बहुपीक पद्धतीने करा गार्डनिंग


Maharashtra Times | Updated: 02 Jul 2018, 04:00 AM

पंकज चांडोले, ‘मटा’च्या वाचकांना मिळाल्या टिप्स ….घरच्या घरी भाजीपाला, फळे, तसेच फुलांची बाग विकसित करावयाची असेल तर बहुपीक पद्धतीचा अवलंब करा. बागेत एकच पीक लावले आणि त्यास कीड लागली तर ती कीड पूर्ण बाग उद्ध्वस्त करते. मात्र, बहुपीक असेल तर किडीचा प्रादुर्भाव थांबण्यासही मदत होते, यांसारख्या टिप्स ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांना रविवारी मिळाल्या. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने आयोजित गार्डनिंग कार्यशाळेचे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस कॉलेजमध्ये ही कार्यशाळा झाली. बागकामाची आवड असलेल्या आणि विशेषत: घरच्या घरी भाजीपाला पिकवू इच्छिणाऱ्या अनेकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘गच्चीवरची बाग’चे संदीप चव्हाण यांनी बाग फुलविण्यासाठीच्या टिप्स दिल्या. आपल्याकडे बंगल्याच्या आवारात, अवतीभवती, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा मोठा स्रोत आहे. वर्षातून दोनदा होणारी पानगळ बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरते. पालापाचोळा कुंड्य़ा, वाफे यांमध्ये भरणपोषण म्हणून आहे तसा वापरता येतो. तो गोणीत, लोखंडाच्या जाळीत भरून ठेवला तर त्याचे कंपोस्टिंग खतही तयार करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाग फुलविण्यासाठी फार खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी महिला वर्गाला दिलासा दिला. माठ, बेसिन, विटांचे वाफे, गोणी, करवंटी, बॉटल्स, गडू, रंगाचे डबे अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू उपयोगात आणून त्यामध्ये रोपे वाढविता येतात, असे त्यांनी या वेळी सांगितले. शत्रूकीड आणि मित्रकीड अशी दोन प्रकारची कीड असते. ती मारून टाकण्यापेक्षा नियंत्रित करणे आवश्यक आहे. मित्रकीडही मारली गेली तर रोपांना आवश्यक पोषण मिळत नाही. आपल्याकडे गांडूळखताचा वापर अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. आपल्याकडे कोरडे गांडूळखत मिळते. ते जेवढे ओले असेल, तेवढे पिकांसाठी चांगले असते. रासायनिक औषधांच्या वापरामुळे ही गांडुळेही मारली जातात. तसे होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पावसाळा आला की बाग विकसित करण्याकडे आपला कल अधिक असतो. खरे तर बाग विकसित करायची असेल तर जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पालापाचोळा साठविण्यासह अन्य तयारी सुरू करायला हवी, अशा उपयुक्त टिप्स या वेळी मिळाल्या.

http://www.gacchivarchibaug.in

आणखी वाचा…

About Us…

गोगलगाय उपद्रवी किडा…

झा़डांचे टॉनिक जिवामृत

Not Only Consultancy …Much more

गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…

गच्चीवरच्या बागेला खतपाणी…

ऑनलाईन खरेदी करा..

गच्चीवरच्या बागेचे  शिका तंत्र

पुस्तकः तुम्हाला माहित आहे का?

टेलेग्राम वर गच्चीवरची बाग..

बहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…

कार्यशाळेनंतर  स्टाॅलवर मिळणार्या  गोष्टी…

गच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा

विकास पिडीया वर गच्चीवरची बाग

गच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…

Personal Work & Profile

कार्यपरिचय

माझे स्वप्न…

15 comments

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.