यूटयूबवर लाईव्ह सेशन With गच्चीवरची बाग, नाशिक.
लाईव्ह सेशन भाग २
विषयः होम कंपोस्टींग गतीने कसे करावे.
येत्या रविवारी १९ संप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान होम कंपोस्टींग या विषयावर लाईव्ह सेशन होणार आहे. यात आपण खालील प्रमाणे विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कचरा व्यवस्थापन की विल्हेवाट यातील फरक, सोपे काय आहे?
नैसर्गिक कचरा (किचन वेस्ट, गार्डेन वेस्ट, खरकटे अन्न असे प्रकार
कचर्याचा स्वभाव, नेचर, वैशिष्टय, प्रक्रिया..
चुकीच्या पध्दती, समजूती व प्रॅक्टीसेस..(माती, पालापाचोळा, सर्वच एकत्र करणे)
अभ्यासाचा अभाव…
होम कंपोस्टींगचे साधने, गतीने कंपोस्टीग करण्यासाठी त्याची काळजी, गोमय कल्चरचा वापर कसा करावा.
अशा मुद्यावर चर्चा करण्यात येणार आहे.
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.