गच्चीवरची बाग पुस्तक

बागकाम पुस्तक मराठीमधे

Gardening Book in Marathi

बागकामाचे मूलभूत सुत्र शिकवणारे अनुभवातीत पुस्तक

प्रथम तुम्हाला धन्यवाद, आमची फेसबूक व इंस्टाग्राम वरील जाहिरात वाचून तुम्ही गच्चीवरची बाग या पुस्तकासाठी आवड दर्शविली या बद्दल मनापासून आभार. हा व्हिडीओ पाहिल्या शिवाय पुढे जावू नका. हा व्हिडीओ संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला पुढील माहिती उपयुक्त ठरणार आहे.

रासायनिक खते व औषधांचा दुष्परिणाम

रासायनिक खते व औषधांच्या भरमसाठ वापरामुळे आज मनुष्यच नव्हे तर सारे जिव विविध आजारांना बळी पडतो आहोत. तर दुसर्या बाजूला रसायनांच्या वापरामुळे जमिनी नापिक होत होत आहे. अर्थातच याचा दुष्परिणाम कुंड्या, बॅग, बाल्कनी, टेरेस, फार्महाऊस, पडीक जमीनीत पिकं घेतांना, झाडं वाढवतांना अनेक प्रश्नांना सामोरे जात आहोत. कारण कृषी प्रधान देशात शेती कामाला, उदयोगाला शेवटचं स्थान दिल गेलं. म्हणून अनेक लोक आपआपल्या परिने शिकण्याचा प्रयत्न करत आहात पण त्यात हवं तसं यश मिळत नाहीये. कारण आपण निसर्गच समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. आणि त्यासाठी तंज्ञाचे मत, अनुभवांचा उपयोग करून घेणं फार गरजेचं आहे.

संदीप चव्हाण यांच्या बद्दल

नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक. महाराष्ट्र, भाज्या उगवणे ही माझी पॅशन आहे व त्याबद्दल लोकांना शिकवणं हे माझे प्रोफेशन आहे. Grow, Guide, Build, Products, Sale n Services या पंचसुत्रीव्दारे मी व माझे कुटुंब काम करत आहोत. Guide या सुत्रातंर्गत आम्ही यूटयूब, फेसबूक, इंस्टाग्राम, कंन्टेन्ट ब्लॉग, व्हॉट्सअप व व्हेजेटेबल गार्डेनिंग कोर्स लॉन्च केला आहे. मागील २३ वर्षापासून मी बागकाम करतो आहे. निसर्गाशी जोडून घेण्याची तिव्र इच्छा व शेती करण्याची हौस म्हणून मी बागकामाला सुरूवात केली. उपलब्ध जागेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात, उपलब्ध साधनांमधे मी बाग फुलवायला सुरूवात केली. थोडक्यात कोणतीही गोष्ट बाजारातून न आणता आपण खिशाला परवडणारे बागकाम करू शकतो का ? कारण आज शेतीक्षेत्रात शेतकर्याची प्रचंड लूट चालू होती, आजही चालू आहे. तेचं दुखः शहरी शेती करणार्यासाठी होऊ नये म्हणून बाजारमुक्त गार्डेनिंग करण्याचा विचार केला. या विचारातूनच फुलां, फळांची व ऑरगॅनिक भाजीपाला उत्पादन घेण्यासंदर्भात सुरूवात केली. ही गोष्ट आहे वर्ष २००१ ची. तेथून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत आला आहे. या दरम्यान अनेक प्रयोग केले, अनेक अनुभव आले. या अनुभवांचे आम्ही डाक्यमेंटेशन अर्थात नोंदणी करत गेलो. जेणे करून त्यांचा सर्वांना उपयोग झाला पाहिजे.

प्रयोग व निश्कर्ष

कुंडी भरणे, बिया पेरणे, रोपे लागवड करणे पासून ते त्याची किडीपासून निगा राखणे, पाणी देणे अशा असंख्य गोष्टी शिकलो. यातून २०१३ मधे माध्यम क्षेत्रातील नोकरी सोडून पूर्ण वेळ कामाला सुरूवात केली व त्या अनूभवातून मी गच्चीवरची बाग हे पुस्तक तयार केले आहे. पहिल्या आवृत्तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुस्तक मराठीत असल्यामुळे व संकल्पनाच नविन होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचली. या पुस्तकांने मला महाराष्ट्रात स्वतःची ओळख तयार करून दिली व आता आम्ही हिंदी भाषेतून देशपातळीवर कामाला सुरूवात केली आहे. पहिल्या आवृत्तीला प्रचंड प्रतिसादामुळे व्दितीय आवृत्ती लवकरच प्रकाशीत करण्यात आली. त्यातील ही काही मोजकीच छापिल पुस्तके आता उपलब्ध आहेत. अर्थात एवढ्या वर्षात आम्ही ई पुस्तकांची प्रचंड विक्री केली. आता आम्हाला या पुस्तकांचा संपूर्ण स्टॉक क्लिन करायचा आहे. व भविष्यात फक्त ई पुस्तकांचीच विक्री करावयाची आहे.

वर्तमानाची गरज

आज प्रत्येकाला आपल्या घराभोवती, छतावरती ऑरगॅनिक पध्दतीने बाग फुलवण्याची इच्छा आहे. पण त्याची योग्य ती माहिती मिळत नाही. शिकण्याचे अनेक स्त्रोत सध्या उपलब्ध आहेत. पण ते शोधावे लागतात. त्यात अमुल्य असा वेळ तर खर्च होतोच पण अप्रत्यक्षरित्या शिकण्यासाठी खर्च केलेली किंमत आपण लक्ष्यात घेत नाही. तसेच एका खर्चिक अशा ऑनलाईन साहित्य खरेदीच्या सापळ्यात अडकून जातो. खर तर बाजारातील उपलब्ध साहित्य खरेदी करून बाग फुलवता येत नाही. त्यासाठी पहिल्यांदा आपल्या माहितीत, ज्ञानात भर टाकावी लागते. व शिकणं हे गरजचे आहे.

पुस्तकाबद्दलची माहिती

तर या पुस्तकात जवळपास आपल्याल १६ असे टॉपीक्स कव्हर करण्यात आले आहे. ज्यात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. वन एठ साईजची ही पुस्तिकेत ब्लॅक न व्हाईट रंगात प्रकाशीत करण्यात आली आहे. योग्य ठिकाणी चित्रांचा वापर करण्यात आला आहे. या पुस्तकात बागकामाला सुरूवात कशी करावी, बाग कशी फुलवावी, कीड नियंत्रके कशी तयार करावीत, कीड नियंत्रण कसे करावे, घरच्या घरी खतं कशी तयार करावीत, पाणी कसे द्यावे या सारख्या असंख्य गोष्टी यात आम्ही नमूद केल्या आहेत. अर्थात खाली दिलेल्या लिंक मधे सारांश ई पुस्तिका आहे. पुस्तक खरेदी करण्यापूर्वी सारांश पुस्तिका नक्की डाऊनलोड करून वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण ई पुस्तक किंवा छापिल पुस्तक घेण्याचा निर्णय घेता येईल. तुम्हाला हे पुस्तक आपल्या जवळ संदर्भ माहितीसाठी असावे किंवा कुणाला वाढदिवसाला सप्रेंम भेट म्हणून द्यावयाचे असेल तर नक्की या पुस्तकाची ऑर्डर नोंदवा. तुम्हाला संपूर्ण ई पुस्तक हवे असल्यास संपूर्ण ई पुस्तक डाऊन लोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्यावर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सारांश ई पुस्तक डाऊनलोड केल्यानंतर जी प्रक्रिया केली. तसेच प्रक्रिया करून तुम्हाला हे संपूर्ण ई पुस्तक तुमच्या फोनमधील डाऊनलोड या फोल्डर मधे मिळालेले असेल.

तुम्हाला छापिल पुस्तकाची ऑर्डर द्यावयाची असल्यास तुन्ही 9850569644 या संदीप चव्हाण यांच्या मोबाईल वर जी पे किंवा फोन पे कर शकता. तसेच लेखाखाली दिलेल्या आमच्या युट्यूब चॅनेल, फेसबूक, इंस्टाग्रामला फॉलो करा. मग आम्हाला गुगल वर शोधा. तेव्हां संपर्कात रहा, शिकत रहा, उगवत रहा, आरोग्य संपन्न रहा. धन्यवाद .

गच्चीवरची बाग विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा.

E Books https://www.instamojo.com/gacchivarchi_baug