वाळलेल्या फुलांचे बियाणे पेरले तर पुन्ही रोपे तयार होतात का?
हा प्रश्न आपल्या सर्वांना कधीना ना कधी पडतोच. काही मंडळीना यातून रोपे तयार होण्याचा अनुभव येतो तर काहीना रोपे तयार होत नाही… असा अनुभव येतो… असे का होते. याचा विचार आपण या लेखात करणार आहोत.
फुलांपासून रोपे तयार होऊ शकतात.. अशी फुले म्हणजे झेंडू व त्याचे प्रकार, जरबेरा तसेच शेवंती होय.. पण काही वेळेस रोपे तयार होत नाहीत.. याची कारणे दोन आहेत.
बाजारात येणारी फुले ही बरेचदा छोटी व मोठी असतात. मोठी झालेली फुले ही मॅच्यूअर म्हणजे ती बियाणांपर्यंतचा त्यांचा प्रवास तयार झालेला असतो. थोडक्यात पुढील पिढीला जन्माला घालण्याचा त्यांचा डी.एन.ए. हा त्या फुलात आलेला असतो. म्हणजे त्यांची परिपक्वता ही आलेली असते. तर छोटी फुले ही अपरिपक्क असतात. त्यांच्यात वर नमुद केलेली कोणतेही गुण सामावलेले नसतात. या फरकामुळेच मोठी फुले वाळवून पेरली तर त्याची रोपे तयार होतात. व लहान फुले पेरली तर रोपे तयार होत नाही.
दुसरे कारण म्हणजे फुल मोठे असले तरी ते किती काळात तयार झाले आहे याचाही फरक पडत असतो. अर्थात ते कुणालाही सांगता येणार नाही. पण सांगावयाचा मुद्दा असा की त्याला रासायनिक खतं टाकून कमी कालावधीत वाढलेले असेल तर ते फुल मोठे असुनही त्यात रोपांसाठी बियाणे तयार होत नाही.
वरील दोनही फुलं ही व्यापारी पिक आहेत. पूर्वी सारखी सेंद्रीय अथवा नैसर्गिक पध्दतीने वाढवली जात नाही. पण यालाही बांधावरची फुले अपवाद असतात. म्हणून अशा फुलांच्या बिया या रूजवून येतात. तसेच घरी फुलवलेल्या फुलांच्या बियाणांची रोपे तयार होतात. जर ती रसायनमुक्त पध्दतीने फुलवलेली असतील तरच.. असो…
तर अशी ही दोन कारणे वरील फुलांची बियाणे रूजवून येण्याची वा न येण्याची आहेत.
अशा वेळेस नर्सरीतील तयार फुलांची रोपे आणून लावावीत. बरेचदा झेंडू व झेडूंचे प्रकारातील रोपे तयार होतात. पण शेवंतीचे रोपे हे शेवंतीच्या फुलापासून होण्यापेक्षा त्याच्या फांदीपासून होण्यास जास्त संभावना असते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग,नाशिक. 9850569644
You must be logged in to post a comment.