पावसाळा ते हिवाळ्याच्या शेवटांपर्यंत आपल्या बागेतील झाडांची पाने कीड खातातच. अशा वेळेस पाने ही कोणती कीड खाते याचा अभ्यास असणे फार महत्वाचे आहे.

जी अळी पाने खाऊन खाली बाजरीच्या दाण्या एवढी हिरवी विष्टा टाकत असेन तर अळी फूलपाखरू किंवा पंतगाची असू शकते. तर जी अळी पाने खाली टाकून ओलसर व ढब्बे पडण्यासारखे हिरव्या रंगाची विष्टा टाकत असेन तर ती अळी केसाळ अळी असते. ज्याला घुल्या असे म्हणतात. ही टोकदार व विषारी केसं असतात. ज्यांच्या स्पर्शाने त्वचेला खाज सुटते. तर पानानां बाहेरच्या बाजून आत शिरत पान हे वर्तुळाकार खाल्लेले दिसत असेन. किंवा पानांना मधे गोलाकार वर्तुळाकारात कापलेले दिसत असेन तर ती अळी नसून ती माशी असते.

जिला लिफ कटर बि ( Leaf cutter bee ) असे म्हणतात. ही माशी आपली अंडी एकाद्या भिंतीच्या कपारीत देते. वा एकाद्या निर्मनुष्य जागेवर मातीच्या गोलाकार घर तयार करते. अशा ठिकाणी अंड्यातील पिल्लांना भविष्यात पोषण मिळावे म्हणून पानांची गुडांळी करून त्यात अंडी सोडते. तसेच पान हे तसेच रहावे म्हणून त्या छिद्रास ओल्या मातीचे लेपन करते. अन्न प्रिझर्व करते, हवा बंद करते.

आपण मारे रात्री टॉर्च घेवून, दिवसा मोठं डोळे करून अळी शोधत असाल तर उपयोग नाही. कारण ही माशी कितीतरी वेगाने आपल्या तोंडाने पानांचा कटर प्रमाणे तुकडा पाडते व निघून जाते. तुम्ही जर कीडीना परिचित असाल तसेच ते ही तुम्हाला परिचीत असेन तर तो नयनरम्य देखावा आपल्या डोळयांनी बघता येतो. फार मजा येते.

आता तुम्ही म्हणाल हे दृष्य आमच्या डोळ्यांना कधी बघायला मिळेल ? आपण त्यांचा परिचय करून घेवू पण आपल्याला कधी ओळखू लागतील ?

सोप्प आहे. तुम्ही जर बागेत काम करत असाल. तुम्ही त्यांना व त्यांच्या सारख्या कीडीनी हानी पोहचवत नसाल तर ते नक्की तुमचा परिचय करून घेतील. कारण आपल्या मानसिकते नुसार आपलं शरीर एक प्रकारचे गंध तयार तयार करतो. तो गंध ते ओळखू लागले की कीड आपल्याला ओळखू लागतात.

मला याचे फार अनुभव आलेत.. बाग काम करतांना सुर्यप्रकाशात आलेले गांडूळ तडफडतात. पण माझा हात लागला की लगेच शांत होतात. तसेच फुलपाखरं हे आजूबाजूला फिरायला लागतात. त्यांना फोटो, व्हिडीओ घेण्यापुरत असाच शांत बस असे मनात म्हटले तरी बसून राहतात. ही खरी निसर्गासोबतचं जोडलेली नाळ आहे. ज्याच्याशी जुळवून घेता येते. असो तर आपले अस्तित्व  त्यांच्या नाकाला जाणवतं व ते संदेश सुध्दा देतं की हे मित्र आलेत की शत्रू… कारण नाक हेच त्यांचे इंद्रिय असते. व ते फार संवेदनशील असते.

तर अशा माशांनी आपल्या बागेत पाने खाणे म्हणजे या माशीचे अस्तित्व आपल्या बागेत असेन तर धन्यवाद माना. कारण आपण त्यांना अन्न उपलब्ध करून दिले. तसेच तुमची बाग ही विषमुक्त आहे हे त्याचे निर्देशक आहे. नेहमीचे झाडे म्हणजे गुलाबाची पाने असी कापलेली दिसतात. फुलपाखरांच्या अळ्या व या प्रकारच्या माशीने झाडं संपूर्ण खाल्ले तरी झाडं नव्याने येते. कारण निसर्ग हा एका हाताने घेतो व दुसर्या हाताने देतो सुध्दा. त्या झाडांला पुन्हा वाढण्याचे दान तो भरभरून देतो. त्यामुळे काळजी करू नये. ते आहेत म्हणून आपण आहोत हे लक्षात घ्या. जगात फक्त मधमाशा परागीभवन करत नाही. तर जेवढी काही कीड, पंतग आहेत हे सारेच परागीभवनाची आपआपाली जबाबदारी निभावत असतात. यांना जैवविवधतेत फार महत्व आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अशा किडी तयार होतात व नंतर सुप्तावस्थेत जातात. कारण निसर्गाने प्रत्येक जिवाला काहीतरी कर्म दिले आहे. ते कर्म जो तो निभावत असतो. त्यात अज्ञानी माणसांने हस्तक्षेप करू नये. कारण तो निसर्गापुढे फार अज्ञानी आहे व मुर्ख, उपद्रवी प्राणी आहे. बहावा  हे झाडं अशा माशांचे अन्न असते. विशेषतः ठराविक झाडांची कोवळी पाने हे त्यांचे अन्न असते. ही माशी आकाराला काळ्या मुंगळ्यासाऱखी आखीव रेखीव पण रंगाला सोनेरी असते. तिला पंख असतात.

बागेतील अळ्यांना ओळखायला शिका, कारण कोण उपद्रवी आहे. कोण पाहूणे आहेत हे जर कळाले तर निसर्गाचा एक भाग आपण संरक्षित करत आहोत. किंबहूना एक साखळी जोडत आहोत. याची खात्री बाळगा व बिनधास्त व्हा.

तसं ज्ञानेश्वरांच्या पसायदानात म्हटलंच आहे.

भूतां परस्परें जडो ll मैत्रं जीवांचें ll2ll

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.