How to Grow Coriander at Home….


500_F_12234084_pX70w4Hy2tEzkjPqcUzxf79YVo1E6fSl

How to Grow Coriander at Home….

कोंथीबिर कशी लागवड करावी…

जेवणातील पदार्थाची चव वाढवण्यासाठी कोंथबिर ही महत्वाची वनस्पती आहे. तिच्या कच्च्या सेवनाने बरेच काही आरोग्यदायी फायदेसुध्दा आहेत. बाजारात मिळणारी कोंथंबिर ही रासायनिक खते, फवारणी करून कमी कालावधीत वाढवलेली असते त्यामुळे ती बचकभर (मूठभर) टाकली तरी चव येत नाही, त्याचा सुंगध तर दूरची गोष्ट.. पण घरी विषमुक्त पध्दतीने उगवलेल्या कोंथबिरीच्या दोन काड्या आपल्या जेवणातील पदार्थांची चव बदलवू शकते. शिवाय ती आरोग्यदायी सुध्दा ठरते. तर घरच्या घरी कोथंबिर मिळवण्यासाठी आपल्याला धने पेरले पाहिजेत. त्याची निवड, बिजप्रक्रिया, त्याची पेरणी, त्याची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा लेख..

धने निवडः बरेचदा आपण घरात फोडणीसाठी वापरले जातात ते धने पेरतो. काही वेळेस ते येतात काही वेळेस नाही. असा बर्याच जणांचा अनुभव आहे. प्रथमतः त्याची निवड महत्वाची आहे. स्वयंपाक घरात वापरात येणारे धने हे हिरवट रंगाचे असतात. ते बियाणं म्हणून पूर्नलागवडीस योग्य नसतात. कारण त्यांची बिज म्हणून पूर्णतः वाढ झालेली नसते. त्यामुळे ही धने पेरण्यायोग्य नसतात.

कोथबिरीसाठी धने हे मोठे ज्वारीच्या दाण्यासारखे टप्पोरे, खाकी रंगाचे असावेत. बियाणांच्या दुकानात ते मिळतात. बरेचदा खाकी रंगाचे धने वाण्याच्य दुकानात सुध्दा मिळातात. त्या धन्यांना गव्हाच्या चाळणीने चाळून घ्यावेत. म्हणजे बारिक आकाराचे धने हे घरात वापरावेत व मोठे आकाराचे पेरण्यासाठी योग्य असतात.

पहिल्यांदा निवडलेल्या धन्यांना भरडून घ्यावेत. ते व्दीदल असतात. अखंड पेरले तर त्यातून अंकूर येण्यास बराच काळ लागतो. त्यामुळे त्यास हलक्या हाताचा दाब देवून, वाटीने किंवा ताटडीने भरडून घ्यावेत. पायात चप्पल घालूनही भरडता येतात. तर बिजसंस्कार करण्यापूर्वी धने भरडून घेणे गरजेचे आहे.

बिजप्रक्रिया, कोणतही बियाणं पेरतांना त्यावर बिजसंस्कार होणे गरजेचे आहे. ती खालील प्रमाणे करता येते.

 • भरडेलेले धने सकाळी साध्या किंवा कोमट पाण्यात दिवसभर भिजवावे व मातीत पेरावे.
 • भरडेलेल्या धन्यांना चुना (हरबरादाण्याएवढा चुना) व कपभर पाण्यात तास दोन तास भिजवावा व त्यास मातीत पेरावे.
 • भरडेलेले धने वाटीत पाणी घेवून दिवसभर उन्हात ठेवावे व नंतर मातीत पेरावे.
 • गोमुत्र पाण्यात तीन चार तास भिजवावे हे नंतर मातीत पेरावे.
 • जिवामृत असल्यास भरडलेल्या धन्यांना जिवामृत चोळून वाळू द्यावे व नंतर मातीत पेरावे.

पेरण्याची प्रक्रिया ही सायंकाळी करावी. म्हणजे ते रात्रभर मातीत स्थिर होतात.

धने मातीत पेरण्याची पध्दत…

 • वरील प्रकारात भिजवलेले धने मातीत पेरावयाचे असल्यास त्यास सरी पध्दतीने दोन दोन दाने एका ओळीत सोडत एक इंच मातीचा थर द्यावा.
 • किंवा चार चार दाने चिमटीत पकडून ते मातीत एक इंच खोल जातील व त्यात ठराविक अंतर ठेवत पेरावे.
 • भरडेलेले कोरडे धने मातीत पेरावयाचे असल्यास त्यास इच्छित कुंडीत चमचे दोने चमचे पेरावेत त्यावर पाणी शिंपडून दूध काला करतो त्याप्रमाणे हलक्या बोटांनी त्यात मातीत कुस्करावेत. म्हणजे माती, पाण्यांचा धन्यांशी संयोग होवून ते लवकर उगवून येतात.
 • कोरडे भरडलेले धने चिमटीत पकडून ते मातीत एक इंच खोल जातील व त्यात ठराविक अंतर ठेवत पेरता येतात.

घ्यावयाची काळजी…

 • धने पेरल्यानंतर त्यास हाताने पाणी शिंपडून द्यावे. व सात-आठ दिवस त्यास ओलावा मिळेल याची काळजी घ्यावी. शक्य झाल्यास त्यास कडक उन्हात ठेवणे टाळावे. उनसावली चालेल. कारण धन्याचे अंकुर हे नाजूक असतात. त्यास कडक उनं लागले तर ते सुकून जातात.
 • आपण आपल्या परिसरात पहिल्यांदा धने पेरत असाल तर त्यास चिमण्यापासून वाचावे. कारण कोवळे अंकूर हे त्यांचे औषध असते. आपल्या डोळ्यांना दिसणार नाही असे छोटे अंकूरित बिज ते चोचीने टिपत फस्त करतात.

बरेचदा संकरीत धने हे बोटावएवढे झाले की मान टाकतात किंवा ते अधिक वाढत नाही. अशा वेळेस त्यांना योग्य वेळेला खूडून, उपटून, मुळासहित स्वच्छ धूवून ते वापरावी. गावठी धने असल्यस त्याचे देठ जाड असते. त्यामुळे त्यास वर वर कापत वापरावी. पुन्हा देठांना पाने येतात. घरच्या बागेत आपल्याला वर्षभर धने पेरता येतात. फक्त एकदा पिक घेवून झाले की माती कडकडीत उन्हात वाळवावी. त्यात कंपोस्ट, गांडूळ खत मिसळावे म्हणजे नवे धने पेरता येतात. वरील सर्व प्रयत्न करूनही धने उगवले नाहीतर वाण्याचं दुकान बदलावं थोडक्यात बिज नवे घ्यावे.

टीपः बाजारात मल्टीकट ( पुर्नतोडणी करता येणारी कोंथबींर) वाणाचे छोट्या आकाराचे धने मिळतात. त्यांना भिजवू अथवा भरडू नये ते पेरण्यासाठी अखंड वापरावेत. चिमटीत धरता येईल एवढे चार चार दाणे घेवून ते पेरभर मातीत (सांयकाळच्या वेळेस) चार चार बोटाच्या अंतरावर पेरावेत.

आपल्याला लेख आवडला तर नावासहित शेअर करा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.

www.gacchivarchibaug.in

8087475242 9850569644

===========================================

जाहिरात: उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवा. गच्चीवरची बाग पुस्तक (व्दितीय आवृत्ती)
घरपोहोच by post 240/-
WTS app 9850569644 / 8087475242

http://www.gacchivarchibaug.in/gacchivarchi-baug.html

गच्चीवरची बाग updates साठी गच्चीवरची बाग नाशिक page like करा ..

website
http://www.gacchivarchibaug.in

website https://organic-vegetable-terrace-garden.com

profile
https://about.me/sandeepchavan

cover story https://udyojak.org/gachchivarchi-baug-success-story/

YouTube https://www.youtube.com/channel/UCIUZVOtKaSvV1DqTmFnKR5Q

facebook page
https://www.facebook.com/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-page-163326204300631/

my link http://www.mylinq.in/9850569644

https://organic-vegetable-terrace-garden.business.site/

👆वरील link ही गच्चीवरची बाग नाशिक ची आहे. आपण या site वर click करून आपला review नोंदवावा. आपल्या या एका प्रयत्नाने आम्ही करत असलेले पर्यावरण पुरक काम व निःशुल्क मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.
संदीप चव्हाण नाशिक.

8087475242

http://www.gacchivarchibaug.in