बागेला पाणी कधी द्यावे… (watering time)

बागेला किती पाणी द्यावे बागेला कधी पाणी द्यावे या विषयी बरेच प्रश्न असतात. तसेच त्याविषयी विविध मत प्रवाह आहेत. अर्थात हे सारे कुंडीत काय भरले आहे. प्रचलीत पध्दत म्हणते माती व खत वापरणे व दुसर्या दोन पध्दती ज्या गच्चीवरची बागेने विकसीत केल्या आहेत. पहिली पध्दतः  नारळ शेंड्या, पालापाचोळा व २० टक्के माती व दुसरी पध्दत म्हमजे  बिशकॉम वापरून भरली आहे यावर निर्भर आहे. या पध्दतीवर पाण्याची प्रमाण, त्याची वेळ ठरवता येते.  येथे साधारण पाणी देण्याची वेळ कोणती या विषयी चर्चा करणार आहे.  

पाण्याचे लाड कमी करा.. लेख वाचा..

बागेला पाणी देणे हे फार महत्वाचे व कौशल्याचे काम आहे. कारण पाण्यामुळेच मातीत असलेल्या घटकांचे वाफसा म्हणजे गंध तयार होतो व त्यातून झाडे आपले पोषण मिळवत असतात. खरं तर बागेला पाणी मोसमानुसार किती द्यावे या बद्दल मी मागे सकाळ मधील लेखात या विषयी सविस्तर सांगितले आहेच. तर बाग व आपलं नातं हे आई व लहान मुलांसारखे असेल तर पाणी देणं योग्यपणे जमते. आईला कसे कळते की बाळाला तहान लागली, भूक लागली, झोप लागली, भिती वाटते की काही टोचतय. हे ति बिनचूक समजू लागते तसेच आपल्या बागेला किती पाणी द्यावे हे  तुमचे निरिक्षण पक्के असेन तर समजू लागते. येथे मुद्दा आहे. पाणी कधी दयावे. पाणी देण्याच्या दोन वेळा सहसा आपण पाळतो. एकदा सकाळी सहा ते दहा व दुपारी पाच ते सात..

पण या वेळेत पाणी दिल्यावर काही परिणाम लक्षात आले आहे.

एकतर सकाळी पाणी देणे म्हणजे भूक न लागताच (कामाला सुरू लागण्याआधीच, कार्यप्रवण होण्याआधीच) झाडांनाच जेवू घातल्यासारखे आहे. या मुळे पाण्याचे योग्य तर्हेने वापर होत नाही. सकाळी दहा नंतर या पाण्याचा त्यांना उपयोग होतो तो पर्यंत झाडांची मुळं ही पाण्यात थोडक्यात थंडाव्यात पाय बुडवून ठेवण्यासारखे आहे. पाण्याचा संसर्ग हा मुळांना होण्याची शक्यता असते. सायंकाळी पाणी देणे म्हणजे झाडांना काम नसतांना त्यांना जेवू घातल्यासारखे आहे. येथे त्यांना अर्जिर्ण होण्याची शक्यता असते. तसेच वर सांगितल्याप्रमाणे पाण्याचा संसर्ग हा मुळांना होण्याची शक्यता असते. वरील दोनही वेळेस पाणी दिल्याने झाडं ही रोगांना बळी पडलेली दिसली.

मग यावर उपाय काय..

बागेला पाणी देण्याची  योग्य वेळ म्हणजे सकाळी दहा नंतर देणे.  कारण या काळात वातावरणात उष्मा वाढतो. कुंडीतील मातीत वाफसा तयार होण्यास गती मिळते. हीच वेळ झाडांना सुर्यप्रकाशात अन्न तयार करण्याची असते. अशा वेळेस त्यांना पाणी देणे गरजेचे आहे. म्हणजे दिलेले पाणी कुंडीतील माती पडल्याबरोबरच त्याचा उपयोग, वापर व्हायला सुरूवात होते. म्हणजे पाणी हे मुळांजवळ साठून राहत नाही. तसेच वाफसाव्दारे निर्माण होणारा गंधांची प्रक्रिया योग्य प्रकारे होते. या वेळेस पाणी दिल्याने झाडांची वाढ चांगली झालेली दिसली. तसेच रोगराई पासून दूर राहिलेली दिसली.

याला एक शेतीचा दाखला पण आहे. पन्नास शंभर वर्षापूर्वी मोटेने पाणी दिले जायचे. सकाळी शेतात गेल्यावर सुरूवातीची कामे आटोपली की घरून न्याहरी यायची ती खाऊन झाली की शेताला पाणी दिले जायचे ते दुपार जेवणापर्यंत त्यांनतर आराम व शेतातील इतर कामे केली जायची. आपले पूर्वज फार हुशार होते. त्यांनी शेतीही निसर्ग समजून केली. म्हणून अनेक वर्ष ते पिढ्यापिढ्या ते चालत आले. आताच्या आधुनिक युगात हे ज्ञान कालबाह्य ठरवण्यात आपण यशस्वी झालो नि पायावर कीड नाशकांचा धोडां पाडून घेतलाय. असो.

 तेव्हा नक्की हा प्रयोग करून पहा… तुम्हालाही काही नाविण्य आढळल्यास नक्की कळवा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक. 9850569644