गच्चीवरची बाग आता नऊ वर्षाची पूर्ण होतेय. मार्च २०२१ पासून दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे.
फक्त ऐकले होते शहरी शेती केली जाते. पण ति कशी करतात. काय करतात. काहीच माहित नव्हते. २००५ पासूनच प्रयोगांना सुरूवात झाली होती. पण त्याही आधी मला कचरा व्यवस्थापनात विशेष रूची होती. पुणे मुंबई सारखी नाशिकची स्थिती होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. त्यात नाशिककरांचा सहभाग कसा घेवू शकतो हाच तो काय विचार होता. होम कंपोस्टींगवर प्रयोग करता करता नैसर्गिक, विषमुक्त, रसायनमुक्त भाज्या पिकवण्याकडे अर्थात शेती कडे कल वाढला. पण कंपोस्टींग विषय काही डोक्यातून जात नव्हता. प्रयोग करता करता चिंतनातून या दोनांची सांगड घातली गेली नि मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक प्रयोग यशस्वी होत गेला. गच्चीवरची बाग पुस्तक प्रकाशीत केले. नि याला पूर्णवेळ देवून अर्थाजनाचे साधन होईल याचा कधीही विचार नव्हता. पण बागप्रेमीचा पाठींबा मिळत गेला. भांडवल गुंतवून हळू हळू व्यवसायात अर्थात पूर्ण वेळ काम करण्याचे ठरवण्यात आले.
आज आम्ही तीन विषयात काम करत आहोत.
कंपोस्टींग…
यात होम कंपोस्टींग, झाडपाल्याचे कंपोस्टींग, गुरा ढोरांच्या शेणाचे कंपोस्टींग करत आहोत. हे सारे जैविक कंपोस्टींग करण्यासाठी विविध प्रकारचे सेटअप तयार केले आहे. जे कचर्याच्या स्वभाव, आकार, उपलब्ध जागा, दिला जाणारा वेळ, पैशाची गुंतवणूक व उपलब्ध जागा या नुसार तयार केले आहेत.
गार्डेनिंग...
या विषयात आम्ही ऑरगॅनिक पध्दतीने भाजीपाला उत्पादन, फुलझाडे व फळझाडांचे संगोपन व वाढ, उत्पादनावर काम करत आलो आहोत.
स्पेस डेकोरेशेन …
या विषयात विविध उपलब्ध जागेत निसर्गाचे सानिध्य कशा प्रकारे तयार करता येईल या विषयी हॅंडमेड उत्पादने तयार केली जातात. व त्यात निसर्ग फुलवला जातोय.
आज गच्चीवरची बाग नाशिकचे काम पाच विभागात करत आहे.
Grow : ऑरगॅनिक पध्दतीने भाज्या उगवतो व उगवून देतो.
Guide : यासाठी इच्छुकांना विविध सोशल मिडीयाव्दारे मार्गदर्शन करतो.
Build: भाज्या उगवण्यासाठी उपलब्ध जागेनुसार सेटअप तयार करतो.
Products : ऑरगॅनिक भाज्या उगवण्यासाठी लागणारे संबधित गोष्टीचे उत्पादनं करतो.
Sale N : ही उत्पादनांची आम्ही ऑनलाईन ऑफलाईन विक्री करतो.
Services : उपलब्ध जागेत फळझाडे, फुलझाडे, भाजीपाला उत्पादनांसाठी सेवा सुविधा पुरवितो.
हे विभाग जसे जसे वाढत गेले. तस तसे आमच्या कामाचा विस्तार होत गेला. आजमितीला पाच ठिकाणी आमचे काम विस्तारत आहे. अर्थात ही अशी ठिकाणं आहेत जेथे आमचे काम तुम्हाला पहाता येईल, अनुभवता येईल.
Garden Lab..
गार्डन लॅब म्हणजे आमचे स्वतःचे टेरेस ज्यावर आम्ही आमच्यासाठी ऑरगॅनिक भाज्या उगवतो. ज्यात विविध तर्हेचे प्रयोग केले जातात.
Garden Studio…
गार्डेन स्टुडिओ ज्यात वरील कामासाठी लागणारे साहित्य संग्रह, रोजचे काम, उत्पादनाचे डिस्पले केले जाते. हा स्टुडिओचा आम्ही विविध तर्हेने वापर करत असतो. थोडक्यात ज्याला मल्टीपर्पज स्पेस असे म्हणू शकतो.
Garden Digital…
वरील कामकाज चालण्यासाठी ई माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यात सातत्याने जाणीव जागृती होण्यासाठी व्हिडीओ, लेख, पोस्ट करणे असे कामकाज चालते. थोडक्यात यात आम्ही जाहिरात व मार्केटिंग हे विषय हाताळले जातात.
Garden Shopy…
गच्चीवरची बागेव्दारे जे काही उत्पादने केली जातात. ती इतर जिल्हा, राज्यात पोहचण्यासाठी फ्रांचाईजी स्वरूपात गार्डेन शॉपी तयार करण्यात येत आहेत. ज्यात स्थानिकांना सहजतेने गच्चीवरची बागेची उत्पादने खरेदी करता येतील व सहकार्यांना रोजगार मिळेल या उद्देशाने सुरू आहे.
Garden community…
गार्डेन कम्यूनिटी म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी भाजीपाल्याच्या बाग तयार करून दिल्या आहेत ते कुटुंब होय. आजपर्यत आम्ही साडेसातशे ठिकाणी भाजीपाल्याचे उपलब्ध जागे नुसार सेटअप बिल्ड करून दिल्या आहेत. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.
ईथ पर्यंत प्रवास हा आमच्या एकट्याचा नव्हताच. व पुढचा प्रवास ही एकट्याने करण्यासारखा नाही. हे काम लोकांपर्यत पोहचण्यासाठी प्रत्येकाने आपाआपले पर्यावरणीय सहभाग व पुढाकार नोंदवला आहे. त्या ज्ञात अज्ञात व्यक्तिचां गच्चीवरची बाग मनापासून ऋणी आहे. कारण हा फक्त व्यवसाय (प्रोफेशन) नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी आमची आस (पॅशन) आहे. ज्यात आपण सारेच हातात हात घालून आरोग्य, पर्यावरण संरक्षणाच्या क्षितीजाकडे जात आहोत.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.