बरीच मंडळी आपल्या घराच्या, बंगल्याच्या आवारात, शेतावर, फार्महाऊस येथे नारळाचे झाडे लावतात. काही खोबर्याचे नारळ असते कर काही पाणीदार शहाळ देणारं नारळं असतात. यांना येणारी नारळं ही वेळेवर काढली गेली तर त्याचा उपयोग होतो. रोज उपयोग करण्यायोग्य अनेक गोष्टीही असतात. बर्याच मंडळीना एकतर रोज काय उपयोग करायचा हे ठावूक नसत किंवा कुटुंबातील संख्या कमी असल्यामुळे त्याची विक्रीपण करतात.
पण घरीच नारळ किंवा शहाळाचा उपयोग करत असतील तर त्याचा कचरा फार तयार होतो. ही ओली शहाळं व सुक्या नारळांच्या कचर्याचं काय करायचं हे सांगणारा हा लेख…
सुकी नारळ असतील तर ते हॅंड ऑपरेटेड मशीन ते सोलून घ्यावे. त्यातील पाणी काढता आले तर उत्तम. बरेचदा त्यातील खोबरे काढणे जरा वेळखाऊ व जिकरीचे असते. यावर उपाय आहे. त्या दोन वाटयांना उपडेच उन्हाच्या दिशेने ठेवा. कालातंराने नारळाच्या टणक भागापासून खोबरे सहजतेने बाजूला करता येते.
सुक्या नारळाच्या शेंड्या, सुकी शहाळं ही तुकडे करून कुंड्या भरतांना तळाशी वापरा किंवा एरिओ ब्रिक्स कंपोस्टींग अथवा एरिओ ब्रिक्स बेड पधद्तीत तळाशी वापरा म्हणजे वर्षभराने ते कुजून जातात.
ओली शहाळं असल्यास त्याचे व्यवस्थापन वेगळ्या पध्दतीने करावे लागते.
आपल्याकडे फार्म हाऊस असल्यास किंवा शेतातील जमीन पुरता येतात. त्यासाठी ओल्या शहाळात, शेण, ओली माती भरावी. व हे उलटे करून ठेवावेत. व मातीने झाकून टाकावेत. व विसरून जावे म्हणजे कालांतराने म्हणजे वर्षभरात याचे जमीनीत छान खतात रूपांतर होते.
आपल्याला त्याचे घरीच व्यवस्थापन करावयाचे असल्यास त्याला खालील प्रमाणे उपाय करता येतील.
- त्याचे तुकडे करा. वाळवून घ्या, कंपोस्ट हौदात, ड्रम मधे त्याचे खत तयार करता येईल.
- तुकडे करून वाळवून घेतल्यास त्याचा इंधन अथवा शेकोटी म्हणून वापर करा.
- बागेत कुंड्या किंवा वाफा भरण्यासाठी त्याचा वापर करा.
- ही शहाळं वाळल्यानंतर त्याचा रोपे लावण्यासाठी उपयोग करा.
- त्याचे कोकोपीट तयार करता येईल. पण त्यासाठी घरगुती श्रेंडींग मशीनची गरज लागेल.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644
You must be logged in to post a comment.