पोट दुखत असल्यास कुत्रा, मांजर कुत्रा हे पाळीव प्राणी दूर्वा खातात, हे ज्ञान निसर्गाने उपजतच बहाल केले आहे. मनुष्यप्राणी छोट्या छोट्या आजारांसाठी मेडिकल वरील औषधांवर अवलंबून असतो खरंतर अशा वेळी औषधांचा नियमित सेवनामुळे आपली प्रतिकारशक्ती आपण गमावून बसतो आणि मोठ्या आजारांना बळी पडण्याची शक्यता दुणावते. आजीबाईचा बटवा हा खरंतर घरगुती औषधांचा खजिना होता पण सगळंच रेडिमेट, आयत मिळावे आणि झटपट मिळावे या बाई आपण बऱ्याच गोष्टी दुरावून बसलो आहोत सहज यादी केली यादी केली तर आपल्या आजूबाजूला असंख्य अशा औषधी वनस्पती सापडतील अशा औषधांचा आपण थोडाफार अभ्यास केला तर आपल्या आरोग्य नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. अशी औषधी वनस्पतींची लागवड आपण घरच्या घरी करू शकतो त्यासाठी थोडं वाचनाची आवड, करून पाहण्याची उत्सुकता अंगी असावी.

गच्चीवरची बाग नाशिक. 98 50 56 96 44