महाराष्ट्र टाइम्स व गच्चीवरची बाग नाशिक आयोजित गच्चीवरची बाग कार्यशाळा

गच्चीवरची बाग कार्यशाळा, गच्चीवरची बाग कार्यशाळा, 10 फेब्रु.19, रवि. स. 10 ते दु.1, समाजमंदिर, कृषीनगर हौसिंग सोसा. , कृषीनगर , कॉलेजरोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे

ही कार्यशाळा सशुल्क असून महाराष्ट्र टाइम्स च्या कल्चर क्लब तर्फे व गच्चीवरची बाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत उपलब्ध जागा उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधने यांचा सृजनशील पद्धतीने उपयोग करून घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला कसा पिकवावा? घरच्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे,कीड नियंत्रण कसे करावे पाणी कसे द्यावे बीजसंस्कार कसे करावे याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.” गच्चीवरची बाग” व “तुम्हाला माहित आहे का ?” या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे स्वतः स्लाईड शो द्वारे सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्र टाईम सोबत ही चौथी कार्यशाळा असून यापूर्वी निसर्गप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याविषयी सविस्तर बातमी येईलच! वाचत रहा महाराष्ट्र टाइम्स!

http://www.gacchivarchibaug.in

WTS app : 9850569644