तुमच्या आमच्या आवडीची, बाग गच्चीवरची,
नमस्कार मी संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक येथून.
आज तुम्हाला वेलवर्गीय भाज्या वाढवण्याचे सिक्रेट सांगणार आहे.
एरो ब्रिक्स बेड व जमिनीवर वेलवर्गीय लावतांना सगुणा बॅगेत वेल वाढवण्याच्या पध्दतीचा वापर करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. कितीही पाऊस आला, कितीही पाणी साचलं तरी वेलाची मुळ खराब होणार नाही. अधिक पाण्यामुळे वेलाचे खोड व मुळ सडण्याची दाट शक्यता असते. कारण ते फार नाजूक असतात. त्यामुळे वेलवर्गीय बिया लावतांना सगुणा बॅगेचा वापर करा. याचे शास्त्रीय कारण म्हणजे अधिकच्या पाण्यात मुळं सडली तरी पाण्याच्या संपर्कापासून खोड वर रहाते. त्यामुळे खोड तग धरते. व त्यामुळे वेल दगावत नाही.
अधिक पावसामुळे बॅगेतील मुळं व वर पर्यंत खोड सडून जाते. पण खोडाने अशा प्रतिकूल परिस्थतीत मुळांचा फुटवा तयार करून वेल जिवंत ठेवतात. आणि याला खात्रीने भरपूर फळे लागणार यात शंकाच नाही. या पध्दतीने वेलवर्गीयाची लागवड करून आम्ही जमिनीवर दूधी भोपळ्याचे अनपेक्षीत असे उत्पादन घेतले आहे. याचा फायदा भाजीपाला उत्पादन करणारी शेतकरी सुध्दा करू शकता. लाईक करा, शेअर करा. कॉमेंट करा. कारण शेअरींग ईज केअरिंग. आम्हाला गुगलवर शोधा. धन्यवाद.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644