कृपया लेख वाचण्यासाठी आपला थोडा वेळ हवाय.. आपला दिलेला वेळ आमच्यासाठी खूप मोलाचा असेन. आपणास आम्ही मदतीचे आव्हान करत आहोत. पण खरं सांगायचे तर मदतीबरोबर आपल्या संवेदनशीलतेचीही गरज आहे. कारण आपल्याला सांगावे की नाही या विचार मागील महिण्यापासून करतोय पण ते लेखाव्दारे सांगायचे ठरवले आहे.
आपण सारेच आज एका विचित्र संकाटातून मार्ग काढत आहोत. आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिली कोरानाची लाट संपत नाही तर दुसरीने हाहाकार माजवला आहे. घरात किंवा शेजारी एक तरी माणूस आजाराने ग्रस्त आहे किंवा घाबरलेला आहे. घरातून बाहेर पडावे तर कोरोनाशी कुठे गाठ पडेल याचा भरोवसा नाही. घरात रहावे तर हाता तोंडाची गाठ पडणे दुरापस्त झालेय. हाता तोंडांची गाठ पडेनही. आहे ते खाता येते. पण रात्रीची झोप उडाली कारण दिवसा कामात मन रमवता येते. पण अंधार सक्तिचा आराम करावयास लावतो. पण झोपेत पूर्वीसारखा निवांतपणा राहिला नाही. कारण बॅंकाकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांच्या तगादा चालू झालाय. मागील वर्षी तीन महिने कर्ज वसूली बंद होती म्हणून निवांत होतो. त्याची कसर मधल्या काळात काही अंशी भरून काढता आली. पण आता तो दिलासा यावेळेस नाही. उपलब्ध वेळेचा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हे आजच्या घडीला आमच्यासाठी तरी फायद्याचे आहे. प्रत्येकाने लस टोचून घेतली तरच कोरोनावर मात करता येईल. पण येते दोन तीन महिने तरी हे चित्र दृष्टीक्षेपात येईल असे वाटत नाही. तो पर्यंत दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न आहे. कोरोनाची लाट संपेलही पण येणारे आर्थिक संकट हे महाभंयकर असणार आहे. याचा अनुभव आता यायला लागला आहे.
गच्चीवरची बागेला या वर्षी आठ वर्ष पूर्ण झालेत. पर्यावरणाला उद्योजकतेची जोड देतांना जे जे करणे शक्य होते ते आम्ही प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न केला. असेल तेव्हढी आर्थिक ताकद पणाला लावून पैसे उभे केले. कर्ज काढले. २०१९ संपे पर्यंत गाडी कुठे रूळावर आली होती. सन २०२० पासून फक्त कर्ज फेडणेच एवढाच संकल्प हाती घेतला आणि कोरोनाने उचल खाल्ली. मागील वर्ष आम्ही मित्रांकडून उधार उसनवारी करून कर्जाचे हप्ते फेडले. पण २०२१ मधे फक्त वर्षाचे पान ओलांडले परिस्थिती तिच आहे. बाहेर पडावे तर कोराना गाठणार. म्हणून १ एप्रिलपासून घरीच आहोत. कारण उपचारासाठीच पैसे नाहीत तर फिरायचे कशाला? मागील वर्षी मदत केलेल्या मित्रांकडेच पुन्हा पैसे कसे मागायचे ? बॅंक नवीन कर्ज दयायला तयार नाही. कारण त्यांचेच परतफेड बाकी आहे.
आमच्याकडे आता एकच पर्याय उरलाय. गच्चीवरची बागेचा आर्थिक कणा असलेली आमचा छोटा हत्ती विकणे. पण गाडी विकली तर पुन्हा पर्यावरणाचे हे काम उभे राहणार नाही. रोजगार उभा करतांना पै पै गुंतवणूक केली. सुदैवाने व्यसनांवर व आजारपणावर खर्च नाही. उद्योगाला लागत असलेला पैसा कमीच पडत गेला. कारण या उद्योगाची सुरवात शुन्य संकल्पनेपासून झाली होती. इच्छा, तळमळ आणि अनुभव हेच काय ते भांडवल होते. सारे पै पै गोळा करून उभे केलेय. खरतर कोरानाची भिती आहेच. पण कोरोना चांगल्या पर्यावरणीय उपक्रमाचा पहिला घास घेणार आहे. हे नक्की झालयं. कारण ही संकल्पना रक्ताचे पाणी करून फुलवली आहे. ति आता डोळ्यासमोर विरून जाणार त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत.
कामे चालूच आहेत..
माहे एप्रिल २०२० पासून घरी आहोत. पण घरी बसून आमची कामे चालूच आहेत. संकेतस्थळ अपडेट करणे, भाजीपाल्यावर व्हिडीओ बनवणे, लेख लिहणे, मागील काही वर्षात लोकसत्ता, सकाळ वृत्तपत्रात प्रकाशीत झालेले लेखांचे पी.डी.एफ. स्वरूपात पुस्तक तयार करणे. ति इच्छुकांना कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. पण घेणाराच नाही तरी उत्पन्न कुठून येणार. डिजीटल स्वरूपातली अशी कामे घरी बसून चालूच आहोत. फक्त पैसा मिळवून देणारी कामे बंद आहेत. तसेच आम्ही घरी राहूनही इच्छुंकाचे प्रबोधन व्हावे म्हणून बागेविषयी अपडेट्स पाठवत आहोत. येणार्या कॉल्सला प्रतिसाद देत आहोत. थोडक्यात लाॉकडाऊनमधे भाज्या कशा पिकवाव्यात या बद्दल निशु्ल्क मार्गदर्शन आहोत.
आम्ही या लेखाव्दारे आपल्याला आवाहन करतो की आम्हाला ही कठीण वेळ काढण्यासाठी आर्थिक मदत करावी. ति आपणास आम्ही नक्की परत करू. मला माहीत आहे आपण प्रत्येकजण आर्थिक विवेचनेत आहोत. पण आम्ही आमच्या संकल्पनेला मरताना खरचं नाही पाहू शकतं. ही मदत तुम्हाला जेवढं थोडं देता येईल तेव्हढीच हवी आहे. मदत एकाकडूनच यावी अशीही अपेक्षा नाही ति सर्वाकडून थोडी थोडी यावी. असे वाटतेय. मी आपणास मदतीसाठी आग्रह नाही करू शकणार पण हा लेख इतरांपर्यत समाज माध्यमांव्दारे पाठवावी हि विनंती. कदाचित कुणीतरी आम्हाला मदत करतील. संकल्पना जगली वाचली तरच पुढे उभे राहता येईल एका पर्यावरण पुरक उद्योजकचेचा आर्थिक श्वास आता संपत आलाय. एवढेच आपल्याला सांगू इच्छितो.
धन्यवाद.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग. नाशिक.
9850569644 / 8087475242
http://www.gacchivarchibaug.in
Instamojo Store
https://www.instamojo.com/gacchivarchi_baug/
[…] […]
[…] […]
[…] करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात … […]