How to water conserve in gardening


Copy of Picture 018 copy copy.jpg

How to water conserve in gardening?

पावसाचे पाणी जिरवणारी गच्चीवरची बाग…

पाणी आहे तर सार काही आहे… याचा प्रत्यय आपण सार्यांनीच थोड्याफार प्रमाणात गेल्या उन्हाळ्यात समजून घेतला. पाणी वापरतांनाच त्याची बचत करणे हे जसे गरजेचे आहे. त्याचे पूर्नवापर करणेही तितकेच गरजेचे आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सार्या योजनाही कार्यान्वयीत झाल्या तरी पाणी हे वाढत्या जनसंख्येला कमी पडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पाणी हे विविध तर्हेने संग्रह, वापर, पूर्नवापर केला पाहिजे. त्याआधी आपण पूर्वी पाण्याची उपलब्धता नेमकी होत होती हे पाहूया…

प्रचंड प्रमाणात जंगल होती. जंगलाचा झाडाचा सुकलेला पानांचे आच्छादन जमीनीवर असायचे. त्यामुळे पडणारा पाऊस हा झिरझिपत जमीनीत संग्रह व्हायचा. पण आता जंगल नष्ट झालीत. रस्त्याचे सिमेंटीकरण झाले आहे. थोडक्यात डांबरट झाल्यामुळे पाणी स्वतःकडे ठेवायला नाहीच म्हणतात.

त्यामुळे पडणारा पाणी उताराकडे पळू लागतो. पाऊस पडूनही पाणी संग्रहीत नसल्यामुळे तदाही दिशा पाणी पाणी करावे लागते. पण एवढेच कारण नाही… अशी अनेक कारणे आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्फीभवन वेगाने होते. त्यामुळे कोरडेपणा येतो. त्यामुळे चक्रवाढगतीने पाणी उडून जाते.

हे पाणी वेगवेगळ्या रितीने आपण वातावरणात संग्रहीत करू शकतो. आम्ही गच्चीवर बाग फुलवतो. त्यात वाफे किंवा कुडंयामधे तळाशी नारळाच्या २० टक्के शेडंया व साठ टक्के पालापाचोळा वापरतो. व वर २० टक्के माती. यामुळे पडणारा पाऊस हा टेरेसवरून धो धो वाहून जात नाही. तो त्यात जिरतो. बायोमास असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची शक्यता कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तर झाडे तरारलेली असतात. पाण्याचा अंश असल्यामुळे , आद्रतेमुळे गच्चीवर आद्रता टिकून राहते. अशा रितीने गच्चीवर जमीनीवर, वाफे बनवले तर कितीतरी वाहून जाणारे पाणी आपण संग्रहीत करू शकतो. असेच विटांच्या होदात पालापाचोळा साठवून त्यात पाणी साठवून ठेवू शकतो. त्यामुळे आम्ही अभिमानाने सांगतो की पावसाचे पाणी जिरवणारी गच्चीवरची बाग…

अशी पर्यावरणस्नेही बाग आपणही फुलवू शकता. ..

लेख आवडल्यास नक्कीच लाईक करा. संकेत स्थळासहित, नावासहित शेअर करा,.

गच्चीवरची बाग, संदीप चव्हाण, नाशिक.

9850569644 8087475242

www.gacchivarchibaug.in

गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा .. link https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://organic-vegetable-terrace-garden.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.