तुम्ही यू ट्यूबवर आहात. आपली दर्शकांची संख्या वाढवायाचीय,
How to increase subscribers & Viewers on YouTube Channel in Marathi
मग हे उपाय करून पहा..
आपल्या यूट्यूबवरील दर्शकांची संख्या वाढवायची म्हणजे नव्याने यू ट्यूबवर येणार्या मंडळीसाठी हे मोठे आव्हान असते. त्यातल्या त्यात आपल्याला आपला चॅनेल मॉनिटाईज (जाहिरातींचे पैशाच्या रूपात कमाई) करायचे असल्यास किमान एक हजार दर्शक व एका वर्षात ( कोणत्याही 365 दिवसात) दर्शकांनी चार हजार तास व्हिडीओ पाहणे गरजेच असते. हे करणे म्हणजे दिव्यच असते. कारण एकादा व्हिडीओ चालला तर चांद तक नाही तर रात तक… अशी गंमत होते.
अशा वेळेस आपल्याला वरील उदिष्ट्य साध्य करायचे असल्यास खालील गोष्टी करून पहा. आपल्याला त्याचाही नक्कीच फायदा होईल.
- पहिले उदिष्ट हे एक हजार दर्शक मिळवण्याचे ठेवा. त्यासाठी आपल्याला छोटे छोटे व्हिडीओ संदेश देणारे बनवा. वीस सेंकदाचे व्हिडीओ हे मॉनिटाईज मधे म्हणजे कांऊटिगं हावर्स मधे पकडले जात नाही पण तुमचे दर्शक वाढवू शकता. कारण यावरच तुमचे दर्शक तुमच्या पुढील व्हिडीओला पहाण्यास उत्सुक होतात. ते त्यास सब्सक्राईब करतात.
- नुसतेच छोटे व्हिडीओ बनवू नका. काही ठराविक कालाचेही व्हिडीओ बनवा.
- तुमचे व्हीडीओ हे साधारण हजार दर्शकानी प्रत्येक व्हीडीओ पहावा असे अपेक्षीत धरले तर त्या प्रमाणात म्हणजे तुमच्याजवळील व्हिडीओची लांबी ही चाळीस तासांची तरी असावी. कारण नोंदवलेला प्रत्येक दर्शक हा तुमचे व्हीडिओ पाहिनच याची खात्री नसते. त्यातील काहीच जणांनी पाहतील असे गृहीत धरले तर तुमच्या व्हिडीओची लांबी वाढवणे गरजेचे ठरते.
- यासाठी तुम्हाला एका ठराविक अंतराने व्हिडीओ अपलोड करणे गरजेचे ठरते.
- आपल्याकडे कंटेट ब्लॉग असल्यास त्या लेखामधे आपले व्हिडिओ मर्ज करा. त्यावरूही तुमच्या चॅनेलचे दर्शक वाढीस मदत होते.
- फेसबूक सारख्या पेजेसवर आपले व्हिडिओ शेड्यूल करा. म्हणजे ठराविक अंतराने ते दर्शकांपर्यंत पोहचू शकतील. व ते तुमच्या चॅनेल वर सभासदत्व घेतील.
- आपले एकदा हजार दर्शक पूर्ण झाले की आपोआपोच आपले तास व दर्शकांची नोंदणी वाढीस लागते. पण येथे निवांत बसू नका. व्हिडीओ हे ठराविक अंतराने बनवणे व ते अपलोड करत राहणे फार गरजेचे असते. यामुळे तुमचे दर्शक हे चॅनेलला भेट देत राहतात. व्हिडीओ संगीतमय असल्यास ते त्यास पुन्हा पुन्हा पाहतात.
- आपल्या सारखेच माहिती देणारी इतरांच्या चॅनेलवरील व्हिडीओ लाईक करा. त्यावर नोंदवलेल्या योग्य प्रतिक्रियांना लाईक्स करा.
ही माहिती वापरून पहा. आपले व्हिडीओचे दर्शक व संख्या वाढलेली नक्कीच दिसेल.
क्रिएटीव्ह मिडीया टीम, गच्चीवरची बाग, नाशिक.