आपण घर बांधतो, बंगला बांधतो किंवा शेती घेतो. बरीच मंडळी यासाठी विटांच्या भिंती (Compound Wall)  बांधतात. पण अशा भिंत बांधण्याचे फायद्यापेक्षा तोटे अधिक आहेत. तर त्या ऐवजी तारेच कुंपण (mesh Wall)  बांधणे सर्वार्थाने फायदेशीर आहे . थोडक्यात कोणत्या प्रकारच्या कुपनांचे फायदे तोटे काय आहेत हे आज आपण या लेखातून पहाणार आहोत.

विटांची भिंत बांधण्याचे तोटे काय काय आहेत ते पाहूया..

विटांची भिंत ही खर्चीक असते.

कालांतराने त्यास तडे जातात.

जागा वाया जाते.

हवेचा अटकाव होतो.

विटांची भिंत ही खर्चीक असते. बरेचदा बंगल्यातील भिंतीचे बांधकाम हे सिंगल विटेत असते. तर कुपनाचे बांधकाम हे डबल विटेत करावे लागते. तसेच त्यास आतून बाहेरून प्लास्टर करणे, त्यास रंगरंगोटी करणे हे सारेच खर्चिक असते. तसेच त्यास ठराविक उंचीपर्यतच बांधकाम होते. कारण उंची वाढवण्यासाठी अधिक खर्च असतो. तसेच ति पडली तर त्यास पुन्हा खर्च येतो. तसेच या सार्या गोष्टीत नैसर्गिक संसाधने, मजूरी, वेळ हा खर्च येतोच.

कुंपनाची भिंत पडण्यास अनेक कारणे असतात. त्यास कालांतराने नैसर्गिक तडे जातात. ते उन पावसामुळे वाढत जातात. तसेच भिंतीच्या बाजूला एकादे नारळ आंब्याचे झाड असल्यास तेही भिंतीस तडे जाण्यास कारणीभूत ठरतात. कालांतराने इच्छा असूनही झाड काढून टाकण्यास प्राधान्य देतो. तसेच भिंती कधीही पडण्याची भिती असतेच त्यामुळे  इतरांना शारिरक इजा होण्याची शक्याता अधिक असते.

विटांच्या भिंत ही किमान एक फूट रूंद तरी असते. त्यापेक्षा कमी रूंद असल्यास ती लवकर पडते. एक फूट रूंद असलेली भिंतीच्या आतून बाहेरून दीड ते दोन फूट जागा सोडूनच झाडे लावता येतात. त्यामुळे एकतर ही झाडे आगावूपणाने रस्त्याची जागा अडवतात. किंवा भिंतीच्या आतील जागा खातात. त्यामुळे विटांच्या भिंती बांधू नये..

खेळत्या हवेला अटकावः विटांची भिंत ही खेळत्या हवेला अटकाव करत असते. पर्यायाने घराभोवती असलेली बाग कीडीला अधिक बळी पडते.  तसेच कोंदट वातावरण, स्वच्छ सुर्यप्रकाशाचा अभवा या सार्या गोष्टीची शक्यता अधिक असते. तसेच भिंत उंच असल्यामुळे भिंतीच्या जवळ छोटी फुलझाडे लावता येत नाहीत. कारण तेथे ऊनच पोहचत नाही.

या वरील कारणामुळे विटांची भिंत बांधू नये. मग याला पर्याय काय…

याला पर्याय आहे. तारेचे कुंपन अर्थात जाळीचे कुंपन तयार करावे.

याचे फायदे काय काय आहेत. ते पाहूया..

जलद गतीने व कमी खर्चात कुंपन तयार होते.

पूर्नबांधणीस कमी खर्च लागतो.

जागा वाचते

बाग फुलवता येते.

बागेसाठी हवा खेळती रहाते.

हवी तेवढी उंची वाढवता येते.

तारेचे कंपन हे जलद गतीने तयार होते. तसेच भिंती पेक्षा याचा खर्च कमीच येतो. मजूरी वाचते. नैसर्गिक संसाधनाचा कमीत कमी वापर होतो. शिवाय यास भंगार मुल्य अथवा पुर्नवापर करता येतो.

अशा कुंपनास पूर्नबांधणीचा खर्च जवळपास नसतोच. असलाच तरी फार कमी येतो. वेळोवेळी रंग रंगोटी केल्यास लोखडी एंगव व तारेची जाळी ही बरीच वर्ष टिकते.

तारेच्या कुंपनामुळे जागा वाचते. तारेचे कुंपन हे जास्तीत जास्त २ ते ४ इंच जागा व्यापते. किंबहुना त्याही पेक्षा कमी. तसेच याच्या आजूबाजूला हिरवळ फुलवता येते. नारळ आंब्याची झाडे वाढवता येता, अशा कुंपनाला या झाडापासून कोणताही धोका नसतो. झालाच तर त्यास कमी वेळात तसेच कमी खर्चात त्याची पुर्नबांधणी करता येते. येथेच्छ बाग फुलवता येते.

तसेच अशा कुंपनामुळे हवा खेळती राहते. राहिलाच प्रश्न प्रायव्हिसीचा तर त्यास हिरवे कापड ( Green Net) लावता येते. किंवा त्यावर वेल वर्गीय वनस्पती लावून दृष्यता अडवता येते.

तसेच हे कुंपन हवे तेवढे उंच तयार करता येते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.

हा पण लेख नक्की वाचा…तारेच्या कुंपनावर वेलवर्गीय कोणत्या वनस्पती लागवड करता येतात…

कोकोपीट ला पर्याय बिशकॉम