पुदीना लागवड
पुदीनी तोंडाला चव आणणारी स्वादिष्ट वनस्पती आहे. तिच्या बहुविध गुणांमुळे तिचा समावेश हा भारतीय व्यजंनामधे जाणीव पूर्वक केला गेला आहे. पुदीना ही तापहारी वनस्पती आहे. त्यामुळे त्याचा वापर ताज्या भाजीत केला जातोच शिवाय त्याची चटणी सुध्दा केली जाते. ताप आल्यास त्याचा विविध प्रकारच्या काढ्यामधे त्याचा उपयोग केला जातो. किंबहूना त्याचा रस हा तळहाताला व तळपायांना सुध्दा लावला जातो.
पुदीना ही वनस्पती ही कमी पाण्यावर येणारी, भूआच्छादन करणारी थोडक्यात जमीनीवर पसरणारी वनस्पती आहे. शिवाय ही ड्रयूप होणारी ( लोबकळणरी) वनसप्ती सुध्दा आहे.
गोलाकार पसरट कुंड्या, पाण्याच्य बाटल्या, जमीनीवर त्याची लागवड केली जाते. पुदीनाला बाजारात प्रचंड मागणी आहे. पुदीना शेती ही रोकड मिळवून देणारी शेती आहे. त्याचा खाद्य पदार्थामधे होणारा वापर लक्षात घेता त्यास हॉटेलींग लाईन मधे प्रचंड मागणी आहे.
त्याचा मागणीचा विचार करता शेतकरी रसायने टाकून त्याचे उत्पादन वाढवतात पण रसायनांमुळे त्याची चव ही पाणचट तर होतेच. शिवाय त्याचे औषधी गुणधर्म सुध्दा कमी होतात.
त्यामुळे घरचा पुदीना हा चवदार, तिखट व औषधी गुणांनी समृध्द असतो. त्यामुळे त्याला घरीच लागवड करणे हे नेहमीच फायद्याचे ठरते.
पुदीनाची घरीच लागवड कशी करावी….
बाजारातून आणलेली पुदीण्याची जुडी निवडून घ्यावी. त्यातील आगपेटीच्या काडी एवढी जाड असलेली काडी ही पूर्नलागवडीयोग्य असते. अशा काड्यानां आपण खतयुक्त मातीत मातीला समातंर अशी अर्धी माती अर्धी आकाशाकडे लागवड करू शकता. या काड्या बोटा एवढ्या लांबीच्या असाव्यात. या काड्यांना छोचे केसतंतू सारखे मुळ्या सुध्दा असतात. असा मुळया असलेल्या काड्या रूजवण्यासाठी उत्तम ठरतात.
बरेचदा या काड्या बशीमधे चार पाच दिवस ठेवल्यास त्यास पांढर्या मुळ्या फूटतात. अशा मूळ्या फूटलेल्या काड्य मातीत लावाव्यात. काही दिवस कुंडी सावलीत ठेवावी. ( पुढे लेख वाचा)
बरेचदा पुदीण्याची पाने ही आखडली जातात. त्यास मुरडा पडणे असे म्हणतात. यासाठी या कुंडीला रिपॉटींग करणे गरजेचे असते. वरील रोग येण्याची दोन कारणे आहेत.
- कुंडीला पाणी जास्त होते आहे हे लक्षात घ्यावे
- कुंडीतील पाण्याचा निचरा योग्य तर्हेने होत नाही.
पुदीण्याची पाने मोठी होण्यासाठी नेहमी त्यास जमीनीपासून दोन इंच उंचीवर कापणी करत रहावी. म्हणजे नव्याने येणारे धुमारे हे गतीने वाढतात. तसेच पानांचा आकार वाढतो.
पुदीण्याला तुम्ही शित पेयांच्या बाटलीतही लागवड करू शकता. या बाटल्याचा खालील भाग कापून त्यात पुदीना लागवड तर करता येतेच शिवाय या बाटल्यांना आजूबाजूने ठराविक अंतरावर छिद्रे करून त्यात पुदीना लागवड केल्यास महिना दोन महिण्यात बाटलीच्या बाहेरील भाग पुदीन्याने बहरून येतो.
परसबागेत अधिकचा पुदिना तयार झाल्यास याची पावडर करून तुम्ही गरजेनुसार स्वयंपाक करतांना वापरू शकता.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.