गच्चीवरची बाग या नाशिक स्थित सामाजिक उद्मशील कायर्क्रम आहे. सोशल इंटरप्रिनअर (सामाजिक उद्मशीलता) म्हणजे असा उपक्रम ज्यातून समाजासाठी, पर्यावरणासाठी तर उपयोग होईलच पण हा उपक्रम समाजात रूजवतांना होणारे उत्पनातून उपक्रमाचा खर्च तसेच रूजवणारी व्यक्ती किंवा कुटुंबाचा चरितार्थ भागवला जातो. यासाठी कोणत्याही संस्था, सीएसआर ची मदत घेतली जात नाही. ( आम्ही पण घेतली नाही) या उपक्रम म्हणजे गारबेज टू गाडर्न अशी संकल्पना ध्यानी घेवून आम के आम गुठलिंयो के दाम या म्हणी प्रमाणे कचरा व्यवस्थापनातून ताज्या, विषमुक्त, खात्रीच्या भाज्या घरच्या घरी पिकवता येतात. हे आम्ही गेल्या १२ वर्षात सिध्द केले आहे. यासाठी ज्ञानाआधारित-माध्यम निर्मिती व प्रशिक्षण हे ध्येय घेवून ते समाजाता पोहचण्यासाठी उपक्रम- सेवा-विक्री हे धोरण ठरवले आहे. हे सारे करतांना काही सेवा निशुल्क ठेवण्यात आल्या आहेत.
- प्रोजेक्ट बघायाला येणार्या व्यक्तिंना निशुल्क मार्गदर्शन करणे ( वेळ, माहिती व ज्ञान देणे)
- सोशल मिडीयाव्दारे इच्छुक व्यक्तिंना निशुल्क मार्गदर्शन करणे ( पश्नोत्तरे- शंका निरसन)
- सोशल मिडीयाव्दारे माहिती पोहचवणे. ( लेख, माहितीपट) असे आम्ही तीन प्रकारचे काम समाजासाठी करत आहोत.
गारबेज टू गार्डन (कचरा व्यवस्थापनून भाजीपाला – फूलझाडांची बाग फुलवणे) या संकल्पनेतून बाग प्रेमीनां विविध विषयावर लेखांची मालिका प्रकाशीत करणार आहोत.
अर्थात आपल्या प्रतिक्रिया आल्यास आनंद वाटेल.
http://www.gacchivarchibaug.in
आणखी वाचा…
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा
गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…