भारतीय जीवनशैलीत गोमातेला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळेच तिला धार्मिक कार्यात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. खर पाहता तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक आधार आहेतच. त्यातूनच तिचे महत्व अधोरेखीत होते. गाय म्हटली की आपल्या कानात तिच्या गळ्यातील घंटेचा नाद घुमतो. तिचे हबरणे, गोमुत्राचा गंध… सारवलेले अंगण तर कधी अंगणात मारलेला सडा…
विदेशी गायीपेक्षा देशी गायीला खूप महत्व आहे. त्यांचे दूध हे आरोग्यदायी व पोषक आहे. झाडांमधे जसे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते. ज्याचे प्रत्येक भाग हा उपयोगी आहे. तसेच गायीचे सुध्दा… गायीच्या शेणाचा उपयोग प्राचिन काळात श्रीकृष्णांनी पहिल्यांदा केला. म्हणूनच एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलला म्हणजे गाय उत्पादित पदार्थामुळे गाव स्वांवलंबन झाले.
तर शहरी परसबागेत देशी गायीच्या गोमुत्राला महत्व आहेच. त्यामुळेच आम्ही सुध्दा एक देशी गाय पाळली आहे. आता शहरात हे कसे शक्य आहे. आम्ही ते शक्य करून दाखवले आहे. अर्थात काही सुविधा असणे गरजेचे असते. मोकळी जागा, चारा पाणी, औषधे व काळजी घेण असं केल तर ते नक्कीच शक्य आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गायीच्या शेणांचे आम्ही वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे तिच्यापासून मिळणारे शेण व त्याचे खत हे खूपच उपयुक्त ठरते आहे.
तर गायीच्या गोमुत्राला मानवी आरोग्यात जसे अन्यन्य साधारण महत्व आहे तसेच हे शहरी परसबाग, गच्चीवरची बाग फुलवण्यासाठी उपयुक्त आहे.
गोमुत्राचे बागेसाठी फायदे…
संजीवक द्रावण…
बागेला आपण ज्या प्रमाणे जिवामृत पाणी देतो. तेसच गोमुत्र पाणी देता येते. बागेला संजीवक द्रावण देताना १५ दिवसांचे तरी अंतर असावे. म्हणजे त्याचा परिणाम दिसून येतो. एकास दहापट पाणी मिसळून झाडांना जमीनीत दिले असता त्यातून पोषण द्रव्ये मिळतात. तसेच मुळांना मुळकूज रोग होत नाही. गोमुत्राने भिजलेली किंवा अंश असलेली माती हे गांडूळांना फार आवडते. त्यामुळे गांडूळांची संख्या वाढीस मदत होते.
फवारणी…
गोमुत्र आहे तसे बागेत फवारू नये. त्यात एकास दहापट पाणी मिसळावे. व त्याची फवारणी करावी.फवारणी ही सायंकाळी ३ वाजेनंतर करावी. म्हणजे गोमुत्राच्या उग्र वासाने कीड पळून जाते. काळा मावा व सफेद मावा यावर गोमुत्रपाण्याची फवारणी फार उपयुक्त ठरते.
गोमुत्राचा रंग, गंध व स्वभाव..
गोमुत्र शक्यतो ताजे असतांना पाण्यासारखे पिवळे दिसते. तर काही कालावधी नंतर ते सोनेरी रंगाचे दिसू लागते. गोमुत्र जसे जूने होत जाते तसा त्याचा रंग तांबडा, लाल होत जातो. गोमुत्र व मध हे निसर्गातील असे पदार्थ आहेत. ते जसे जूने होत जाते त्याप्रमाणे ते उपयुक्त ठरत जाते. त्यामुळ गोमुत्राचा संग्रह हा कितीही जूना असला तरी चालतो. गोमुत्राचा गंध हा तिव्र असतो. पण तो सहन करता येतो. बागेत गोमुत्र फवारल्याने आपलीही श्वसन प्रक्रियेची क्षमता (deep Birthing) वाढते. गोमुत्र हे वातावरणातील विषाणू मारण्याचे काम करते. म्हणून पूर्वी कोंदट खोल्यामध्ये ते शिंपडले जायचे . जेणे करून श्वास घेण्यास मदत होईल.
गोमुत्र कुठे मिळेल… ध्रुवनगर बस स्टाप, सातपूर गंगापूर लिंकरोड, चुल्हीवरची मिसळ जवळ, नाशिक.
एक लिटर पॅकिंग मधे २० लिटर प्रमाणे उपलब्ध आहे. घरपोच हवे असल्यास मिळेल. अटी व शर्ती लागू.
इतर उपयोगः फरशी पुसण्यासाठी केला असता. फरशी चकचकीत व निर्जंतूक तर होतेच. शिवाय घरातील झुरळं पळून जातात. हवेतील विषाणू मरतात व वातावरण शुध्द होते.
दक्षताः बागेसाठी जमा होणारे गोमुत्र हे गोठ्याला उतार करून एका बादलीत संग्रहीत केले जाते. त्याचा उपयोग मानवी आरोग्यासाठी करू नये. मानवी आरोग्यासाठी वेगळ्या व शुध्द पध्दतीने गोमुत्र गोळा करतात. तसेच फवारणी करते वेळेस जूने गोमुत्र असल्यास पाण्याचे प्रमाणा वाढवावे.
गोमुत्र जमा करण्याचा गोठा…. व्हिडीओ पहा…
http://www.gacchivarchibaug.in wts app / Telegram 985069644
You must be logged in to post a comment.