Social engineering


गच्चीवरची बागः एक सामाजिक आयाम…

0 (88).jpg

संदीप चव्हाण, नाशिक.

मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे. तसेच तो समुह प्रिय आहे. समाज म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजन होय. एकटा मनुष्य स्वतःच्या गरजा स्वतःच पूर्ण करू शकत नाही. त्याला नात्यांची, कुटुंबाची, घराची, परिसराची, समुहाची गरज लागते. व्यक्तिच्या जशा मूलभूत गरजा असतात. त्याच प्रमाणे त्याच्या सामाजिक गरजापण असतात.  या गरजा काय काय असतात. याचा विचार केला तर त्याला सुख दुखः, राग लोभ,माया, भूतदया, ज्ञान या सर्वांची देवाण घेवाण करणे गरजेचे असते. अर्थात आपल्या समाजात काही जाती पाती, धर्म या नुसार गटवारी ठरलेली आहे. माणसं ही वेगवेगळी असली, त्यांच्या राहण साहण, व्यवहरांच्याच्या पध्दती वेगवेगळ्या असल्या तरी दोन गोष्टी समान आहेत. ते म्हणजे प्रत्येकाला जगायला अन्नाची गरज असते. व दुसरी म्हणजे ज्ञानार्जनाची गरज होय. या दोन गोष्टी साठी तो वरील सारी वर्गवारी विसरतो. व सामाजिक भेदभावाची क्षितीज ओलांडून तो रोजचे व्यवहार करू लागतो.

या व्यवहारात शहरी परसबाग हा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. शहरी परसबाग बहुतांशी सामाजिक मतभेद विसरायला, ते कमी करण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदतगार ठरू शकते असा विश्वास वाटतो. कारण यात निसर्ग हा धागा सर्वांना समानतेने एकापातळीवर आणतो. सामजिकता ही आर्थिक, मानसिक, भावनिक, धार्मिक आहे. शहरी परसबागेमुळे लोक एकत्र येतात. त्यातील ज्ञानाचे आदान प्रदान करतात. तसेच सामूहिक शेती, गट शेती ही जसी करतात त्याप्रमाणे सामूहिक शहरी शेतीचे प्रयोग होवू लागले आहे. आठवड्यातून एकत्र यावयाचे. एकत्रित श्रम करायचे जे पिकेल ते एकत्रित रित्या वाटून घ्यायचे. हे फक्त एकत्र येण्याचे निमित्त आहे. त्या एकत्रिकरणातून एकमेंकाचे सुख, दुख वाटले जातात. ओळखी होतात. एकमेंकाना मदत करू लागतात. अशा बागा या जागोजागी उभ्या राहिलात तर नक्कीच सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ही जलदरित्या होते. त्या निमित्ताने पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, निसर्ग संवर्धन अशी मुद्दे केवळ चर्चिलेच जात नाहीत तर त्यावर प्रत्यक्ष कृतीपण करतात.

सामाजिक अभिसरणाची अनेक ठिकाणे आहेत. जसे शाळा, महाविद्यालये, सार्वजिनक उत्सव, स्पर्धा पण यात बरेचदा व्यवस्था सहभागी असते. सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया ही तशी खूप गुतांगुतीची आहे. त्यातील एक पदर उलगडवण्याचे काम शहरी परसबाग नक्कीच करू शकते.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.  व्हाट्सअपः 9850569644 www.gacchivarchibaug.in

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.