वेल छान आहे. पण बोटाएवढे फळ लागली की ते पिवळे पडून गळून जातात किंवा सडून पडून जातात. ही नेहमीची समस्या आपल्या घरी लावलेल्या वेलीबाबत होत असते. यावर उपाय काय करावा याची नेहमी चिंता असते.
याची कारणे काय आहेत. याचा आपण पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे. व त्यानुसार त्यावर उपाय योजना करणे गरजेचे असते.
- योग्य पोषणखतांचा अभावामुळे सुध्दा चांगली तब्बेत असलेल्या वेलाला आलेली फळे ही पिवळी पडतात. गळून पडतात. आपण जर वेल डब, बादली, ड्रम मधे असेल तर पोषण हे कमी पडणारच. तेव्हा अशा वेलांना द्रव खत देणे फार गरजेचे असते. यात जिवामृत, ह्यूमिक जल, हे पाच लिटर पाण्यास एक लिटर या प्रमात मिसळून वेल परिसरात टाकावे. तसेच विद्राव्य खतांमधे गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खताचे आळीपाळीने डोस द्यावा.
योग्य रितीने खतांचे नियोजन केल्यास वरील साधनांमधेही फळे कमी येतात पण उत्तम प्रकारे वाढतात. मुळांजवळ हवा खेळती ठेवा. पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या.
- वेलावरील फळे पिवळी किंवा सडून जाण्याचे कारण म्हणजे फळांना होणारा फळमाशीचा प्रार्दुभाव होय. ही माशी रंगीत पखांची. डाससदृष्य असते. ति प्रोढावस्थेत असेल तेव्हांच ति आपल्य डोळ्यांना दिसते. अन्यथा तिचे गती व सुक्ष्म आकारामुळे ति नजरेस पडणे अशक्य आहे. पण तिच अस्तित्व हे फळांना होणार्या डंखातून जाणवते.
आपण घाईगडबडीत पिवळी झालेली फळे काढून टाकतो. पण ते फळ चिरून, तोडून त्याचे भिंगाखाली निरीक्षण करावे. अभ्यास होतो.
तर या फळमाशीचे अस्तित्व हे बाराही महिने असते. खास करून जेथे नैसर्गिक शेती अथवा भाजीपाल्याची बाग फुलवली जाते. यावर उपाय म्हणजे वेळोवेळी गोमुत्र पाणी, दशपर्णी यांची फवारणी करावी. तसेच यावर रामबाण उपाय म्हणजे ह्यूमिक जल या द्रावणाची वस्त्रगाळ करून फवारणी करावी. याचे प्रमाण साधारण एक लिटर पाण्यात १०० एम.एल. द्रावण घ्यावे.
यातील सुक्ष्म अशा आंबट गंधामुळे ही कीड दुर पळते. फवारणी ही सायंकाळच्या वेळेत करावी. तसेच योग्य पोषणामुळे वेलाची प्रतिकार शक्ती वाढते. कीडीनां ते बळी पडत नाही. ह्यमिक जल आमच्याकडे उपलब्ध होईल.
फळमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी पिवळे चिकट सापळेचाही वापर करता येतो. तसेच प्रकाश सापळे आपण लावू शकता.
यासाठी बागेत पिवळ्या रंगाचा बल्ब हा जमीनीपासून २-३ फूटांवर टांगावा. त्याखाली खराब झालेले गाडीचे ऑईल ताटामधे ठेवावे. सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हा बल्ब पेटवावा. त्यात तुम्हाला सारी शत्रु किटक जमा झालेले दिसतील. रात्री १० नतंर या बल्ब बंद करावा. कारण रात्री १० नंतर मित्र किटकांचा वावर सुरू होतो.
हे उपाय खात्रीशिर आहेत. ते करून बघा. आपल्याला त्याचे नक्कीच परिणाम दिसून येते.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
http://www.gacchivarchibaug.in
You must be logged in to post a comment.