आरोग्यदायी असल्यामुळे त्याची लागवड केल्यास कुटुंबातही पसरबागेविषयी आवड तयार होते याचा विचार करूनच भाजीपाला निर्मीतीत कौशल्य विकसीत करत आहे.
परदेशात अभ्यास व मार्गदर्शन…रसायनमुक्त शेती हा आवडीचा आहे. त्यामुळे विषयाच्या अभ्यासाठी महाराष्ट्रातील तसेच भारतभरातील कचरा व्यवनस्थापन, व विषमुक्त शेतीचा अभ्यास तर केलाच पण त्यासोबत थायलंड व झिम्बॉंबे येथेही महिनाभर वास्तव्य करून परसबागेचा अभ्यास केलाय. २००५ पासून सुरू झालेल्या या अभ्यासाला आता दीड तप पूर्ण होतेय.
सातत्याने विविध प्रयोग…पारंपारिक शेती कशी करत होते. याचा अभ्यास करत त्याची माहिती घेत तेच तंत्र आपल्या कुंड्या, वाफे, गच्चीवरची बाग आणण्याचे प्रयत्न करतोय. कचरा व्यवस्थापनासाठी कोणतेही कंपोस्टिंग कल्चर, पावडर न वापरता नैसर्गिक पध्दतीने खत तयार करता येते. यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतो. बाजारमुक्त परसबाग फूलवता येते. यावर माझा ठाम विश्वास आहे.
प्रचार प्रसारासाठी केले स्पर्धेचे आयोजन…गारबेज टू गार्डन व उपलब्धतेच्या तंत्रात भाजीपाल्याची विषमुक्त बाग फुलवता यावी. यासाठी घराघरात संदेश जावा यासाठी गच्चीवरची बागेची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पदरमोड करत रोख विजेत्यांना पारितोषिक व पुरस्काराचे स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.
गारबेज टू गार्डन साठी घेतोय मार्गदर्शन वर्ग…सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन तर केले जातेच पण ज्यांना प्रात्यक्षिक करून बाग कशी फूलवावी यासाठी स्लाईडशो व्दारे मार्गर्शन केले जाते त्यात कचर्याचं व्यवस्थापन उपलब्ध जागा, खेळती हवा व निर्माण होणारा कचरा व कुटुंबाच्या हाताशी असणारा वेळ या नुसार कंपोस्टिंग सेटअप सुचविला जातो. मार्गदर्शनासाठी पूर्वी दिव्य मराठी व आता महाराष्ट्र टाईम्स सोबत कार्यशाळा आयोजीत केल्या जातात.
शाळाशाळात हा विषय पोहचवा यासाठी धडपड …कचरा व्यवस्थापनावरचा सृजनशील व रामबाण उपाय म्हणजे गच्चीवरची बाग हा विषय मुलांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. कारण तेच उदयाचे सूजाण नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळेत निसर्गाविषयी संस्कार होणे गरजेचे आहे यासाठी पाचवी ते आठवीच्या मुलांपर्यंत पोहचावा यासाठी मोफत मार्गदर्शनाची तयारी आहे. त्यासाठी शासकीय व खाजगी शाळा संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे. सध्या नाशिक मधील प्रयोगशील शाळा आनंदनिकेतन शाळेत मुलांना दर शनिवारी हा विषय शिकवला जात आहे.
पर्यायी जीवनशैलीचा अवलंब…आजच्या कचरा निर्मीतीला आपली आधुनिक जीवनशैलीच कारणीभूत आहे त्यामुळे आपण पर्यायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास कचर्याचा प्रश्न सुटू शकेल यासाठी गारबेज टू गार्डन, सुतकताई सोलर पेटीचा वापर, गाय पालन करत आहे.
गावरान बियाणांचे जतन व संवर्धन व विक्री… संकरीत बियाणांपेक्षा गावरान बियाणं हे महत्वाची आहेत. त्यांच्यात रूजवण क्षमता व औषधी गुणधर्म अधिक असल्यामुळे नष्ट होत जाणारे वाण गोळा करून त्यांची लागवड करून त्यांचे जतन संवर्धन केले जाते. व त्याची छोटया प्रमाणात विक्री सुध्दा केली जाते.
सिंलेडर एवढाले डांगर…घराच्या संरक्षण भिंतीबाहेर लावलेला डांगराच्या बियाणाला केवळ घरातील खरकटे पाणी देत राहिलो. त्यातून दोन डांगर तयार झाले. एक-एक डांगर सिलेंडर एवढ्या आकाराचे व ३०-३० किलो वजनाचे होते.
बागेत सर्वच प्रकारचा भाजीपाला…बागेत सर्वच प्रकारच्या पालेभाजी, कंदमुळ, वेलवर्गीय, व फळभाज्या घेतल्या आहेत. कोणतेही शेडनेट न टाकता भाजीपाला तयार केला.
गांडूळ हीच खरी मित्र मंडळी…गांडूळ हा शेतकर्याचा मित्र असतो असे आपण शाळेत शिकलो आहोत. पण त्याचा प्रत्यक्ष वापर गच्चीवरच्या बागेत करायला हवा. त्यांची संख्या, वावर वाढला की बाग फलदायी, फुलदायी बनते. त्यामुळ सुका कचरा हा कधी कधी पोत्या पोत्याने भरून आणावा लागतो.
विरोध मावळला…कचरा त्यातल्या त्यात गच्चीवर शेती… या विषयाला बायको व शेजारीही विरोध करत होते. पण विषयाची व्याप्ती, प्रयोगाचीं यशस्वीता लक्षात येत गेल्याने आता विरोध मावळला आहे.नैसर्गिक बाग फुलवण्यासाठी देशी गायीचे पालन केले आहे. तिच्या शेण व गोमुत्राचा उपयोग नैसर्गिक कीडनियंत्रक, संजीवक बनवण्यासाठी व खत तयार करण्यासाठी केला जातो.
प्रचार प्रसारासाठी सॅकची कल्पना….गच्चीवरची बाग या संकल्पनेची इच्छुकांना माहितीव्हावी यासाठी पाठीवरील सॅकवर गच्चीवरची बाग अशी नेमप्लेट तयार करून प्रदर्शीत केली आहे. त्यामुळे गाडीवरून प्रवास करतांना लोक कौतुकाने बघतात. तसेच सिग्नलवर उभे असता त्याचे फोटो काढले जातात व नंतर संपर्क केला जातो. पाठीवरील बॅगेतच सारे कार्यालय सामावले आहे.
सध्या नाशिककरांच्या जाणीव जागृतीसाठी व दैनदिंन उपयोगासाठी छोटा हत्ती टाईप गाडी घेण्यात आली आहे. त्याव्दारे लोकांमध्ये जागृती घडवून आणत आहोत.
दहा ट्रक पालापाचोळा रिचवला…नाशिक येथील एका शेतात भाजीपाल्याची बाग तयार केली आहे. त्यासाठी विटांचे २००० वर्ग फूटाचे वाफे तयार करण्यात आले. हे वाफे भरण्यासाठी दहा ट्रक पालापाचोळा रिचवण्यात आला. हा पालापाचोळा जॉगिंग ट्रकवर गोळा करण्यात आला. हा पालापाचोळा जाळून टाकण्यात आला असता. तो या कामासाठी उपयोगात आणून एकप्रकारे वायू प्रदुर्षनापासून शहराला वाचवले आहे.
घरची टेरेस वरील बाग व इच्छुकांच्या बागा फुलवून देतांना मोठ्या प्रमाणात सुका पालापोचोळ्याचा वापर केला जातो. त्यासाठी वर्षभर सिमेंट्च्या आकाराएवढ्या २५०० पोती पालापाचोळा हा उचलला जातो. त्याचा वापर भाजीपाल्याचे बेड तयार करण्यासाठी केलाा जातो.
प्लास्टिकचे तुकडे जमा करतो…. ८० टक्के पालापोचळा व २० टक्के माती बाग फुलवण्यासाठी वापरतो. ८० टक्के पालापाचोळा गोळा करतांना छोटे छोटे असे असंख्य प्लास्टिकचे तुकडे आढळतात. ते इतरत्र कुठे फेकून न देता ते पोत्यात भरून घंटागाडीस दिले जातात. आतापर्यंत मागील सहा वर्षात साठ लाख तुकडे जमा केले आहेत.
संकट हीच संधी …सध्या नाशिकमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. पाणी रोजच्या वापराला पुरत नसल्यामुळे सध्या गच्चीवरील माती वाळवून ठेवली आहे. माती वाळवणे ही गरजेचे असते. कारण सातत्याने माती ओली राहिली असता ती उत्पादन देत नाही. म्हणून पाणी टंचाईचे संकट हीच संधी मानून बाग नव्याने पूर्नभरीत केली आहे.
व्हिडीओ व्हालेंटिअर तर्फे देशपातळीवर बातमी…व्हिडीओ व्हालेंटिअर ही संस्था असून मानवीहक्क व पर्यावरण विषयी दृष्यमाध्यमांव्दारे बातमी तयार त्याविषयी जनमत तयार केले जाते. वाढत्या कचर्यांच्या समस्येवरील सृजनशील उपाय म्हणजे गच्चीवरची बाग होय. कचरा व्यवस्थापन शुन्य पैशात, सहज सोप्या पध्दतीने व्यवस्थापन करता येते हे या माहितीपटातून दर्शविले आहे.
आमचा हा व्यवसाय नाही.. तर पर्यावरणासंबधी जाणीव पूर्वक काम करण्याची ही आमची, कुटुंबाची बांधिलकी आहे. जी केवळ सेवा देत नसून लोकांच्या शिकण्याला व बागेला फूलवत आहोत.
संदीप चव्हाण, नाशिक, ईमेलः sandeepkchavan79@gmail.com
Wts app: ९८५०५६९६४४ www.gacchivarchibaug.in
खूप छान उपक्रम
This is very nice and useful social, environment friendly activity. I have also took training and thought from Mr Sandip. I fillow him. My small garden gives me pleasure. Small birdies and colourful butterflies visits the plant and make me more happy .. its very unique experience to watch the miracles of nature. Thank you Sandipji.. you added more happiness in many lives…
Thank you
Kup chaan upakram ahe
Thanks for your comments
Good efferts. ..keep it up
Thank you so much