गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस कॉलेजमध्ये ही कार्यशाळा झाली. बागकामाची आवड असलेल्या आणि विशेषत: घरच्या घरी भाजीपाला पिकवू इच्छिणाऱ्या अनेकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘गच्चीवरची बाग’चे संदीप चव्हाण यांनी बाग फुलविण्यासाठीच्या टिप्स दिल्या. आपल्याकडे बंगल्याच्या आवारात, अवतीभवती, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा मोठा स्रोत आहे. वर्षातून दोनदा होणारी पानगळ बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरते. पालापाचोळा कुंड्य़ा, वाफे यांमध्ये भरणपोषण म्हणून आहे तसा वापरता येतो. तो गोणीत, लोखंडाच्या जाळीत भरून ठेवला तर त्याचे कंपोस्टिंग खतही तयार करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाग फुलविण्यासाठी फार खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी महिला वर्गाला दिलासा दिला. माठ, बेसिन, विटांचे वाफे, गोणी, करवंटी, बॉटल्स, गडू, रंगाचे डबे अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू उपयोगात आणून त्यामध्ये रोपे वाढविता येतात, असे त्यांनी या वेळी सांगितले. शत्रूकीड आणि मित्रकीड अशी दोन प्रकारची कीड असते. ती मारून टाकण्यापेक्षा नियंत्रित करणे आवश्यक आहे. मित्रकीडही मारली गेली तर रोपांना आवश्यक पोषण मिळत नाही. आपल्याकडे गांडूळखताचा वापर अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. आपल्याकडे कोरडे गांडूळखत मिळते. ते जेवढे ओले असेल, तेवढे पिकांसाठी चांगले असते. रासायनिक औषधांच्या वापरामुळे ही गांडुळेही मारली जातात. तसे होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पावसाळा आला की बाग विकसित करण्याकडे आपला कल अधिक असतो. खरे तर बाग विकसित करायची असेल तर जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पालापाचोळा साठविण्यासह अन्य तयारी सुरू करायला हवी, अशा उपयुक्त टिप्स या वेळी मिळाल्या.
http://www.gacchivarchibaug.in
आणखी वाचा…
Not Only Consultancy …Much more
गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…
पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?
बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…
कार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…
गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा
Comments are closed.