शहर गतीने वाढताहेत. खरं ती आधुनिक विकासाला लाभलेला (ऑबेसिटी) लठ्ठ पणासारखा आजार आहे. जागेवरच सुजत चाललेय. असो. शहरं जशी वाढताहेत तसे प्रदुषण वाढत आहे. हे प्रदुषण अनेक अंगाने फोफावत आहे. ध्वनी, जल, जमीन, हवा, प्रकाश असे सर्वव्यापी झाले आहे. यातील सर्वात महत्वाचे जे आहे ते हवेतील प्रदुषण होय. या हवेत स्वच्छ हवा, प्राणवायूचा अभाव, विषाणूंचा वावर तर आहेच. पण सोबत त्यात सुक्ष्म धुलिकण (डस्ट) सुध्दा आहे. ही धुळ अनेक गोष्टीची असते. वाहत्या वार्यात मातीचे सुक्ष्म कण, औद्योगीक वसाहतीमुळे चिमणीतून विविध पदार्थाचे सुक्ष्म अवशेष उदाः काजळी, तसेच वाहनातून बाहेर पडणारा धुर, गाड्यांचे चाके घासल्याने निघणारी डस्ट ही झाली घराबाहेरची डस्टचे निर्माण होण्याची कारणे, तर घरात सुध्दा कोंदट जागेत अडगळीवर, पुस्तकांवर साचलेला धुळीचा थर. ईलेक्ट्रॉनिक साधनावर साचणारी धुळ, खिडकीला लावलेल्या जाळीवर साचणारी धुलीकण व धुळ.
वातावऱणात धुळ आहे हे ओळखणे सोपे आहे. बाहेरून घरात आले की चेहर्यावर स्वच्छ रूमाल फिरवायचा. त्यावर काळ्या रंगाची धुळ चिटकून येते. तर घरातील धुळ ही त्यावर हात फिरवावा म्हणजे हाताला ति लागलेली दिसते.
या डस्टला आपण अनेक अंगानी रोखू शकतो. त्यावरच सविस्तर लेखन केले आहे.
- चेहर्यावर मुस्क (मास्क) लावणे गरजेचे आहे. कोरोना असो कि नसो आता हा मास्क वापरणे फार गरजेचा आहे. नाकात जाणारी सुक्ष्म धुलिकण रोखले जाणार आहे कोरोना हा आजार जाईलही पण वातावऱणातील धुळ कधीच जाणार नाही. उलट ती या पुढे दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
- घराभोवती झाडे लावाः घरा भोवती शक्य असल्यास झाडे लावा. मोठ्या पानांची, छोट्या पानांची अशी कोणतीही चालतील. त्यात वावटळी व वार्या मुळे निर्माण होणारी धुळ ही रोखली जाते.
- तसेच घरा भोवती, छतावर भाजीपाल्याची बाग फुलवा किंवा वाफ्यामधे फळझाडे लावा.
- घरा बाहेर उपलब्ध जागेत किंवा घरात कुंड्या मधे अरेका पाम लावा. अरेका पाम हा प्राणवायू तयार तर करतोच पण डस्ट सुध्दा खेचून घेतो. अर्थात ही डस्ट जमल्यास रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी ती स्पंजने टिपून घ्यावी.
- हॅंगीग गार्डेन तयार करा. बरेचदा डस्ट ही बाल्कनी, खिडकीतूनही घरात येत असते. त्यामुळे तेथे लोंबकळणारी झाडे लावा. बर्यांच अंशी डस्ट ही रोखली जाते.
- वास्तू शाश्त्र अभ्यासून घरात ठेवता येणारी झाडे घरात ठेवा, पॅसेज, पायरीवर ठेवा. म्हणजे प्राणवायू तर मिळेलच पण डस्ट सुध्दा आकर्षिली जाईल.
- यासाठी शॅडो लव्हींग, पार्शल शेड मधे येणारी झाडे कोणती त्याची निवड करावी. तसेच कमी काळजी घेता येईल अशीच झाडे निवडा.
- वरील सार्या गोष्टी दुकान, कार्यालय या ठिकाणी सुध्दा अवलंबता येईल.
या झाडांना वेळोवेळी स्पंजने पुसून घ्या किंवा स्प्रे ने त्याला स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या पानातील रंध्रावर डस्ट साचली तर अन्न प्रक्रिया करता येत नाही. नंतर ते आजारांना बळी पडतात.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.