घरी भाज्या पिकवणे हे खरचं परवडते का ?
विषमुक्त भाजीपाला घरी पिकवणे हे आर्थिक दृष्टया परवडत नाही.. खरयं आहे हे … आर्थिक दृष्ट्या हे महागडेच जाते.. पण आपण असा विचार करून एकतर या विषयात हात घालत नाही. नि बाजारातील विषारी फरावणी असलेल्या, बेचव नि कोणतही सत्व नसलेल्या भाज्या आपण सेवण करतो नि भविष्यातील आजारांना आपण आमंत्रित करतो. पण हा निर्णय सार्या कुटुंबालाच घातक ठरतो.
आम्ही नेहमी सांगतो की चार चाकी गाडी घेणे परवडते का? बारकाईने विचार केला तर नाही परवडत. एकतर त्यात लाखाची गुंतवणूक करा, तिचे देखभालीचा खर्च, सरकारी कर नि सर्वात शेवटी तिला लागणारे इंधन.. याचे निट गणीत मांडले तर रोज स्पेशल केलेली रिक्षा अथवा ओला उबेर नक्की परवडेल. यात शंकाच नाही.
तरी आपण गाडी का खरेदी करतो. एकतर आपण करत असलेला प्रवास हा सुरक्षित असणे गरजेचे आहे. (आता कोरोना काळात तर हे अधिकच महत्वाचे झाले आहे) हव्या त्या वेळेत आपण हवे तेथे प्रवास करू शकतो. थांबू शकतो व सर्वात महत्वाचे मह्णजे आपला सोन्यासारखा वेळ वाचतो. कुणावर विसबून राहण्याची गरजच पडत नाही.
आम्ही गच्चीवरची बाग व्दारे एरो ब्रिक्स बेड तयार करून दिला जातो. निसंशय त्याची गुंतवणूक आपल्याला महाग वाटेल. पण ती एकदम करतो म्हणून महाग वाटते. खर तर या बेडचा खर्च हा तिमाहीत दोन वर्षासाठी विभागला तर हा खर्च बाजारातील भाजीईतकाच येतो. व तेही विषमुक्त भाज्या. शिवाय निसर्गाचा सहवास व आता धावपळीच्या युगात ताण तणाव कमी करणारा आनंद.
खरं पाहिल तर बाजारातील भाजी हे उदाः दहा रू किलो भेटते. पण ति भाजी खरंच दहा रूपये किमत असू शकते का ? तर नाही. भाज्या उत्पादन करणारी उत्पादक मंडळी म्हणजे शेतकर्यात स्पर्धा असते. भाजी हा नाशंवत माल असल्यामुळे तो वेळेत विकणे हे फार गरजचे आहे. नाही तर मुद्दलही निघत नाही. हे त्यांचे एकप्रकारे समाजाने केलेले शोषणच म्हटले पाहिजे. तसेच कमी वेळात भाजीपाला उगवेनही पण त्यासाठी निसर्गाने फार मोठी किमंत रसायनाच्या वापरामुले मोजलेली असते. ति गृहीत धरतच नाही. असो.
आम्ही असे म्हणतो की आम्ही भाज्या नाही उगवत, आम्ही औषधं उगवतो. मला एक सांगा आपण दवाखान्यात डॉ. फी असेन, मेडीकल वरील औषधे असतील तेथे घासाघिस करतो का… एकादे औषध परवडत नाही म्हणून विकत घेतच नाही. असे होत नाही. ते असेल त्या किमतीत विकत घ्यावेच लागते. मग आपले अन्न हे जर औषध आहे तर मग त्याच्या सेवनात आपण एवढी तरतूद का करतो. त्यामुळे विषमुक्त भाज्या उगवणे हे फार गरजेचे आहे. जो आपला भविष्यातील आजारपणांचा खर्च वाचवतो.
आपल्याला चार चाकी गाडी परवडत नसली तरी तिच्या छुप्या फायंद्याचा विचार करता ति विकत घेणेच हेच फार महत्वाचे आहे. तसेच गच्चीवरची बाग व्दारे जे एरो ब्रिक्स बेड तयार केले जातात त्याचे डोळ्यांना दिसेन, बोटावर मोजता येतील असे फायंदे फार कमी आहेत. पण छुपे फायंद्याचा विचार करता ते परवडणारेच आहे.
आता अमूक खर्चात भरपूर व पैसे वसूल भाज्या उत्पादन होतील का हा नेहमीचा प्रश्न असतो. तर हे त्या त्या ठिकाणच्या वातावरण, तेथील तापमान, आपण दिलेला वेळ व आपण किती लवकर शिकता या कौशल्यावर अवलंबून असतो. कंपनी सुध्दा नेहमी गाडीचा अव्हरेज हा आयडिल परिस्थीतीवर अवलंबून आहे असे सांगतो. खड्डेमय रस्ता असेन तर आपली कितीही सोन्याची ब्रॅंडेड गाडी असो तिचा अव्हेरेज हा कमी होणारच शिवाय देखभालीचा खर्च हा वाढणारच असो…
तर आम्ही एरोब्रिक्स बेड हे आपल्याकडे उपलब्ध जागे नुसार तयार करून देतो. थोडक्यात प्रत्येक ठिकाणचा बेड हा गाडी कस्टमाईज करावी तसे करून देतो. त्यात इंधन अर्थात खते देणे, त्याची देखभाल अर्थात त्यात किड नियंत्रण करणे इं कामे खर्च येतोच. शिवाय आपण स्वतःहून काम करत असाल तर त्यात मजूरी ही येतेच. पण यात आनंद असतो. नि हा आनंद म्हणजे शेती करण्याचा आनंद हा पैशात मोजता येत नाही…
शिवाय बागेसाठी लागणारी खते, औषधे हे दरवेळेस विकत आणलेच पाहिजे असे नाही. ते तुम्ही घरी सुध्दा तयार करू शकतात. म्हणजे सारासार असा की आपल्याला इच्छा असेल तर आपण सहजेतेने( सुरवातीला आमची मदत) घेवून घरच्या घरी भाज्या परवडणार्या भाज्या पिकवू शकतो.
एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. घरी भाज्या उगवणे हे जीवन कौशल्य आहे. जे आपल्या प्रत्येकाला शिवावेच लागणार आहे. कोरोनाची साथीचा काळ ही एक संधी आहे. हाताशी वेळ आहे. त्यामुळे हे कौशल्य शिकून जीवनभर त्याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. शिवाय साथ गेली तरी वाढता शहरीकरणाची गती पाहता, जीवनशैली पहाता आपल्याला हे जीवन कौशल्य कधी ना कधी आत्मसात करावे लागणारच आहे.
तुम्हाला भाज्या उगवण्यासाठी फार मोठी गोष्ट करायाची गरज नाही. सुरवातीपासून सारे प्रयोग तुम्हाला करायची गरज नाही. आम्ही हे सारे प्रयोग मागील २० वर्षात करून झाले आहेत. तुम्ही आमच्या खांद्यावर (अनुभवांचा उपयोग करून) पाय ठेवून पुढे जावू शकता. भाज्या उगवण्याचे ज्ञान व विज्ञान आमच्याकडून एकदा समजून घेतले तर तुम्हाला हा खडतर वाटणारा प्रवास सोपा व सहज, आनंददायी ठरेन. फक्त आम्हाला संपर्क करा. तुम्हाला सहजतेने उगवता येतील अशी काही उत्पादने तयार केली आहे. अगदी दोन मिनिटात मॅगी बनवण्यासारखी…
आमच्या सेवा व उत्पादनांविषयी सविस्तर माहितीसाठी
http://www.gacchivarchibaug.in