शेतावर ऑरगॅनिक भाजीपाला पिकवण्यासाठी गच्चीवरची बाग तर्फे खालील विषयावर दोन दिवसीय मार्गदर्शन केले जाते. त्यात खालील विषय सहभागीना प्रात्यक्षिकातून समजावले जातात. विषय खालील प्रमाणे

कंपोस्टींग, संजीवक, कीड नियंत्रक, व्हेजेटेबल बेड, बियाणं लागवड, रोपवाटीका, सादरीकरण

१)कंपोस्टींग 

अ)aerio Bricks Composter 1200 विटा.. फावडा,

आ)डेव्हील डायजेस्टर  २०० लिटर ड्रम, एक पोतं नारळ शेंड्या, एक पाटी विटांचे तुकडे,  पाच पोती सुका पालापाचोळा,

२)संजीवक

अ)जिवामृत  १० किलो देशी गायीचे शेण, १ किलो गुळ, १ किलो बेसनपिठ, २०० लिंटर रिकामा ड्रम, १० लिंटर देशी गायीचे गोमुत्र, १५० लिटर पाणी

आ)ह्यूमिक जलः १ किलो साधे रेशनचा शिजवलेला तांदुळ, रिकामा माठ

इ)गारेबज इंजाईम  :  एक किलोखऱकटे अन्न ( शिळा भात पोळी, भाजी) हिरव्या भाज्यांचा कचरा १ किलो, २० लिटर बादली.

ई)वर्मी वॉश  :  २० लिटर रिकामी बादली, वाळेलेलं शेण्या किंवा गोवर्या, २०० ग्रॅम गांडुळ

उ)घन जिवामृत १० किलो देशी गायीचे शेण, १ किलो गुळ, १ किलो डाळीचे पीठ,

ऊ)गांडुळखत प्रकल्पः सुकेशेण, गांडुळे चार बाय पाच प्लास्टिक कागद. टिकाव, फावडे.

३)कीड नियंत्रक:

अ)गोमुत्र : 1 लिटर गोमुत्र , एक लिटर रिकामी बाटली

आ)दशपर्णी :  एक एक किनो पाला (सिताफळ, कडुनिंब, कन्हेर, पपई, रूई, बकाम, करंज, निर्गुडी, टणटणी, एरंड, गुळवेल,) १० किलो देशी गायीचे शेण, ५० लिटर गोमुत्र, १०० लिटरचा रिकामा ड्रम.

इ)लमितः अर्धा अर्धा किलो लसून, गायछाप २ पुड्या, मिक्सर, बादली, साडीचा कपडा, स्प्रेपंप

ई)चुल्हीतील राखः चाळणीने चाळलेली

उ)निबार्कः १ किलो कडूनिंब पाला, एक पातेले, गॅस

ऊ)लाईट टॅपः पिवळा नाईटबल्ब, २ मीटर वायर. खराब ऑईल. परातीसारखे भांडे

४)र्व्हेजेटेबल बेडः  १०० चार इंच बाय नऊ इंच विटा, पाच पोती सुका पालापाचोळा, सुकी माती, एक पोत नारळ शेंड्या, १० किलो खत.

५)बियाणे लागवडः विविध भाज्यांच्या बियांची पाकीट.

६)रोपवाटीकाः १ पाटी लाल माती, एक पाटी खत १० विविध आकाराच्या काळ्या प्लास्टिक नर्सरी पिशव्या 

७)सादरीकरणासाठी एक लॅपटॉप किंवा टीव्ही.

सादरीकरणात विविध खतं व कीड ओळख व नियंत्रक कशी तयार करावीत, त्याचे महत्व, त्याची व्यापकता, बियाणं निवड, बियाणे लागवड व कालावधी व प्रक्रिया, बिज संस्कार, एकात्मिक कीड नियंत्रणांच्या पध्दती, मल्टीलेअर फार्मिंग (भाजीपाला, फळभाज्या, वेलवर्गीय, कंदमुळे, फळझाडे, एक्सोटींक्स भाज्या) खत म्हणजे काय, खताचे प्रकार,

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक.