गांडूळखत हे ताजे का असावे व इतर खतातील फरक… ( Difference Between organic Fertilser )
बरेचदा आपण हौशी बागप्रेमी गच्चीवरील बागेला विविध खते पुरवत असतो. या खतांमधे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खतांचा समावेश असतो. या तिनही खतांमधे बराच फरक आहे. एकाद्या आजारी पेशंटला आपण चांगल खावू घाला असे म्हटले की आपण फळं, नारळपाणी असे देतो सहसा जे आपल्या रोजच्या आहारात कमी असते. पण बागेतील आजारी, रूसलेल्या झाडांना चांगली खते द्या असे म्हटले की मंडळी नेहमी जी खतं देतात त्यातीलच खतांचा डोस वाढवतात. हे चुकीचे आहे. त्यांना खतांमधे वेगळेपण गरजेचे असते.
कंपोस्टखत हे एसिडिक ( Acidic) असते. ते फुल झाडांना, फळ येणार्या झाडांना गरजेचे असते. तर गांडूळखत हे गांडूळांनी तयार केलेले असते. असा नैसर्गिक कचरा जो अर्धेवट कुजलेला असतो तो गांडूळ खातात व त्यांची जी विष्टा असते त्यास गांडूळखत असे म्हणतात. या खतात झाडांना जी खनिजद्रवे गरजेची असतात ती त्यातून मिळतात. बरेचदा मंडळी सुकलेले गांडूळखत वापरतात. मित्रांनो जे खत कोरडे झाले आहे. ते त्यात गांडूळांची अंडी कशी जिवंत राहतील किंवा त्यातील जे पोषण द्रवे असतात ही हवेत विरून जातात. त्यामुळे गांडूळखत हे नेहमी निमओले, ताजे असावे. म्हणजे त्यातील अंडी ही जिवंत राहतात. तसेच त्यातील घटक पाण्यात विरघळून ते झाडांना मिळतात.
शेणखत हे गांडूळांचे उत्तम अन्न आहे. एकतर ते मऊसूत व कुजलेले असल्यामुळे ते पचवू शकतात. त्यांचे ते आवडते अन्न असते.
बागेत शेणखत टाकल्यामुळे बागेत गांडुळांची संख्या वाढते. त्यांचा आकारसुध्दा वाढतो. तसेच झाडांच्या फळांचा आकार वाढतो.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते. आपल्याला फक्त झाडाना पोषण देवून चालत नाही. मातीतील जे काही सुक्ष्म जिवाणू, गांडूळे आहेत त्यांनाही पोषक ठरतील असे अन्न द्रवे (खतं) देणं गरजेचे असते.
वर्मी कंपोस्टः वर्मी कंपोस्ट व वर्मी कल्चर व गांडूळखत हे वेगवेगळे आहे. वर्मी कंपोस्ट म्हणजे नैसर्गिक कचर्याचे खत बनवतांना आपण जर गांडूळाचा वापर केला असेल तर वर्मी + कंपोस्ट बनते. तयार कंपोस्ट खत हे गांडूळांचे खाद्य नाही. कारण कंपोस्ट म्हणजे पूर्णपणे कूजलेला पालापाचोळा होय. त्यामुळे त्याचा वापर केला तरी त्यात गांडूळे उत्तम प्रकारे वाढू शकत नाही.
वर्मी कल्चर म्हणजे एकाद्या खताच्या प्रकल्पात आपल्याला गांडूळं प्रविष्ट करावयाचे असल्यास त्यास वर्मीकल्चर असे म्हणतात.
गांडूळखत हे वर सांगतीलेच आहे. तेव्हा. आपल्या कुडींत वाफ्यात कशा पध्दतीने गांडूळे तयार होतील, ते वाढीस लागतील अशी कृती करा.
खतातील प्रकार ओळखायला शिका. झाडांना कोणत्या काळात काय गरजेचे आहे त्यानुसार खतांचा वापर करा.
आम्ही खालील मो. क्रंमाकावरून व्हाट्सअपवर गार्डेन अपडेटस पाठवत असतो.
8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.