Site icon Gacchivarchi Baug : Grow Organic

भविष्यात गच्चीवरची बागेची सेवा, उत्पादनांच्या किमती आणखी कमी होणार…

Advertisements

भविष्यात गच्चीवरची बागेची सेवा, उत्पादनांच्या किमती आणखी कमी होणार…

गच्चीवरची बागेचा मेरू दंड हा गारबेज टू गार्डन हाच आहे. इच्छुकांना सोशल मिडीयाव्दारे निशुल्क मार्गदर्शन करणे, इच्छुकांना आमची बागदर्शन करतांना निशुल्क शंका निरसन करणे, वर्तमान पत्रांसाठी निशुल्क लिखाण करणे आणि व्हिडीओव्दारे निशुल्क मार्गदर्शन करत आहोत. कारण आमच्यासाठी हे केवळ प्रोफेशन नसून पॅशन आहे.

ही सेवा सर्वासाठी उपलब्ध आहेच कारण आम्ही समाजाचेही देणं लागतो. गच्चीवरची बागे व्दारे दिल्या जाणार्या सेवा सुविधा या आज माफक किमतीत देत आहेत. ज्या काही इच्छुकांना महागड्या वाटतात. वाटू शकतात. पण आताच्या किमती सुध्दा या मागील सात वर्ष स्थिर होत्या. आणि त्यात वाढ फक्त ही युनिट मागे ( लिटर, प्रत, पाकीट, किलो मागे) एक रूपयाच दरवर्ष वाढवत आहोत.

पण याही किमती आम्ही येत्या दोन वर्षात ५० टक्के कमी करणार आहोत. कारण हा विचार, हा पर्यावरण संवर्धनाचा धागा व लोकांच्या आरोग्याचा वसा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिकला हिरवेगार करण्याचे स्वप्न आहे.

सध्या हा पर्यावरणीय रोजगार उभा करतांना आम्ही तन, धन वापरले आहे. २०१३ पासून शुन्य संकल्पनेपासून सुरू झालेला प्रवास आता हे काम पूर्ण करण्यासाठी झेप घेण्यास तयार झाले आहे. आम्हाला, गाय, गोठा, शेड ( स्टोएरेज) गाडी, पुस्तके, संकेतस्थळ असी गरजेची चौकट पूर्ण झाली आहे. आमचे घर आणि उद्योग हा एकच आहे. सध्या ही चौकट पूर्ण करण्यासाठी आम्ही शक्य तेथून विविध कर्ज घेत उदयोग उभारला आहे. या कर्जाची रक्कम जवळपास १८ लाखापर्यंत आहे. हे कर्जातील काही मुळ रक्कम ही येत्या तीन वर्षात संपणारच आहे. तर काही रक्कम ही दिर्घकाळ असणार आहे. आम्ही सुरवाती पासूनच या संकल्पनेचे संपूर्ण पालकत्व समाजातील दातृत्वाने एकहाती स्विकारावे यासाठी प्रयत्नात आहोत. आजही कोणी ही पालकत्व स्विकारले तर आम्हाला आमच्या सोयी सुविधा या आजच्या दरापेक्षा ५० टक्के कपात करून पुरवता येणार आहे. शिवाय महिला बचत गट, युवकांना रोजगारही निर्माण करून दिला जाणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यातून जो काही पर्यावरण संवर्धनात लोकसहभाग वेगाने वाढता येईल.

आम्हाला खूप काही मोठ्या घरांची आता हौस नाही. गच्चीवरच्या बागेतूनच शेती करण्याचे समाधान मिळत आहे त्यामुळे वेगळी शेती आता घेण्याची इच्छा नाही. सध्याचे Gacchivarchi Baug Extension जागा कमी पडते आहे. पण कुणी सेवाभावी वृत्तीने दिली तरच तेथे शिफ्ट होणार आहोत. नाहीतर आज्न्म तेथूनच कारभार करण्याची इच्छा आहे. मुलाचे शिक्षणावर फार काही खर्चाची शक्यता कमीच आहे. काऱण आम्ही त्याला खर्चिक शिक्षणापेक्षा self-Directed Learning वर भर देत आहोत. त्यामुळे या रोजच्या जगण्याच्या खर्चा व्यतिरिक्त फार काही व वेगळी गुतंवणून नसणार आहे. त्यामुळे   सध्या  आमच्या डोक्यावरील हे कर्ज एक हाती फेडले गेले तर आम्ही आमची पुस्तके, सेवा, उत्पादने ही कमीत कमी किमतीत देणार आहोत. जे सर्वदूर पोहचू शकेल.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

Exit mobile version