माझं नाशिक स्वच्छ सर्व्हेक्षणात पहिल्या पाच मधेही येत नाही. मागील अनेक वर्षापासून आपण सारेच या एकाच वर्गात आहोत. पुढे जाणे सोडाच एका जागेवर स्थिरपण नाहीत. अर्थात यात फक्त स्थानिक प्रशासनच नाहीत तर नागरिकही जबाबदार आहेत. आणि हे संघटीत नाशिककर, कुटुंब म्हणून अपमानजनक आहेत. अर्थात हा अपमान किती मनावर घ्यायचा. घ्यायचा की नाही मुळातच हा नाशिककरांचा अपमान होण्यासारखा हा मुद्दा आहे का हा खरा प्रश्न आहे. असो. ज्याची त्याची दृष्टी वेगळी.
पण पहिल्या पाच मधेही अजूनही आपण येत नाही याचा खेद वाटतोय. याची कारण काय काय असावीत या विषयी गेल्या पाच वर्षापासून यावर चिंतन करण्याची संधी मिळत गेली ति या लेखातून मांडत आहे.
कोरोना पूर्व व कोरोना नंतर असे या दोन प्रकारात आपल्या प्रत्येकाच्या जगाची विभागणी झाली. कोरोनानंतर सामान्य माणसे पोटासाठी धावत आहेत. मध्यमवर्गीय आपआपल्या काम धंद्यात बुडाले आहेत. सारे काही स्थिर स्थावर होत नाही तो पर्यंत तरी या अपमान मनाला लावून घेता येणार नाही. कारण सर सलामत तर पगडी पचास. पण प्रशासनाचे काय? ( ते पण कोरोना महामारी मधे व्यस्त होती खरी) या दोन वर्षात बराच वेळ हाताशी होता. म्हणतात की कागदावरचं नियोजन केले की ते प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याआधीच पन्नास टक्के यशस्वी झालेले असते. अर्थात हे नियोजन म्हणजे फक्त टास्क झाली की टिकमार्क केल्यासारखे नसते. त्यातील प्रत्येक टास्क मधे एक समन्वय, त्याचा एकमेंकाशी असलेला संबध, त्याचे परस्परांवलंबन लक्षात येते व डोक्यात असलेली ढिगभर कामे छोटी व साध्य करता येण्यासारखी वाटू लागतात. ति त्या त्या वेळेत पूर्ण होतील याचा आत्मविश्वास तयार होतो नि दिवसाखेर ति पूर्ण झाल्याचा आनंद व समाधान मिळते.
या आनंद व समाधानात आजचे प्रशासन कमी पडतेय. ते भरपूर करताहेत पण दिवसाखेर आनंद व समाधानाचा अभाव आहे. एन्ड रिझल्ट दिसत नाही. त्यामुळे उत्साह वाटत नाही. ढिगभर कामे साचतात. नियोजनाचा अभाव असल्यास त्याचा पसारा जाणवतो. व ते कधी कधी एकएकटे पूर्ण करावे लागते. व त्यात वर्षभर अभ्यास करूनही निकालाच्या नंतर कळते की आपण नापास आहोत. हीच गंमत स्वच्छ सर्व्हेक्षणात दरवर्षी होतोय. आपण जो पर्यंत प्रश्नांचा आऊट ऑफ बॉक्स विचार करत नाही तो पर्यंत यश हातात येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष.
तर आपल्याला काय करावे लागेल. दोन पातळीवर, आघाडीवर हे काम करता येईल.
स्वच्छ सर्व्हेक्षात प्रशासनाचा पुढाकार व नागरिकांचा सहभाग घेणे गरजेचे आहे. केद्राने मुद्दे दिलेत तेवेढेच साध्य करून चालणार नाहीत किंवा ते तेवढ्यापुरतेच साध्य करूनही चालणार नाही . त्यात सातत्यता, निरतंरता कशी राहिल याचा विचार स्थानिक प्रशासनाने व पदाधिकार्यंनी केला पाहिजे.
विचार उत्तम होता. पण हाच विचार आपण इतर ठिकाणीही किंवा इतर बाबतीतही का करत नाही हा मुद्दा आहे. उदाः मनपाचे स्वच्छता कर्मचारी जोगोजागी कचरा गोळा करतात व पेटवून देतात. रोजचीच दिवाळी. दिवाळीतील प्रदुर्षणापेक्षा रोज जळणारा कचरा अधिक वातावरण दुषित करतो पण हे कोणी कुणाला सांगयाचं?. हे आरोग्य अधिकार्यांना दिसत नाही का.. दिसते ना.. पण कचरा उचलायलाच परवडत नाही. मुद्दा बरोबर आहे.. पण त्याला पर्याय नाही का…
स्वच्छता व पर्यावरण ही हातात हात घालून फिरणारं प्रेमी युगल आहे. स्वच्छ स्रर्व्हेक्षणात आपल्याला स्थान मिळावे म्हणून दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी करण्यात येणार होती. पण नाही करता आली. करताही येणार नाही. ते सामान्यांच्या आंनदा सोबत आर्थिक चक्राशी जोडलेले गणित आहे. विचार उत्तम होता. पण हाच विचार आपण इतर ठिकाणीही किंवा इतर बाबतीतही का करत नाही हा मुद्दा आहे. उदाः मनपाचे स्वच्छता कर्मचारी जोगोजागी कचरा गोळा करतात व पेटवून देतात. रोजचीच दिवाळी. दिवाळीतील प्रदुर्षणापेक्षा रोज जळणारा कचरा अधिक वातावरण दुषित करतो पण हे कोण सांगणार. हे आरोग्य अधिकार्यांना दिसत नाही का.. दिसते ना.. पण कचरा उचलायला परवडत नाही. मुद्दा बरोबर आहे.. पण त्याला पर्याय नाही का… हे म्हणजे भूक लागली म्हणून दरोडा टाकण्यासारखे आहे. असो..
स्थानिक आरोग्य अधिकार्यांना मी गेल्या काही वर्षापासून पहातोय. ते फार व्यस्त असतात. कुठेही कचरा नको याची ते जिवापाड दक्षता घेतात. पण नागंरिकांनी कचरा करायचा व तो आवरला की नाही ते या अधिकार्यांनी कटाक्षाने पहावे. प्रश्न जैसा आहे तसाच आहेत. तिळमात्र फऱक पडललेला नाही. नागरिकांना जबाबदेही बनवले पाहिजे. नागरिकांनी घरातला, परिसरातला कचरा स्थानिक पातळवरचा कचरा अॅट सोर्स तो व्यवस्थापन झाला पाहिजे यासाठी प्रयत्नांची वारंवारिता वाढवली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. उत्पानाचे मार्ग अनेक शोधले ते कार्यरत राहून चालत नाही. त्याचे मल्टीफिकेशन जसे गरजेचे आहे. तसेच स्व्छता ही मल्टीफिकेशन तंत्राने कशी दृतगतीने वाढत जाईल याचाही विचार करा.
नाशिकमधेच होम कंपोस्टींग वर काम करणार्या अनेक सामाजिक संस्था व व्यक्ति सोशली व प्रोफेशनली काम करत आहेत. त्यातील नफा तोटा, कमाई, मलई याचा विचार न करता त्यांची मोट बांधावी. या मंडळीना लोकांसमोर आणा. नागरिक कंपोस्टींग करण्यासाठी तयार आहेत. पण त्यांना येणार्या अडचणी, पडलेले प्रश्न याची उत्तरे देण्यासाठी प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून कुणी आहे का..सध्यातरी कुणीच नाही. तर अशा क्षेत्रात काम करणार्या मंडळीना स्वच्छतेचे दूत, संवादक, मदतनीस म्हणून त्यांच्या त्यांच्या परवानगीने त्याची नावे प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाहिर करावेत. म्हणजे लोक त्यांची मदत सहजतेने घेवू शकतील. आता तर कुजणार्या कचर्याचे कंपोस्टींग करण्याची गरज नाही. तो वाळवून घेतला तर त्यात बागाही फुलवता येतात. यात पुणेकर पुढे आहेत. पुणे करांचे खरचं या बाबतीत पाय धूवून पिले पाहिजे. एवढे ते दक्ष व जागृत आहे. त्यात नागरिक व प्रशासन सुध्दा पण आपण नाशिकरमात्र कमी पडतोय. पण हे असे घरोघरी झाले तर घंटागाड्याच्या फेर्या कमी होतील. वजनाला कमी कचरा भरला तर कमाई व पर्यायाने मलई कमी होईल. खाते मंडळीचा मेवा कमी होईल निवडणूकीचा फंड कसा गोळा करायचा याची बिच्च्यारांना चिंता सतावत असते. त्यात हे असे झाले तर आणखीनच पंचाईत. शिवाय कोरोना काळात ही खाते मंडळी जास्त भरडली गेली. देव त्यांच लवकर भले करो. प्रशासनातील अधिकारी हे प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण ही खाते मंडळी त्यांनी जमू देतील तर शप्पथ. या दबावातून स्थानिक अधिकार्यांनी बाहेर पडले पाहिजे. त्याना जे वाटतं. तेच करायची एक वर्ष संधी द्या. नाशिक खरचं स्व्च्छ व सुंदर होईल. पहिल्या पाच काय देशात एक नंबर होईल.
तर स्व्छतेत व पर्यावरणात काम करणार्यांना मंडळीची एक मोट बांधा, ऑनलाईलस ऑफलाईन चर्चा सत्र घडवून आणा. अनेक माध्यमं आहेत. लोक फोन धरून स्क्रीन समोर बसलेलीच असतात. तेथे का नाही प्रशासन पोहचत. मल्टी टास्ककिंग संवेदनशिल महिला अधिकारी निवडा. आपण स्व्च्छतेत काय करू शकतो. याची माहिती विविध समाज माध्यमांवर देत रहावी. फक्त एकाच पर्यायावर थांबून चालणार नाही. अनेक आघाडीवर एकाच वेळेस अनेक हातांनी भिडावे लागेल.
त्यासाठी स्व्छता फेस्टीव्हल घडवून आणा. केवळ फ्लाॅवर फेस्टीव्हल घेवून स्व्छता होणार नाही त्यात स्व्छतेत काम करणार्या मंडळीना व्यासपिठ द्या, त्यांचा सत्कार करून आणा.. जेथे कुत्र चावतयं तेथेच उपचार करा आणि कुत्र्याचा बंदोबस्त करा. स्थानिक वॉर्ड, प्रभाग पातळीवर जागृती घडवून आणली पाहिजे. उदयोन्मुख, नवोउत्सुक नगसेवकांना हाती घेवून प्रचार प्रसार घडवून आणला पाहिजे. स्वच्छतेचा बार उडाल्या शिवाय स्व्छ सर्व्हेक्षणाचा रस्ता लख्ख दिसणार नाही.
कचर्याचे खत तयार करा असे सांगण्याचेही दिवस गेलेत. ते खंडीने कवडी मोलाच्या भावाने मिळतेय पण कचरा व्यवस्थापनेतून ऑरगॅनिक भाज्या उगवता येतात हे सिध्द केलेय. व त्यासाठी लोकसहभाग वाढवता येईल. तसेच अशा घरोघरी फुललेल्या बागा ऑक्सीजन तयार करतील. अशा बागा फुलवणार्यांना, होम कंपोस्टींग करणार्या व्यक्ती, संस्था, आस्थापनांना घरपट्टीत सवलत द्या. सरकारी इमारती, शाळा, कॉलेजेस यांच्या छत, जमीनीवरील जागा रिकाम्या आहेत. मनुष्यबळीही उपलब्ध आहे. त्यांना थोडी जबाबदारी दिली तर नाशिक हातोहाती स्वच्छ व सुंदर होईल. स्वच्छ सर्व्हेक्षणात काय काय मुदे परिक्षेचे वा परिक्षणाचे असतात यास जाहीर करा. ते लोकांपर्यंत पोहचवा.
औद्योगिक क्षेत्रातील रिकाम्या जागा, सरकारी जमिनी गार्डेनिंगसाठी, वृक्षारोपनासाठी खुल्या करा. रिकाम्या प्लॉटवर स्वच्छता नसेल तर जबरा कर बसवा. जेणे करून काही बेरोजगारांना काम मिळेल. वरील सारे मुद्देची माहिती गोळा करता येईल असे लोकसंवादाचे एॅप तयार करा. त्यावर रिवाॅर्डस द्या. या रिवर्र्ड्स मधून घरपट्टीत, पाणी पट्टीत सवलत द्या. विषयात काम करणार्या मंडळीनाच स्वच्छता दूत- एबेंसेडर निवडा. त्या त्या क्षेत्रातीलच लोक त्या त्या क्षेत्रासाठी योग्य वाटतात व नेमका संदेश लोकांपर्यत पोहचतो. याची काळजी घ्या.
सध्या टॉप टू बॉटम विचारांचे कृतीचे अभिसरण होतेय. ते बॉटम टू टॉप झाले पाहिजे म्हणजे खर्या अर्थाने लोकसहभाग वाढेल. नाहीतर ये रे माझ्या मागल्या, शिळ्या भाकरी चांगल्या यावरच समाधान मानावे लागेल. स्वच्छ सर्व्हेक्षणात आपण कुणाच्याच खिजगणीत नाही आहोत हे लक्षात घ्या. अधिकार्यांनी प्रयत्न करूनही यश मिळेत नसेल तर ते त्यांच्यासाठी अपमानजनक ठरते. त्यांच्या कारकिर्दिला उजाळा मिळत नाही. अर्थात हे काम एकट्या दुकट्याचे वा एकाच मार्गाने करता येणारे नाही. ते संघटीत व एकीचे काम आहे. चला तर हातात हात घेवू.. काय करता येईल याचा कृती आराखडा तयार करू. तो पर्यंत पुढील स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी सदिच्छा..
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.
You must be logged in to post a comment.