ASK WHY- Versatile learning tool


question-mark-3255140_1280

ASK WHY: Most versatile learning tool

शिकणं ही प्रत्येक सजीव प्राण्याची उन्नत, बहुमुखी व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. माणूस प्राणी ही मरणापर्यंत शिकतच असतो. ति त्याची गरज आहे. तो कधी अनुभवाने शिकतो, चुकांमधून शिकतो किंवा अपघातानेही शिकतो. अशी शिकण्याची प्रक्रिया नेहमी सुरूच असतो. अर्थात त्यात व्यक्तिपरत्वे ती स्वप्रेरणा किंवा बाह्य प्रभोलनाने शिकत असतो. तर यात शिकण्यातील गतीनुसार तो फास्ट लर्नर्स किंवा स्लो लर्नर्स ठरत असतो. असो पण शिकणं महत्वाचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवच हा खरा गुरू असतो. तशा शिकण्याच्या पध्दती अनेक आहेत. ते त्या त्या व्यक्तिच्या पिंडाप्रमाणे बदलत राहतो. पण या सर्वांन मधे एक समान गोष्ट आढळते ती म्हणजे प्रश्न विचारा, का…. ?हीच तर महत्वाची गोष्ट व ती सांगण्यासाठीच हा लिखीत प्रयत्न… ( बघा लिहणं जमलय का)

तर का? हा एक मेंदूला केवळ चालना देणारा नव्हे जाग करणारा शब्द आहे. एकादी गोष्ट आपण जेव्हां स्वतःला व इतरांना का ? म्हणून विचारतो तेव्हा त्यातून वैचारिक प्रक्रिया होतांना दिसतात. बर या का ? मागे आपल्या विज्ञान, तार्किकता, वर्गवारी, तुलना अशा शिकण्याच्या पध्दती मदत करत असतात. कार्यकारण भाव लक्षात येते व त्यातून शिकण्याचा वेग वाढतो, ज्ञान निर्मीती होते व ते निर्णयाप्रत पोहचण्यास मदत करते. तर निर्णय हा कृतीला प्रविण (सुरवात) करत असतात.

अशी ही शिकण्याची कडीबध्द शृखंला आहे. जपान देशात तर लहान मुलांना का ? हेच विचारायला शिकवतात. त्याची पुस्तक असतात. त्याने मुलं वैज्ञानिक पध्दतीने विचार करायला शिकतात. तर आता हा का ? गार्डनिंगच्या विषयात मधेच का ? आला असा प्रश्न तुम्हाला प़डला असणार. सांगतो….जरा… सावकाश जावू…

तर आपण हौशेन बाग फुलवायला घेतो. कुणी सांगीतल, कुठून ऐकलं वाचलं की तसं बागेत प्रयोग करून बघतो. काही वेळेस झाडं, कुंड्यातील रोपं, चांगली प्रतिसाद देतात. तर काही वेळेस अजिबात देत नाहीत. अर्थात हे कुणाचं सांगितलेलं चुकीच असतं असं मुळीच नाही. ते त्या त्या स्थल कालानुसार बरोबरही असतं. पण यात चुक आपलीच असते असे माझं म्हणणं आहे. कुणी आपल्याला काही बागेत सुचवलं तर ते का सुचवतो. त्यामागचे वैज्ञानिक कारण काय, त्याचा झाडांवर नेमकी काय प्रक्रिया होणार, कशी वाढ होणारं अशी काही विचार प्रक्रिया करतो का….. तर बरेचदा नाही.

कधी कधी त्या व्यक्तिचा हेतू तपासतो. ( हेतू म्हणजे बरेचदा आर्थिक देवाण घेवाणीचा असतो) पण का ? हा प्रश्न विचारत नाही. हा का ? विचारायला शिकलं पाहिजे. भले ते स्वतःला विचारा. भले त्याची उत्तरे लगेच मिळणार नाही. पण आपला मेंदू झोपेतही हे शोधकार्य करत असतो हे बरेचजणांना माहित नसेलही. पण हे खरं आहे. आपल्या बागेत एकादे झाडं चांगले फूलले, फळं, फूल आली तर का आली असं कघी विचारले का ? आपल्या मनाला… किंवा एकादे झाडं वाळले, सुकले, मरून गेले तर त्यालाही का म्हणून विचारलंय.. .. तर नाही. आपण फक्त लक्ष्यावर लक्ष केंद्रीत करतो आपण वस्तूप्रधान विचार करतो. विषय प्रधान नाही. तर येथे विचारलेला का ? हा विषयालाच हात घातलो. त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरेही मिळतात व ती शाश्वत, ठोस मिळतात. त्या का वरच गच्चीवरची बाग उभी राहतोय. फक्त का हा प्रश्न बागेविषयीच विचारा असं अजिबात नाही. आयुष्यात पडणार्या प्रश्नांना का ? म्हणून विचारा, त्याची उत्तरे मिळतीलच पण तुम्हाला सुरवातच नाही तर सराव सुध्दा निसर्गाच्या सानिध्यात करावा करावा लागेल. कारण निसर्ग ही सुध्दा एक गुरू आहे. त्यामुळे गार्डिनिंग करा व का ? विचारत रहा… बागे संदर्भात बरीच प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः शोधलेली असतील. राेपांना लागणारे खत, पाणी, उन, वारा या सार्याच गोष्टीची उपलब्धता, प्रमाण अशी उत्तरे आपल्याला निरिक्षणातून मिळतील पण सर्वात आधी का हे विचारणे गरजेचे असेन. त्यामुळे आपले इतरांवरचे अवलंबित्व बर्याच अंशी कमी झालेले वाटेल. अंधपणाने इतरांच्या सुचना अामलात आणण्यापेक्षा का विचारून डोळसपणे त्यातील प्रक्रिया समजून घेणे हे नेहमी प्रेरणादायी ठरतं. बागसंदर्भात तर अगदी उपयोग होतो. आणी अगदी अडलात तर आम्ही आहोतच आपल्या मदतीला.

मला वाटतं हा का आपल्या जीवनात किती व्यापला आहे. हे आपल्या लक्षात आले असेलच. तेव्हा आपल्याला हा लेखही का आवडला या विषयी लाईक, शेअर व कंमेट लिहायला विसरून नका…

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

http://www.gacchivarchibaug.in

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://organic-vegetable-terrace-garden.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.