Maharashtra Times | Updated: 06 Nov 2017, 04:00 AM
आपल्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ निसर्गासाठी काढणे खूप गरजेचे आहे. घरच्या घरी निसर्ग साकारायचा झाल्यास गच्चीवरची
बाग

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टरजल, जंगल, जमीन आणि नागरिक हे निसर्गाचे सूत्र आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून मानवाला कायम काही तरी मिळतच असते. पण, त्याचा सदुपयोग करणे मानवजातीला शक्य होत नाही. आजच्या बदलत्या लाइफ स्टाइलमुळे तर निसर्गाकडे मानवाचा कानाडोळा होत आहे. मात्र, आपल्या बिझी शेड्युलमधून थोडा वेळ निसर्गासाठी काढणे खूप गरजेचे आहे. घरच्या घरी निसर्ग साकारायचा झाल्यास गच्चीवरची बाग हा खास प्रकल्प आहे, असा सल्ला निसर्गसंवर्धक संदीप चव्हाण यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांना दिला.
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे रविवारी (दि. ५) रोजी ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये हे वर्कशॉप पार पडले. या वर्कशॉपसाठी मोठ्या संख्येने ‘मटा’च्या वाचकांनी हजेरी लावली होती. घरी उपलब्ध असलेल्या जागेत नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली रसायनमुक्त फळे, भाज्या तयार करण्याचे तंत्र यावेळी उपस्थिताना सांगण्यात आले. तसेच, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात सहजसोपी बाग फुलविण्याच्या खास टिप्सदेखील देण्यात आल्या. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, की गच्चीवरची बाग ही एक इव्हेस्टन्मेंट आहे. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याचा आनंद यातून मिळतो. निसर्ग माणसाच्या जवळ येण्यासाठी आसुसला आहे. त्यामुळे त्याला स्थान भेटल्यास तो कुठेही फुलतो. गच्चीवर किंवा घरच्या मोकळ्या जागेत भाजी, फळे, फुले यांचे पीक घेतल्यास आपल्याला त्याच खूप लाभ होतो. त्यासाठी खर्च अगदी अत्यल्प आहे. मात्र, त्याचे फायदे अनेक आहेत. तुम्ही योग्य तंत्र शिकल्यास घरच्या घरी कोणतेही पिके घेणे सहज शक्य आहे. वांगे, बटाटे, कांदे, मोगरा, गुलाब, अडुळसा, भोपळा अशी अनेक पिके घरी घेता येतात. सोबतच चव्हाण यांनी उपस्थितांना घरच्या बागेत झाडे कशी लावावी, त्यांची निगा कशी राखावी, तसेच त्यासाठीचे खत कसे तयार करावे, याचीही प्रात्यक्षिके करून दाखविले. उपस्थितांच्या गार्डनिंगसंदर्भातील अनेक शंकांचे निरसनही यावेळी कररण्यात आले.
Video पहा
यामुळे फुलेल गच्चीवरची बाग
अशी बनवावी कुंडी
नारळाची करवंटी, तेलाचा पत्र्याचा डबा, जुने शूज, बाटली, लाकडी बॉक्स, चहाचा कप, तांब्या, बादली, प्लास्टिकचा टब अशा अनेक टाकाऊ वस्तूंपासून कुंडी बनवून गच्चीवरची बाग साकारता येऊ शकते.
..अशी भरावी कुंडी…
काळी, लाल आणि खतमिश्रित माती कुंडी भरताना वापरावी. वाळवलेल्या किचन वेस्ट मटेरिअलपासून कुंडी तयार केल्यास उत्तम असते. कुंडीत मातीसोबत गावठी गायीचे वाळवलेले शेण किंवा शेणखत भरावे. झाडांचा सुकलेला पालापाचोळा, झाडांच्या वाळलेल्या काड्या, उसाचा चोथा, नारळाच्या शेंड्या यांचा वापर कुंडीतल्या मातीमध्ये करावा. कोणतीही कुंडी २ ते ४ इंचच भरावी. रोप लावल्यानंतर कुंडी २ ते ३ इंच रिकामी असायला हवी. अशा पूरक कुंडीत रोपांची वाढ लवकर होते.
अशी वाढवावीत झाडे
झाडांना रोज पाणी घालताना त्यांच्याशी संवाद साधण्याचे तंत्र आपण शिकायला हवे. झाडांची निगा राखत पाणी घालतेवेळी त्यांच्याकडे लक्ष देत वेस्ट मटेरिअल काढल्यास त्यांना आत्मसंवर्धन मिळते. हा प्रयोग कायम केल्यास झाडे नक्की वाढतात, असे शास्त्र सांगते. झाडांची माती महिन्यातून एकदा भुसभुशीत करीत खतपाणी केल्यास झाडांची वाढ लवकर व योग्य होते.
बागेचे व्यवस्थापन करतानाची न्यूट्रिशिअन पद्धत या उपक्रमाद्वारे शिकायला मिळाली. घरच्या घरी बागेच्या रुपातून खूप काही विकसित करता येते हे माहिती झाले. ‘मटा’च्या या उपक्रमातून गार्डनिंगचे तंत्र शिकायला मिळाले. असे स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे सर्वांमध्ये नक्कीच निसर्गाची गोडी निर्माण होऊ शकेल.-डॉ. वसंत टिकेकर
…
गृहिणी फावल्या वेळात घरीच अनेक पिके घेत बाग फुलवू शकतात, हे या वर्कशॉपद्वारे समजले. बाग साकारणे हे एक कौशल्य असून, त्यामागचे अनेक समज-गैरसमज या उपक्रमाद्वारे दूर झाले. घरी बाग तयार करणे खूप अवघड असेल, असे वाटायचे. मात्र, या उपक्रमाच्या मार्गदर्शनातून सगळे सोपे करून सांगण्यात आले.
-ज्योती माळोदे
http://www.gacchivarchibaug.in
आणखी वाचा…
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा
Comments are closed.