How, When & why Shade Covering to garden…by Gacchivarchi Baug, Nashik
बाग म्हटली की तिची आपण हर तर्हेने काळजी घेतो. साहजिक आहे. लहान बाळ जेवढे लहान असते. तेवढे त्याला नजरेआड न होता त्यांचा सांभाळ करत असतो. तशीच बाग असते. थोड्या, थोड्या प्रयत्नांचे, काळजीचे, वेळेचे आपण सिचंन करत असतो. खर तर यातूनच बाग फूलत असते. पण कधी कधी काळजी “सर चढके बोलती है” असाही काही प्रकार घडतो. हा प्रकार बरेचदा बागेला शेड तयार करण्याचा असतो. झाडांना उन लागू नये अथवा पावसाचे जास्त पाणी पडून बागेचे नुकसान अथवा बागेतील माती बाहू नये अथवा पावसामुळे झाडं झोडपून जावू नये या काळजीतून हे होत असते. पण बागेला शेड कधी असावे कोणत्या प्रकारचे असावे, त्याचा कालावधी काय असावा, त्याची माहिती करून घेणे गरजेचे असते…
बागेला प्रकाश पाझरणारे transperant (लाईट वेट) पत्रांची, लोखंडी पत्रांची शेड कधीही करू नये. आपल्याकडे जेवढी उपलब्ध जागा असेन त्याचे विचारपूर्वक नियोजन करून लाईट वेट पत्रांची शेड करावी. ति पण फक्त उन पावसात आपल्याला थोडावेळ बसणे किंवा उभे राहण्यासाठी… (उभे टाकणे हा उस्माणाबादचा शब्द आहे), झोपाळा असेन अशाच ठिकाणी किंवा जास्तीत जास्त कपडे वाळत टाकण्यासाठी करावी. तिही अशंता असावी .. ना की झाडांच्या संरक्षणासाठी…
अशा पत्रांच्या शेड मधून भलेही प्रकाश येईल पण तो काही निवडक झाडांसाठीच उपयोगाचा असतो. पण तोही ही सदासर्वकाळ अशा प्रकाशात झाडांना ठेवणेही त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चूकीचे आहे. कारण प्रकाश व उन यात टोकाचा फरक आहे. प्रकाशात येणारी झाडे साधारण ही रंगीबेरंगी पानांची असतात. पण त्यांनाही स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी ऊनांची गरज असतेच. पालेभाज्यांनाही पार्शल शेड अर्थातच दोन ते तीन तास उन लागते. तर फळभाज्या, कंदमुळांना पूर्णवेळ उन्हांची गरज असते. कारण त्यांना स्वतःचे म्हणजे पानांचे अन्न तयार करून इतरांचे (फळ व कंदमुळांचे) अन्न तयार करावयाचे असतात.
काही मंडळी स्वतःहून किंवा सल्ला घेवून बागेच्या चारही बाजूने, गरम हवेपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी पत्रांचा अडोसा लावतात. तेही… चूकीचे आहे. आपल्या बागेत हवा फिरत नसेल तर बाग टप्प्या टप्प्याने रोगांना बळी पडते यात हमखास व्हाईट मिलीबग किंवा व्हाईट फ्लाय यांचा समावेश असतो. शक्यतो बाग ही खूली ठेवा…म्हणजे हवा खेळती राहिन व बाग निरोगी व तजेलदार दिसू लागेल.
बागेला शेड, अडोसा आवश्यक करावा. पण ती हिरव्या सच्छिद्र कापडीची असावी ति पण अगदी दाट म्हणजे ३० टक्के उन येईन अशी नाही तर ७० टक्के उन येईन अशी असावी. दाट कापडाचे शेड केल्यासही हवा खेळणे बंद होते. झाडांची वाढ मंदावते व बाग रोगाला बळीसुध्दा पडते.
हे शेड माहे १ मार्च ते ३० जून ( पाऊस सुरू होई पर्यंत) असू द्यावे. कारण उन्हाळा सुरू झालेला असतो. दोन वेळेस पाणी देवूनही बागेला पाण्याची कमतरता जाणवते कारण प्रखर उन्हामुळे वाढणारे तापमान हे झाडांना मारक ठरते. हे कापड बागेच्या चारही दिशांना तुम्ही लावू शकता. पण बाराही महिने नसावे याची काळजी घ्यावी.
अधिक पावसामुळे माती वाहून जात नाही. हो फक्त आपण कुंडीच्या, वाफ्याच्या घशा पर्यंत शिगोशिग माती भरली असेन तर ती बाहेर पडते. त्यात पाणीही साचते. पण आपण गच्चीवरची बाग तंत्राने ( नारळशेंड्या, पालापाचोळा व २० टक्के माती) कुंडी वाफा भरला असेन तर एक कणही माती वाहून जात नाही. उलट पाण्याची जिरवण्याची क्षमता काहीपटीनी वाढते.
शेड करावे असल्यास खूप काही खर्चाची गरज नसते. बरीच मंडळी आता सारेच काही कायमस्वरूपी, चिरस्थाळी, निरंतरतेच्या, टिकावूनपणाच्या आवेशात येऊन भल्यामोठ्या खर्चाचे व मजबूतीचे शेड तयार करतात. शेड हे कमी खर्चात तयारकरता येते. आपल्याला आवश्यक असलेल्या चारही बाजूना ब्रॅकेट पाईप अथवा एल शेप अंगेल भिंतीच्या कडेला ठोकून घ्यावेत( प्लिंप्थ वालचा बेस म्हणून वापर करू नये) चारही बाजूने जी. आय तार जी हार्डेवेअर मधे विकत मिळते. तिसुध्दा अगदी जाड नसावी. कारण पिळ देतांना ती तुटण्याची शक्यता अधिक असते. तर मध्यम गेजची घ्यावी. तिला चारही लोखंडी पाईपला अथवा अंगेलला लावू घ्यावी. थोडक्यात ताण तयार करून द्यावा. व त्यामधे आडवे उभे दिशेने काही तारांचा अथवा काथ्यांचा मंडप तयार करावा.
असा मंडप जून ते फेब्रुवारी पर्यंत वेल वाढवण्यासाठी उपयोगात येतो. व मार्च ते मे पर्यंत हिरवे कापड टाकण्यासाठी उपयोगात येतो. मंडपाची किंवा अशा शेडची उंची ही आपण टाचा उंचावून एक हात वर करून जेवढी उंच जाईल तेवढीच त्याची उंची असावी. या पेक्षा अधिकच्या उंचीवर मंडप अथवा हिरव्या कापडाचे शेड केल्यास त्याचा उपयोग करतांना स्टूलची गरज लागते. व स्टूलवर उभे राहून काम केल्यास अपघाताची शक्यता वाढते. या सार्यांचा सारासार विचार करून शेड अथवा मंडपाची आखणी, बांधणी करावी.
लेख आवडल्यास नक्कीच आमच्या नावासाहित व संकेत स्थळासहित पुढे पाठवा. काही माहिती हवी असल्यास फोन करा.
गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक. www.gacchivarchibaug.in
9850569644 / 8087475242
गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा .. link
website
http://www.gacchivarchibaug.in
website https://organic-vegetable-terrace-garden.com
profile
https://about.me/sandeepchavan
cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/
YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q
my link http://www.mylinq.in/9850569644
https://organic-vegetable-terrace-garden.business.site/
👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.