डॉ. बगीचा ही ई -पुस्तिका गच्चीवरची बाग नाशिक निर्मित आहे. आपण उपलब्ध वस्तूत, उपलब्ध जागेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात रसायनमुक्त भाजीपाला निर्मितीविषयी आहे. ही पुस्तिका ही सांराश रूपात असून तुम्हाला वाचून लगेच प्रयोगास सुरवात करता येईल. या पुस्तकात कुंड्या कशा रितीने भराव्यात. कीड नियंत्रण कसे करावे, त्यासाठी खताचे व्यवस्थापन कसे करावे तसेच घरातील कचर्याचे व्यवस्थापन कसे करावे या विषयी मार्गदर्शक माहिती दिली आहे. आज पर्यंत हजारो लोकांनी याचा उपयोग करून घरीच भाजीपाला कसा उगवावा या संबधी तंत्र व मंत्र शिकले आहेत. तुम्हालाही या पुस्तिकेचा लॉकडाऊन काळात नक्की उपयोग होईल.

डॉ. बगीचा ई पुस्तक Download करा..