माननिय अमिर खान..
आपण एक महान कलावंत आहातच पण समाजाप्रती, सामाजिक प्रश्नांप्रती आपल्या अंगी असलेली संवदेनशिलता फार महत्वाची आहे. आपण सत्यमेव जयते या कार्यक्रमाव्दारे सादर केलेले सामाजिक प्रश्नावरील भाग, मुलाखती हे माझे आयुष्य घडवण्यात फार मोलाची मदत केली आहे. हे सांगण्यासाठीच हा पत्र प्रपंच….
मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक. वय वर्ष ४२, आपल्या पर्यंत पोहचण्याचा माझे काम पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न फार कमी पडला असे जाणवतेय. पाणी फांऊडेशन मधील काही मित्रांव्दारे आपल्या पर्यंत गच्चीवरची बाग हे काम पोहचावे म्हणून शब्द टाकला. पण फळास आला नाही. हे पत्र आपल्यापर्यंत कसे व कधी पोहचेल हे मला माहित नाही. पण हे पत्र लिहावे असे बरेच दिवसापासून मनात ठरवत होतो. कदाचित हे ई-मायाजाल आपल्यापर्यंत हे पत्र पोहचेल हा विश्वास आहे.
हे पत्र लिहण्याचे कारण म्हणजे आपण २०१२ या वर्षी सामाजिक प्रश्नांबद्दल संवदेनशिलता वाढावी य़ासाठी सत्यमेव जयते हा कार्यक्रम प्रसारित केला. त्यातील सारे भाग मी डाऊनलोड करून ते जपून ठेवले होते. वारंवार पाहिले. त्यावेळेस इंटरनेट, मोबाईल घरोघरी पोहचलेले नव्हते. माझ्यापण घऱी नव्हते. आपण सादर केलेला कचरा व्यवस्थापनावरील एक भाग व Organic V/s chemical Farming हे भाग पाहिले. विचार मंथन झाले. व त्यातून गारबेज टू गार्डन या संकल्पनेवर आधारीत गच्चीवरची बागेचा जन्म झाला. व हे काम सर्वार्थाने फुलवण्याची प्रेरणा मिळाली.
आपण सादर केलेला हा कार्यक्रम माझ्यासाठी Life Changing ठरलाय. हे फक्त आपल्याला या पत्रातून सांगायचे आहे. कदाचित हे आपण हा भाग सादर केला नसता, हा विषय निवडला नसता तर गच्चीवरची बाग या कामाची प्रेरणा मिळालीच नसती.
सफाई कामगार, घंटागाडी कामगार या मुद्यावर नाशिकमधे आंदोलन चालू होते. सफाई मित्रांच्या कहाण्या जवळून पाहिल्या, वाचल्या, त्यासोबत राहिलो. नाशिक मधील डंपीग ग्रांऊडला भेट दिली. तेथील विदारक परिस्थिती पाहिली. व कचरा व्यवस्थापन ही सरकार, प्रशासनापेक्षा लोकांची अधिक जबाबदारी आहे. विशेषतः कचरा जर मि निर्माण करतो तर त्याची विल्हेवाट नव्हे तर त्याचे व्यवस्थापन करणे ही माझीच जबाबदारी आहे या विचारातून प्रवासाला सुरवात झाली. या दरम्यान शेतकर्यासोबत सेंद्रियशेतीसाठीच्या कामाची संधी मिळाली.
लोकांना खत तयार करा असे सांगण्या पेक्षा काहीतरी नाविण्यपूर्ण दिले पाहिजे हा विचार करता करता रासायनिक शेतीमुळे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम भयावय आहेत याची जाणीव झाली. घरी कचरा व्यवस्थापनावर प्रयोग सुरू झाले. रसायमुक्त अन्न निर्मितीसाठी या प्रयोगांचा फार मोठा फायदा झाला. कारण बाजारात मिळणारे अन्न, भाज्या या खात्रीशिर विषमुक्त असतील याची खात्री नाही. शेती मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही. कुणीच देवू केली नाही. अशा वेळेस गच्चीवरच भाजीपाला उगवण्याचे प्रयत्न सुरू केले. या प्रयोगांना यश मिळत गेले. आता दहा टक्के माती वापरून आम्ही लोकांच्या गच्चीवर भाज्या उगवून देण्याचे काम करत आहोत. नंतर गच्चीवरची बाग नावाचे अनुभवाधारित पुस्तक प्रकाशित केले. लोकांना पुस्तक आवडू लागले पण त्यांना भाजीपाला फुलवण्यासाठी पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या कोण गोळा करणार, त्या कोण आणून देणार म्हणून हे काम आम्हीच सुरू केले. त्यासाठी छोटा हत्ती (टेम्पो) घेतला. आता त्यावर आम्ही स्वच्छमेव जयते, स्वच्छभारत या टॅगलाईन व्दारे लोकांपर्यंत जागृती करत आहोत. येणार्या पिढ्यांना उपलब्ध जागेत विषमुक्त भाजीपाला पिकवावा म्हणून आम्ही पर्यावरण पुरक गच्चीवरची बाग या उद्मशिलेतेला सुरवात केली. त्यासाठी आम्ही देशी गायीचेही पालन केले. परिसरातील, बागेची देखभाल करतांना मिळणारा जैविक कचरा मशिनमधे बारिक करतो व त्यास कुंड्या भरतांना Potting Mix म्हणून वापरतोय. आता माती फक्त १० टक्के वापरतो व ९० टक्के जैविक कचरा वापरतो जो जाळला अथवा फेकला जातो. आता कामाचा व्याप खूपच वाढला आहे. आमचे काम पहावयास, त्याची यू ट्यूबवर फिल्म बनवण्यासाठी बरीच मंडळी येतात. आम्ही त्यांनी कचरा व्यवस्थापन व गारबेज टू गार्डन याची माहिती देत असतोच.
या पत्राव्दारे मी आपल्याला विनंती करतो की पर्यावरण संवर्धनासाठी, कचरा व्यवस्थापनासाठी माझे व माझ्या कुटुंबाचे हे प्रयत्न पाहण्यासाठी नाशिकला गच्चीवरीची बागेला एकदा भेट द्या. आपल्याला एकदा प्रत्यक्ष भेटून आपण सादर केलेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाने समाजात काय प्रेरणा दिली हे सांगायचे आहे. आम्ही फार कष्टाने मेहनतीने हे काम उभे केले आहे. Please एकदा आम्हा सर्वांना भेटायला या… आपल्या येण्याने आमच्या कुटुंबियांचा, मित्र परिवाराचा आत्मविश्वास वाढेल. आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल. कारण या कामाचे संपूर्णतः प्रेरणास्त्रोत आपणच आहात. आपली सत्यमेव जयतेची टीम आहे.
मी वाचकांनाही विनंती करतो की हे पत्र माननिय अमिर खान यांच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करावी. कारण हे पत्र तुम्ही पुढे पाठवलेतरच हे पोहचेल. मी एकटा एवढेच करू शकतो.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक.
Home Grow Vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक – YouTube
9850569644 / 8087475242
You must be logged in to post a comment.