हो गया यार… अब क्या करे…
गच्चीवरची बागेचे (गारबेज टू गार्डन) हे व्रत नाशिककरांपर्यंत पोहचावे म्हणून सुरवातीच्या काळात धडपडत होतो. नाशिककरांसाठी रसायनमुक्त व गारबेज टू गार्डन भाजीपाला उगवण्या संदर्भात स्पर्धा आयोजनाचे प्रपोजल तयार केले. ते घेवून मी प्रत्येक वर्तमान पत्राच्या दारोदारी फिरलो. कल्पना तशी सोपी होती. मी नाशिककरांसाठी निशुल्क (पदरचे पैसे खर्च करून, मानधन, शुल्क न घेता) कार्यशाळा घेईन. त्या बदल्यात इच्छुक वर्तमानपत्राने कार्यशाळा पूर्वीचे व नंतरची बातमी करावी व सदर कार्यक्रम संयुक्त उपक्रम असेल. पण कुणीच दाद दिली. कोण्या एका जेष्ठ पत्रकाराने म्हटलेच आहे की केवळ काम चांगल असून उपयोग नसतो. त्याच्या बातम्या करणारी मित्र त्या त्या वर्तमान पत्रात असावी लागतात. त्याचा प्रत्यय दिव्य मराठी या वर्तमानपत्रासोबत आला.
दिव्यमराठी या नव्याने नाशिकमधे प्रकाशीत होणार्या वर्तमानपत्रातील पत्रकार हेंमत भोसले यांना ही कल्पना खूप भावली. त्यांनी निवासी संपादकाशी बोलणी घडवून आणली नि त्या वर्षभरात सात आठ निशुल्क कार्यशाळा झाल्या. नाशिकरांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. बातम्या यायला लागल्या तशा लोकांचे प्रश्न, विचारणा वाढू लागली. घरच्या बागेला लोक भेटी देवू लागले.
पत्रकार मित्र हेमंतने गच्चीवरची बाग विषयी कार्यपरिचय देणारी बातमी तयार केली. तो वार रविवार होता. हेमंतने दिव्य मराठी मधे प्रकाशीत केलेल्या माझ्या कामाच्या बातमीचे नाव होते. – प्रेम केले ते भाज्यांवर, पेपर दारात होता खरा.. पण मी सकाळी गच्चीवरच्या बागेतच, टेरेसवर रमलो होतो. फोन वाजला. संदीप सर आपली बातमी छापून आली आहे. बातमी खरचं छान झाली आहे. गच्चीवरून धावत येवून बातमी वाचली. मित्र हेंमत भोसले यांनी बातमी खरंच सुंदर लिहली होती. बातमी लोकांपर्यंत पोहचली खरी.. मी बायकोला नाचतच बातमी दाखवली. तिने बातमी वाचली. तिने बातमीचे शिर्षक वाचले प्रेम केले ते भाज्यावरं —पुढे काही वाचलेच नाही. कारण तिला बातमीचे शिर्षक आवडले नव्हते. तर बातमी कशी आवडेल. बातमीच्या शिर्षकानुसार संदीप माझ्या शिवाय आणखी कोणावर प्रेम करू शकतो म्हणजे गच्चीवरच्या बागेवर हे तिला पटलेच नव्हते. ती रागावून बसली. असा कसा तुमचा मित्र, अशी काय बातमीचे टायटल देतात. पण माझे गच्चीवरची बागेवर किती प्रेम आहे. हे मित्र हेंमतला जास्त कळालं होतं. (मला हे जास्त भावलं होतं कारण त्याला माझी पॅशन कळाली होती.) बायकोसाठी हा मोठा धक्का होता. (खरं तर पुढे जावून बरंच काही अर्पण होणार आहे याची तिला कल्पना नसावी) बायकोला कळून चुकलं (नि सारं जगजाहिर झालं याच तिला जास्त त्रास होत होता) की संदीपच्या आयुष्यात आपण एकटेच नाही आहोत. संदीपला गच्चीवरची बाग नावाची दुसरीच जिवा भावाची, जवळची मैत्रीण आहे. घरात एकतर्फी वाद झाला… पाय, भांडे आपटून झाली. खरं चूक माझीच होती. एवढ्या आनंदाने तिला बातमी दाखवयलाच नव्हती. तशी ती माझ्या कोणत्याच निर्णयात, कार्यपध्दतीत खोलवर लक्ष घालत नव्हती. पण तिचा पूर्ण पांठिबा असतो. तरी पण बातमीच्या शिर्षकाने घरात अबोला सुरू झाला होता. आपलचं चुकल म्हणून मी माफी मागू लागलो. (संसारात काहीही झालं तरी नवर्याचच चुकत व त्याने लगेच माफी मागीतली पाहिजे हे विवाहित पुरुषांनी दिलेल्या सल्ला वाचल्याची आठवण झाली) मी तिची मनधरणी करत होतो. पण तिचा ठाम विश्वास होता की या बातमीचे टायटल संदीपनेच हेंमतला पुरवले असावे. कारण गच्चीवरची बाग हे नाव उपक्रमाला ठेवण्यामागे, एकाद्याचे मुल्यांकन करण्यासाठी योग्य शब्द वापरण्यामागे संदीपचा हातखंडा आहे हे ती जाणून होती.) मी लाख समजावून सांगीतल की बातमीचं टायटल काय, यातील कोणतच वाक्य माझं नाही आहे. बातमीतील शब्द न शब्द १०० टक्के सत्य असली तरी मित्र हेमंतने बरोबर हेरली होती. पण काय करणार. तिने अबोला धरला. सात दिवस तो काही जाईना. त्यात आमचं लव्हमॅरेज… तिच्या पेक्षा मी कुणावर जास्त प्रेम करू शकेन हे गच्चीवरची बाग संकल्पना माझ्या डोक्यात येईपर्यत मलाही कल्पना नव्हती… पण म्हणतात ना. हो गया यार… अब क्या करे…त्याला काही पर्याय नाही. अशी माझ्या दुसर्या प्रेमाची गोष्ट. दिवसाचे चोविस तास त्यातच असतो. मी कुटुंबाला वेळ देवू शकतं नाही हे तिच म्हणंण बरोबर आहे. पण हा फर्स्ट जनेरेशन उदयोग आहे. तो उभा केलाच पाहिजे. सारंच काही एकट्याला बघावं लागतं. रेशमाच्या बारिक वस्त्रासारखी विण असलेले गच्चीवरच्या बागेचे काम मलाही भितीदायक वाटतं. पण आपल्या पॅशनच प्रोफेशन झालं (पुर्ण वेळ काम करून सहा वर्ष झाली, लढाईच्या मैदानावर अजूनही उभा आहे) यातच मोठं समाधान आहे. कर्ज असलं तरी ते फेडण्याची धमक नाशिककरांनी मला मिळवून दिली आहे.
हेच काम झिब्मांब्वे देशातील हरारे देशात करण्याची संधी होती. जमीन द्यायला तयार होते. पण माझं प्रेम कुटुंबावर व नाशिककरांवर होतं. म्हणूनच तर नाशिकला परतलो होतो. व गच्चीवरची बाग नाशिक मधे जोमानं फुलतय याचा हेवा नाशिकपेक्षा बाहेरच्या शहरातील मित्रांना, बाग फुलवू इच्छिणार्या खूप वाटतोय. ते व्यक्तही होतात. यातच मला प्रेरणा मिळतेय.
लेख आवडला तर नक्कीच लाईक व शेअर करा…
संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, 9850569644
Email: mindblowingsandip@yahoo.co.in
http://www.gacchivarchibaug.in
वाचकांची प्रतिक्रिया
खूप छान काम करत आहात. अगदी मनापासून शुभेच्छा!☺️