व्यावसायिक जोड दिली आहे. आतापर्यंत गरजेचे भांडवल आम्ही वैयक्तिक कर्जाऊ रक्कम घेवून उभे करत आहोत. विविध माध्यमांव्दारे लोकांना निशुल्क व कमीत कमी खर्चात सेवा पुरवत आहोत. काम जसे जसे लोकांपर्यंत पोहचत आहे तसे तसे त्याची व्याप्ती वाढत चालली आहे. सध्या गच्चीवरची बाग एक्सटेन्शंन ही जागा कमी पडत आहे. ( २५ बाय ५० फूटाचे पत्र्याचे शेड व एकल गो पालनसाठी (५० बाय साठ फूटांचा प्लॉट- खरं तो आपला नाही) .
जसे जसे काम वाढत चालले आहे तसे तसे जागेची कमतरता भासत आहे. जागा कमी असल्यामुळे कमी जागेत अधिक पर्यावरणाचा संसार थाटतांना बराच वेळ खर्च होत आहे. सध्या या जागेत खालील प्रमाणे उपक्रम राबवत आहोत.
- देशी गोपालन ( गोठा)
- जिवामृत, ह्यमिक जल, दशपर्णी बनवणे
- गायीच्या शेणाचे खताचा प्रकल्प
- सुका पालापाचोळा (मर्यादीत स्वरूपात) संग्रहीत करणे
- विटां व बागेसाठी गरजेची खत, माती संग्रहीत करणे
- पालापाचोळ्याचा चुरा संग्रहीत करणे
- यासाठी रिकाम्या सिमेंटच्या गोण्या, रिकाम्या बाटल्या, कॅन यांचा संग्रह आहे.
- बाग प्रेमींना उपयुक्त साहित्याचे छोटासा sale Display ( मांडण्या) आहेत.
- भाजीपाल्याची रोपे मर्यादीत स्वरूपात तयार करणे.
- गाडी पार्किंग
- कृषी ग्रंथालय
भविष्यात मोठी जागा भेटल्यास वरील उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासोबतच खालील उपक्रम राबवण्याची इच्छा आहे.
- भटक्या देशी गायींचे संवर्धन व पालन करणे
- बारमाही किचन गार्डन सेटअप तयार करणे
- बारमाही टेरेस गार्डेन सेटअप तयार करणे
- बारमाही सेंद्रिय शेतीचे प्रयोग करणे
- कचरा व्यवस्थापनाची विविध प्रारूपे तयार करणे
- फळबाग तयार करणे
- इच्छुकांना पर्यावरण कामात लोक सहभाग घेता येतील असे कचरा व्यवस्थापन व शेतीचे प्रयोग.
- शाळांच्या अभ्यास सहली वाढवणे
- गोपालनासाठी आवश्यक चारा निर्मिती करणे
- औद्योगीक क्षेत्रात होणारी पानगळ ही मोठ्या प्रमाणात संग्रहीत करणे व त्यावर प्रक्रिया करणे
- लोक सहभागासोबत स्थानिक प्रशासनाला ( कचरा व्यवस्थापनात मार्दर्शक होईल) असे प्रयोग उभे करणे.
- स्थानिक रोपांची व औषधी वनस्पतींचे गार्डेन तयार करणे ( जे मोफत दिले जाईल)
यासाठी आम्हाला सातपूर MIDC नाशिक परिसरात कमीत कमी ६००० चौरस फुटांची व जास्तीची जागा हवी आहे.
एकादी जूनी कंपनी असल्यास तिची स्वच्छता ठेवणे, राखणारी करणे, झाडे जगवणे इ. कामे करू. आम्ही यासाठी आमचे स्वतःचे योगदान देवू. आपणास विनंती आहे की आम्ही पर्यावरण काम पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहोत. चेहरा हा व्यावसायिक असला तरी आमचा पिंड हा सामाजिक आहे. त्यामुळे कृपया हा लेख नाशिकमधील मित्र, आप्तेष्ठांना पाठवा.
http://www.gacchivarchibaug.in
You must be logged in to post a comment.