सर /  मॅडम मला ओळखलतं….

मी गच्चीवरची बाग ( संदीप चव्हाण)

गच्चीवरची (रसायनमुक्त भाजीपाल्याची) बाग आता मोठी झालीय. जेव्हा या कामाची सुरूवात होती तेव्हा आपण आपल्या वर्तमानपत्रातून बातमी प्रकाशीत करून, लेखमाला लिहण्याची संधी देवून, कार्यशाळा आयोजीत करून या संकस्पनेला मोठं केले.

संकल्पनेचा व्याप व व्याप्ती वाढतच आहे. आम्ही गोगलगायीच्या गतीने चालत चालत मागील आठ वर्षाचा काळ मागे टाकत भविष्याचा पल्ला गाठण्याची उमेद मिळालीय. हे निसर्गाचं देणं हे निसर्गाच्याच गतीने वाढत आहे. पानात लपटलेली ही कोषातील संकल्पना  जणू अळीचंच स्वरूप होतं. ते आता फुलपाखरात रूपांतर झालय. खरं तर या शिकाराचा मी एक जबाबदार असा म्होरक्या आहे. खर तर हा शिकारा पाण्यातून पुढे चालण्यासाठी आपण सार्यांनीच आपल्या कौशल्याची, अधिकार रूपी वल्हवांना ताकद दिली.  आपली ताकद पणाला लावली. त्यामुळे गच्चीवरची बाग शिकारा येथपर्यंत पोहचलाय. आज मला माझ्यानावापेक्षा गच्चीवरची बाग या नावाने अधिक ओळखतात. ही ओळख तयार करण्यात तुमचा फार मोठा सहभाग आहे. हे मान्य केलेच पाहिजे. कारण हे काम माझ्या एकट्या दुकट्याचे नव्हते.

या पत्राव्दारे आपणास विनंती आहे की या ५ जून पर्यावरण दिनी आमची एकादी बातमी करावी. जेणे करून लोकांपर्यंत हा पर्यावरणपूरक कार्यक्रम पोहचवता येईल. त्यांचा सहभाग घेता येईल.

आपण जाणताच गच्चीवरची बाग हा पर्यावरणपुरक कार्यक्रम मागील आठ वर्षापासून पूर्णवेळ करत आहोत.

पर्यावरण संवर्धनात केवळ सरकार, प्रशासन पातळीवर प्रयत्न करून चालणार नाही तर त्यासाठी ठोस असा लोकसहभाग फार महत्वाचा आहे.

पर्यावरणाबद्दल संवेदनशील असणार्या मंडळीना अथवा नव्याने काही करू ईच्छीणार्या मंडळीसाठी आम्ही होम कंपोस्टींग व गारबेज टू गार्डेन अशा दोन संकल्पनावर निशुल्क मार्गदर्शन आजही करत आहोत. ते समाजाचे देणं आहे ते परत केलेच पाहिजे.

त्यासाठी विविध सोशल मीडियाव्दारे उदाः व्हाट्स अप व यूट्यूब व्दारे कमी खर्चात बाग कशी फुलवावी याचेही मार्गदर्शन करत आहोत. विविध वर्तमानपत्रातून लेखाव्दारे मार्गदर्शन करत आहोत.  कोव्हीड १९ मुळे गच्चीवरची बाग आर्थिक संकटात सापडली आहेच. त्यासाठी दानशुरांची मदत हवीच आहे ति किती प्रमाणात मिळेल न मिळेल पण किमान आपण तयार केलेल्या  बातमीव्दारे पर्यावरण काम लोकांपर्यंत पोहचले तरी आम्हाला येत्या काळात काम मिळतील व त्यातून आर्थिक हातभार लागू शकेल. .

खाली दिलेल्या दुव्याचा आपल्या परीने अभ्यास करून बातमी तयार करावी. त्यात आत्ताची स्थिती, आम्ही करत असलेले प्रयत्न दिले आहेतच.

Lockdown Impact

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग नाशिक

9850569644 / 8087475242