Site icon Grow Organic

झाडांचे टॉनिक जिवामृत…

Advertisements

आपल्याला रोजच नाष्टा, जेवण, लोणचं, सरबत लागत, बरं हे एकाच चविच असून चालत नाही, त्यातही विविधता लागते. तसेच मला परवडतं म्हणून रोज बदाम, काजू खाल्लेले चालेल का?

तसंच झाडाला नेहमीच शेणखत किंवा बाजारातील ब्रँडेड खत टाकून चालेल का ?

नाही चालणार ना ! कारण आपल्याला जसं विविध चविच लागतं तसं झाडांनाही लागतं, यालाच चौरस आहार असे म्हणतात. आपल्या लाडक्या झाडाचे आपण बरेच लाड करतो पण ते एकाचवेळी एकाच प्रकारचे खत देऊन आपण त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे बरेचदा झाडांची वाढ थांबते, साधे पानही येत नाहीत तर कधी झाड वाळून जातात किंवा बरेचदा बरीच वाट पाहायला लावतात अशा वेळेस आपल्याला घरच्या घरी बरीच खते तयार करता येतात. त्यातलंच जीवामृत हे एक संजीवक म्हणून आपण वापरू शकतो. जीवामृत कसे बनवायचे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी युट्युबवर उपलब्ध आहेत. परंतु ज्यांना ते शक्य नाही ते आम्ही नाशिक शहरासाठी पुरवतो. साधारण 25/-रुपये लिटर [हेच हेच पुण्या-मुंबईला दुधापेक्षा जास्त भावाने विकले जात आहे]असलेले हे जीवामृत त्याचं 5 ते 15 लिटर पाणी तयार करून आपण ते झाडांना देता येतं. यातून झाडांना झाडांची वाढ, प्रगती थांबलेली असेल तिथून ते फुलायला सुरुवात होते. म्हणजे फूल गळती होत असेल तर फळ यायला सुरुवात होते. आज पर्यंत जीवामृताचा शहरी परसबागेत सर्वांनाच उपयोग व त्याचा प्रत्यय आला आहे. [वाचत रहा]

माझा एक विशेष अनुभव इथे नोंदवा वाटतो. संकरित असलेले बियाणे मी मागच्या परसदारी लावलं होते, सारा वेल कंपाउंड वरती वाढला होता. अपेक्षेप्रमाणे तीन महिने झाले तरी दुधी भोपळा, कारली यांना फळ लागत नव्हतं, वेल काढून टाकण्याची वेळ आली तसा निर्णय झाला. त्याच वेळेस लक्षात आलं की आपण आज पर्यंत या वेलांना पाण्यात मिसळून जीवामृत दिलेच आहे तर ते वेल काढण्याआधी का नाही आपण आहे तसं [consontret ] जीवामृत दिले तर काय होईल ? प्रयोग तर करूया ! म्हणून एक लिटर जीवामृत प्रत्येक वेलाला देण्यात आलं. यापूर्वी असा समज होता की आहे तसं जीवामृत दिलं तर वेल वाळू शकतात. असाही वेल काढायचा होता त्यामुळे आहे तसे जीवामृत देऊन पाहिलं आणि काय आश्चर्य ज्या दुधी भोपळ्याचा वेल काढण्याची वेळ आली त्याला 2-2 किलोचे 5 भोपळे लागलेत आणि कारले तीन ते चार किलो निघालेत आणि तेव्हापासून हा प्रयोग नाशिक मध्ये ज्या ठिकाणी आम्ही बाग फुलवतोय तसेच जीवामृत विक्रीसाठी जाईल त्या ठिकाणी करू लागलो आणि काय आश्चर्य जीवामृत दिल्यामुळे झाडांना भरपूर फळे येऊ लागली आणि तेव्हापासून फक्त कीडनियंत्रणासाठी पाण्यात विरघळून जीवामृत लागलो. ज्या झाडांना गरजेच आहे त्यांना हा जीवामृत एक एक लिटर द्यायला सुरुवात केली. त्यातून चांगले रिझल्ट आलेत आणि म्हणूनच अनुभव आपल्या सोबत share करत आहोत.

जीवामृत तयार करण्यासाठी देशी गायीचे शेण, गोमूत्र, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, गूळ व पाणी यांचे मिश्रण तयार केले जाते. या मिश्रणात प्रचंड प्रमाणात जिवाणूंची संख्या वाढते व ही वाढलेली संख्या म्हणजेच द्रावण आपण झाडांना दिल्यास त्यातून जिवाणू माती सोबत संयोग करतात व त्यातच त्यांचे खत तयार होऊन झाडाला चांगले परिणाम देतात. तयार जीवामृत आमच्याकडे मिळेल. नाशिक शहरात घरपोच हवे असल्यास 20/-लिटर +50 /- Delivery charges आकारले जातील.

09850569644.

http://www.gacchivarchibaug.in

Exit mobile version