Site icon Grow Organic

छोट्या गॅलरीत, किचनच्या खिडकीत, विंडोग्रील मधे भाजीपाला पिकवणे सोपे आहे

Advertisements

आज आपण शहरीजीवन जगतो आहोत. शहरं जशी वाढत जाताहेत तशी शेतीची जागा कमी होत जात आहे. शिवाय आपले वावराचं अवकाश हे कमी कमी चालले आहे. भविष्यात राहण्याची जागा केवळ टॉयलेट, बाथरूम व बेड पुरतचं मर्यादीत राहणार आहे. थोडक्यात नॅनो फ्ल्रॅटस तयार होणार आहे. कारण खाणं, पिण्यासाठी बाहेर हॉटेल्स, फिरण्यासाठी गार्डेन, मंनोरंजनासाठी सारी साधने ही बाहेर असणारच आहे. हे सारं घडणं अपेक्षीत असलं तरी चागलं, सत्वशील, खात्रीशीर, विषमुक्त खाणं हे दुर्मिळच होणार आहे. आपली वाटचाल ही मेट्रोपोलिटीन सिटीकडे वेगाने जात असली तरी आपल्याला आरोग्यदायी खाणं पर्यायाने उगवणं हे फार गरजेचे आहे. आणि तेही स्वतः करणे फार गरजेचे असणार आहे.

पुणे, मुंबई व नाशिक येथील सुर्वण त्रिकोणातील शहरात आता आपल्याला छोट्या गॅलरीत, किचनच्या खिडकीत, विंडोग्रील मधे भाजीपाला पिकवणे हे फार गरजेचे झाले आहे.  गच्चीवरची बाग तर्फे जमीनीवर वा टेरेसवर एरोब्रिक्स पध्दतीने बाग फुलवली जाते.पण त्यास ठराविक जागा गरजेची असते. पण छोट्या जागे मधे आपण कसे उगवणार हा प्रश्न असतोच. त्यावर उपाय म्हणून गच्चीवरची बाग तर्फे अन्नपूर्णा बॅग्ज्स उपलब्ध आहेत.  या बॅग्ज्स कमी किमतीत तर उपलब्ध आहेच. पण सोबत त्या आमच्या पध्दतीने भरल्यास त्या सात आठ वर्ष टिकतात. या बॅग्ज्स  विंडो ग्रील, बाल्कनी येथे ठेवून भाजीपाल्याची बाग फुलवता येते.

या बॅग्ज्स मधे कंदमुळ ( आलं, हळद, मुळा, गाजर, रताळी) तसेच पालेभाज्यामधे सर्वप्रकारच्या भाज्या तर उत्पादीत करता येतातच शिवाय काही फळभाज्यांचीही लागवड करता येते. उदाः वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, फ्लावर, कॅबेज ही चागल्यांप्रकारे पिकवता येतात.

या बॅग्जस बाय पोस्ट ने पाठवण्याची व्यवस्था आहेच.

आमच्या उत्पादनांच्या अधिक माहितीसाठी

http://www.gacchivarchibaug.in

Exit mobile version